scorecardresearch

सीवूड्स विभागात पाणीटंचाई; सेक्टर २३ मधील कमीदाबाने पाणीपुरवठ्यामुळे नागरीक हैराण

सीवूड्स पूर्वेला स्थानकानजीक असलेल्या सेक्टर २३ परिसरात सातत्याने कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे.

सीवूड्स विभागात पाणीटंचाई; सेक्टर २३ मधील कमीदाबाने पाणीपुरवठ्यामुळे नागरीक हैराण

नवी मुंबई – स्वतःच्या मालकीचे धरण असलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या मोरबे धरणातून शहराला पाणीपुरवठा होतो.नवी मुंबईला जलसंपन्न शहर असे म्हटले जाते. परंतू मागील काही दिवसापासून शहरातील विविध भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याचे चित्र आहे. सीवूड्स सेक्टर २३ परिसरात सातत्याने नागरीकांना कमी दाबाने केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरीक हैराण असून पालिका पाणीपुरवठा  आमच्या विभागाकडे लक्ष देणार असा त्रागा व्यक्त करत आहेत.

हेही वाचा >>> बुधवारी संध्याकाळी नवी मुंबईत पाणीपुरवठा बंद ;पाणी जपून वापरा

नवी मुंबई शहरात लोकसंख्येच्या मानाने अतिरिक्त पाणीपुरवठा होतो. परंतू मोरबे धरणात अतिरिक्त पाणी उचलल्यानंतरही शहरातील काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नक्की पाणी मुरतय कुठे असा प्रश्न नागरीक विचारु लागले आहेत. सीवूड्स पूर्वेला स्थानकानजीक असलेल्या सेक्टर २३ परिसरात सातत्याने कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. काही भागात तर पाणी नीट मिळतच नसल्याच्या तक्रारी नागरीक करत आहेत. शहरात अधिकचा पाणीपुरवठा होत असताना सातत्याने तुर्भे ,इंदिरानगर,तसेच कोपरखैरणे ते दिघा या पट्ट्यात पाणीतुटवड्याच्या वारंवार तक्रारी येतात.त्यामुळे पाणीपुरवठा विभागाने नक्की पाणी मुरतय कुठे याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे.

हेही वाचा >>> नवी मुंबई: भाडेकरू म्हणून अर्ज केला निघाली घुसखोर बांगलादेशी

सीवूड्स सेक्टर २३ परिसरात अनेक सोसायट्यांमध्ये कमी दाबाने पाणी येत असल्याने आम्हाला सातत्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. अत्यंत कमी दाबाने पाणी येत असल्याने सर्वच कामाचा खोळंबा होत असल्याच्या तक्रारी नागरीक करत आहेत.याच परिसरात मोठ्या प्रमाणात रस्त्याचे व्हाईट टॉपिंग करण्यात यते आहे. त्यामुळे आता खोदकाम करायचे तरी कसे असा प्रश्न नागरीकांना पडला आहे. त्यामुळे सीवूड्स सेक्टर २३ परिसराबाबत पालिका अधिकाऱ्यांनी तात्काळ भेट देऊन पाणीपुरवठ्याबाबत पाहणी करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.

मागील अनेक दिवसापासून कमी दाबाने पाणी येत आहे. कामे सुरु असल्याने कमी दाबाने पाणी येत असल्याचा समज असून पाणीटंचाईमुळे आम्ही नागरीक त्रस्त असून पालिकेने याबाबत खबरदारी घ्यावी.

जगदीश नरे, शांती निवास सोसायटी सेक्टर २३

सीवूड्स परिसरात अनेक दिवसापासून पाणीटंचाई जाणवत आहे. परिसरात रस्ता  कॉंक्रीटीकरणाची कामे चालू आहेत. त्यामुळे पाणी कमी दाबाने येत असल्याचा समज होता.परंतू सतत पाणी कमी येत आहे. घरात वेळेत पाणी नसेल तर मोठी अडचण निर्माण होते. कॉंक्रीटीकरणामुळे रस्ता खोदाई करुन काय झाले हे पाहता येत नाही. पालिकेने याबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी,

जयवंत कुलकर्णी ,शिवशक्ती हौ.सो. सेक्टर २३ सीवू्डस

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-12-2022 at 19:42 IST

संबंधित बातम्या