नवी मुंबई : जोरदार पाऊस, खड्डेमय रस्ता, रस्ते बांधकाम आणि वाहतूक पोलिसांचे अपुरे मनुष्यबळ या सर्व कारणांनी मुंब्रा बायपास रस्त्यावर चारी बाजूंनी प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. या ठिकाणापासून सुमारे सहा किलोमीटर लांब असणाऱ्या महापेपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

हेही वाचा : नवी मुंबई महापालिकेच्या पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालयासाठी प्राध्यापक भरती

आज पावसाने सर्वत्र दमदार हजेरी लावली. त्यामुळे मुंब्रा बायपास या रस्त्यावर चारी बाजूंनी प्रचंड वाहतूक कोंडी झाली संध्याकाळी पाच वाजेपर्यंत नियमितवाहतुक होती मात्र नंतर जोरदार पावसाने नागरीकांची दाणादाण उडाली तर रस्त्यांची चाळन झाली. मुंब्रा बायपास पासून ठाणे नवी मुंबई कल्याण डोंबिवली आणि अंबरनाथ कडे जाणारे रस्ते फुटतात . त्यामुळे या उपनगरात असलेली नियमित वाहतूक आणि नाशिक ते ठाणे मार्गे घोडबंदर गुजरात तसेच नाशिक अंबरनाथ बदलापूर कडून नवी मुंबई मार्गे ठाणे अंधेरी सिप्स  कडे जाणारी जड अवजड वाहनांची भर पडत गेली. रस्त्याचे बांधकाम सुरू असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे तसेच रस्ते खड्डेमय असल्याने वाहतूक धिम्या गतीने सुरू होती मात्र अंधार पडल्या नंतर वाहतूक कोंडीत भर पडत गेली. रस्त्याच्या डाव्या दिशेच्या मार्गिकेवर सर्रास हलकी वाहने आणि दुचाकींचा विरुद्ध दिशेने गाड्या हकल्याने ही वाहतूक कोंडीत भर पडत आहे . हा प्रकार रात्री दहा पर्यंत सुरू होता नंतर हळू हळू व धिम्या गतीने वाहतूक सुरू झाली.

हेही वाचा : फी अभावी १८ विद्यार्थी वर्गाबाहेर; विद्यार्थ्यांच्या आईवर मंगळसूत्र गहाण टाकण्याची वेळ

वाहतूक कोंडीत मोठ्या प्रमाणात वाहने अडकून महापे पर्यंत वाहतुक कोंडी झाली. येथील वाहतूक कोंडी सोडवताना नाकी नऊ येत होते मात्र तरीही वाहतूक कोंडीचा उगम ज्या मुंब्रा बायपास वर नवी मुंबई वाहतूक शाखेतील पोलिसांना वाहतूक नियंत्रण करण्यास धडलेआहेत अशी माहिती पोलीस उपायुक्त पुरुषोत्तमक कराड यांनी दिली.