वाशी येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून नवीन वाहन परवाना धारकांना वाहतूक नियमांचे धडे देण्यात येत आहेत. वाशी आरटीओ कार्यलयाकडून नवीन वाहन परवाना धारकांना रस्ता सुरक्षा आणि त्याचे नियम तसेच व्यसनमुक्तीबाबत जनजागृती केली जात आहे.आरटीओ कडून नवख्या प्रशिक्षणार्थी वाहन चालकांना वाहन चालविण्याचा परवाना देताना परीक्षा घेतली जाते. त्याचबरोबर आता वाशी आरटीओ कार्यालयाच्यावतीने येणाऱ्या नवीन वाहन परवाना धारकांना वाहतुकीचे नियम इत्यादींबाबत माहिती दिली जात आहे. वाशी आरटीओ कार्यालयाकडून स्वतः पुढाकार घेऊन नवख्या वाहनधारकांना प्रशिक्षण दिले जात आहे . यामध्ये १०० जणांची कार्यशाळा घेऊन वाहतूक नियमांबाबत माहिती दिली जात आहे.

हेही वाचा >>> उरण : करळ उड्डाण पुलाखाली कंटेनर वाहनांच बसस्थान

यामध्ये उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अजिंक्य गायकवाड, किरण लतुरे हे जनजागृती करत आहेत . या कार्यशाळेत वाहतूक नियम, रस्ता सुरक्षा, वाहन चालवताना कोणती काळजी घ्यायची ,अपघात झाल्यानंतर काय करायचं, तसेच अपघातात इतरांना मदत कशी करायची. वाहन विम्याचे फायदे काय आहेत . याबाबत माहिती देण्यात येत आहे. त्याचबरोबर तरुणाईला व्यसनमुक्ती पासून दूर ठेवण्यासाठी व्यसनमुक्तीचे महत्त्व पटवून दिले जात आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन विभाग अधिकारी हेमांगी पाटील यांनी दिली आहे.