scorecardresearch

नवी मुंबई : लाक्षणिक संपात बाजार बंद असल्याने भाजीपाला वधारला; भेंडी, गवार, वाटाणा, हिरवी मिरचीच्या दरात २० ते ३० टक्क्यांची वाढ

भाजीपाला बाजारात मंगळवारी भाजीपाल्याच्या ५०० ते ६०० गाड्या आवक होऊनही भाज्यांच्या दरात २० ते ३० टक्के वाढ झालेली आहे.

Vegetables rate increase navi mumbai
लाक्षणिक संपात बाजार बंद असल्याने भाजीपाला वधारला (प्रातिनिधिक छायाचित्र)

शासन दरबारी विविध प्रलंबित मागण्यांची पूर्तता करण्यासाठी, सरकारचे लक्ष वेधण्याकरिता माथाडी कामगार संघटनेने एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला आहे. या संपामध्ये माथाडी कामगारांसह बाजार समितीतील व्यापारी, तसेच इतर बाजार घटक सहभागी होणार आहेत. पाचही बाजार समिती बंद आहेत. भाजीपाला बाजारात मंगळवारी भाजीपाल्याच्या ५०० ते ६०० गाड्या आवक होऊनही भाज्यांच्या दरात २० ते ३० टक्के वाढ झालेली आहे. भेंडी, गवार, हिरवी मिरची, वाटाणा, वांगी, फ्लॉवर या भाज्यांना अधिक मागणी असल्याने दरात वाढ झाली आहे.

१ फेब्रुवारीला बाजार समिती १०० टक्के बंद असल्याने मंगळवारी एपीएमसी बाजारात भाजीपाल्याच्या ५००-६०० गाड्या दाखल झाल्या आहेत. बाजारात जादा आवक होऊनही १ दिवस मार्केट बंद असल्याने भाजीपाल्याची मागणी वाढली आहे. विशेषतः हॉटेल व्यवयसायिकांकडून अधिक मागणी होती, त्यामुळे भेंडी, गवार, हिरवी मिरची, वाटाणा, वांगी, फ्लावर या भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. मंगळवारी बाजारात भेंडी ११४४ क्विंटल , फ्लॉवर ३२८९, गवार १९२ क्विंटल, टोमॅटो १४८१ क्विंटल, हिरवा वाटाणा ३३५० क्विंटल, हिरवी मिरची ३४०८ क्विंटल आणि वांगी २८३ क्विंटल आवक झाली आहे.

घाऊक भाजी बजारभाव (प्रतिकिलो )

भाजी आधीचे दर (रुपयांमध्ये)आत्ताचे दर (रुपयांमध्ये)
भेंडी ५४-५६६०-६५
हिरवी मिरची३४-३६४०-४४
टोमॅटो१४-१५१०-१२
फ्लॉवर१६-१८२४-३६
वाटाणा१२-२०३०
वांगी ३०-३२३६-४०
गवार ६५-६५७०

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-01-2023 at 17:31 IST