वाशीच्या मुंबई कृषी उत्पन्न बाजारात समितीत नोव्हेंबर पासून द्राक्षच्या हंगामाला सुरुवात होते. परंतु पाऊस लांबल्याने त्याचा फटका द्राक्षांच्या बागांना बसला असून यंदा उशिराने द्राक्षांचा हंगाम सुरू होणार आहे. एपीएमसी बाजारात दोन दिवसापासून द्राक्षांची तुरळक आवक सुरू झाली असून आंबट द्राक्ष बाजारात दाखल होत आहेत . त्यामुळे बाजारात व्यापारी सह ग्राहक गोड द्राक्षांच्या प्रतीक्षेत आहेत.

हेही वाचा- नवी मुंबई: आरक्षित भूखंडांची सिडकोकडून विक्री ; सिडकोला भूखंड विक्रीतून १३०० कोटी रुपयांची कमाई

Delayed purchase of passenger vehicles by 3 lakh 22 thousand 345 customers in the month of March
प्रवासी वाहनांच्या विक्रीत घट, मार्च महिन्यात ३ लाख २२ हजार ३४५ ग्राहकांकडून खरेदी लांबणीवर
Bhandara District Swelters as Temperature Hits 43 Degrees Celsius Early in April
उन्हाच्या झळा : भंडाऱ्याचा पारा ४३ अंशावर , एप्रिल महिन्यात प्रथमच एवढे तापमान
space
एप्रिलमध्ये अवकाशात अपूर्व मनमोहक घडामोडींची रेलचेल; वाचा नेमकं विशेष काय..?
The central government fiscal deficit reached Rs 15 lakh crore at the end of February
वित्तीय तूट १५ लाख कोटींवर; फेब्रुवारीअखेर वार्षिक उद्दिष्टाच्या तुलनेत ८६.५ टक्क्यांवर

नोव्हेंबर महिन्यात द्राक्षची आवक सुरू होते. तसेच जानेवारीमध्ये द्राक्षांचे प्रमाण अधिक वाढते. साधारण १५ नोव्हेंबर नंतर द्राक्षची अधिक आवक सुरू होत असून १५ एप्रिल पर्यत हंगाम सुरू असतो. मात्र, अद्याप बाजारात केवळ १ ते २ छोट्या गाड्या दाखल होत आहेत. तसेच बाजारात दाखल होणारे द्राक्ष चवीला आंबट येत असून ग्राहकांकडून याला ना लपसंती दर्शविण्यात येत आहे . तसेच येणारी द्राक्ष काही वेळाने सडत असल्याने ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरवली आहे. ५ डिसेंबर नंतर आवक वाढेल असे मत व्यापारी संजय पिंपळे यांनी व्यक्त केले आहे.