scorecardresearch

Premium

नवी मुंबई : जलवाहिनी फुटली, पाणी कमी दाबाने येणार

नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे प्रकल्पाची जल वहिनी फुटल्याने आज (१०जून) संध्याकाळी नवी मुंबईत कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.

water pipe Morbe project
नवी मुंबई : जलवाहिनी फुटली, पाणी कमी दाबाने येणार (प्रातिनिधिक छायाचित्र)

नवी मुंबई : नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे प्रकल्पाची जल वहिनी फुटल्याने आज (१०जून) संध्याकाळी नवी मुंबईत कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. सकाळी ११ च्या सुमारास आदई गावा नजीक मोरबे धरण प्रकल्पाची २०२४ मि.मी. व्यासाची मुख्य जलवाहिनी फुटली आहे.

हेही वाचा – नवी मुंबई:बेदाणे लिलाव केंद्राला टाळे; बेदाण्याची विक्री होत नसल्याने शेतकऱ्यांची एपीएमसीकडे पाठ

elders saved the child slife Varanasi Viral Video
VIDEO: पावसाच्या पाण्यात विजेचा धक्का बसल्याने तडफडत होता चिमुकला, देवदूत बनून आलेल्या वृद्धांनी वाचवले प्राण
Pankaja Munde
“माझ्यावर निर्णय घ्यायची वेळ…”, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर भाजपाची प्रतिक्रिया; म्हणाले…
Marathi Woman Trupti Devrukhkar Shared video
धक्कादायक! मराठी महिलेला मुंबईत घर नाकारलं, मनसेने इंगा दाखवल्यानंतर माफी, व्हायरल व्हिडीओवर संताप व्यक्त
The son told his mother a strange reason for not studying
अभ्यास न करण्यासाठी मुलानं आईला सांगितलं भन्नाट कारण; Video एकदा पाहाच

दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. नवी मुंबईकर नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. बुधवारीच मान्सूनपूर्व कामासाठी पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. त्यानंतर कमी दाबाने पाणीपुरवठा केला गेला. मात्र आजही अनेक भागात पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाही. त्यात आता जलवाहिनी फुटल्याने आज कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Water pipe of the morbe project which supplies water to navi mumbai burst ssb

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×