उरणमधील विमला तलावातील पदपथाला पडलेलं भगदाड वाढलं | vimala lake damage footpath center of nagarparishad uran | Loksatta

उरण : विमला तलावातील पदपथाला पडलेलं भगदाड वाढलं

तलावाला लागून असलेल्या पदपथाला हे भगदाड पडल्याने हळू हळू पाण्यातील मातीची धस वाढू लागली आहे.

उरण : विमला तलावातील पदपथाला पडलेलं भगदाड वाढलं
उरण : विमला तलावातील पदपथाला पडलेलं भगदाड वाढलं

उरण : नगरपरिषदेच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या विमला तलावातील पदपथाला पडलेलं भगदाड वाढलं आहे. त्यामुळे विरंगुळा म्हणून तलावात येणाऱ्या लहान मुले,ज्येष्ठ नागरिक,विद्यार्थी व तलावातून ये जा करणाऱ्या उरण शहरातील नागरिकांना अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. उरण नगरपरिषदेने येथील नागरिकांसाठी विरंगुळा व शहरातील लहानग्यांना खेळण्यासाठी एकमेव ठिकाण विमला तलाव आहे. या विमला तलावातील पदपथावर भले मोठे भगदाड पडले आहे.

तलावाला लागून असलेल्या पदपथाला हे भगदाड पडल्याने हळू हळू पाण्यातील मातीची धस वाढू लागली आहे. त्यामुळे भगदाड मोठं होऊ लागला आहे. या पदपथावरून अनेक नागरिक,विद्यार्थी ये जा करीत आहेत. तसेच अनेक नागरिक या पदपथावरुन व्यायाम करणाऱ्यांची संख्या अधिकची आहे. त्यामुळे सातत्याची वर्दळ असलेल्या या पदपथाची दुरुस्ती लवकरात लवकर करण्याची आवश्यकता असतांना नागरपरिषदेचे या भगडाडकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे एखादा अपघात होण्याची श्यक्यता आहे.

हेही वाचा : एपीएमसीतील कृषी माल गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा कागदावरच

नगरपरिषदे कडून डी पी डी सी मधून तलावाच्या दुरुस्तीसाठी १५ लाख रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. हा निधी आल्यानंतर विमला तलावाच्या दुरुस्तीचे काम केले जाईल. – झेड.आर.माने,उरण नगरपरिषद अभियंता

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-10-2022 at 13:49 IST
Next Story
एपीएमसीतील कृषी माल गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा कागदावरच