रानसई धरण भरल्याने प्रशासनाचा निर्णय

उरणमधील ग्रामपंचायती तसेच नगरपालिका व औद्योगिक विभागाला पाणीपुरवठा करणारे रानसई धरण सोमवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे भरले, त्यामुळे उरणमध्ये सुरू असलेली मंगळवार व शुक्रवारची पाणीकपात एमआयडीसीने रद्द केली आहे. मार्चपासून धरणाची पातळी घटल्याने आठवडय़ात दोन दिवसांची पाणीकपात सुरू करण्यात आली होती. जून महिन्यात पाणी कमी झाल्याने पावसाळ्यात धरण पूर्ण क्षमतेने भरल्याशिवाय पाणी कपात रद्द न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरण भरून वाहू लागले आहे.

Why minimising or cutting out alcohol is one of the best fitness hacks
मद्यपान कमी करणे किंवा पूर्णपणे बंद करणे हेच आहे सर्वोत्तम आरोग्याचे रहस्य? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…
sugarcane juice selling Business
Viral Video: लय भारी जुगाड! दुकानदाराने ऊसाचा रस थंड राहण्यासाठी बिना बर्फाचा केला भन्नाट जुगाड; दुकानावर झाली गर्दीच गर्दी
Shengdana Chutney Recipe khandeshi recipe
फक्त ५ मिनिटात करा खानदेशी पद्धतीची शेंगदाण्याची झणझणीत, लज्जतदार चटणी; साध्या जेवणाची वाढेल गोडी
how to water a plant tips in marathi
Garden tips : उन्हाळ्यामध्ये झाडांना पाणी देण्याची योग्य वेळ काय? रोपांच्या वाढीसाठी पाहा ‘१०’ टिप्स

रानसई धरणाची पाणी साठवण्याची क्षमता १० दशलक्ष घन मीटर आहे. धरणात ४० वर्षांपासून साठलेल्या गाळामुळे यातील अवघे ७ दशलक्ष घनमीटर पाणीच वापरासाठी मिळते. त्यात उरणमधील वाढते औद्योगिकीकरण तसेच नागरीकरणामुळे पाण्याची मागणी वाढली आहे. ती भागवण्यासाठी नवी मुंबईच्या हेटवणे धरणातून दररोज पाणी उसने घ्यावे लागत आहे. धरणाची उंची वाढविण्याचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. वाढती मागणी आणि घटती क्षमता या चक्रात अडकलेल्या या धरणातून एमआयडीसी पाणीपुरवठा करत आहे. हे दुष्टचक्र थांबवण्यासाठी उरणमधील धरणाची क्षमता वाढविण्याची मागणी येथील नागरिक करत आहेत. पाणीसाठा कमी असताना पाणीपुरवठय़ाचे नियोजन एमआयडीसीला करावे लागत आहे, अशी माहिती एमआयडीसीचे उपअभियंता रणजित बिरंजे यांनी दिली. तसेच एमआयडीसीकडून लागू करण्यात आलेली पाणीकपात रद्द केल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

पर्यटकांसाठी सुरक्षाव्यवस्था

रानसई धरण भरून वाहू लागल्याने धरणावर येणाऱ्या पर्यटकांची संख्याही वाढणार आहे. धरण पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्ताची मागणी एमआयडीसीने केली आहे.