नवी मुंबई-  नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चिखले येथील पनवेल कर्जत  येथील दुहेरी  रेल्वे मार्गाकरीता जलवाहिनी स्थलांतरीत करणे व कळंबोली येथे एक्सप्रेस पुलाखाली दिवा पनवेल रेल्वे मार्गावरील लाईन क्रॉसिंग करुन जलवाहीनी टाकण्यासाठीची अत्यावश्यक कामे करण्यात आली असून मंगळवारी संध्याकाळपर्यंत हे काम सुरू होते. त्यामुळे मोरबे धरणावरून मंगळवारी काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरू करण्यात आल्याने मंगळवारी संध्याकाळी नवी मुंबईकरांना पाणी तुटवला जाणवला. परंतु बुधवारी सकाळपासून पाणीपुरवठा सुरळीत होणार असल्याची पालिका प्रशासनाने लोकसत्ताला दिली.

हेही वाचा >>> Video : नवी मुंबई शहरातील नागरिक पाण्याच्या शोधात अर्ध्या रात्री रस्त्यावर

Pimpri, Leakage in water channel, moshi,
पिंपरी : मोशीत जलवाहिनीला गळती, हजारो लीटर पाणी वाया
Ten bridge
राज्य मार्गावरील टेन पुलाचा कठडा बनला धोकादायक, दुरुस्ती कामासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागणार
heavy traffic on manor wada bhiwandi state highway closed due to crack in bridge near manor
पालघर: मनोर वाडा अवजड वाहतूक बंद; टेन जवळील पुलाच्या सुरक्षिततेबद्दल शंका
Nashik water
निम्म्या नाशिकमध्ये बुधवारी पुन्हा पाणी बंद

भोकरपाडा येथील जलशुद्दीकरण केंद्र ,मोरबे धरण ते दिघा या मुख्य जलवाहिनीवर देखभाल दुरुस्तीची महत्वाची कामे करणे अत्यावश्यक असल्याने शहरात सोमवारी सकाळी १०  ते मंगळवारी सकाळी १० वाजेपर्यंत भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा २४ तासासाठी बंद  ठेवण्यात आला होता. त्यामुळे नवी मुंबई महापालिकाक्षेत्रात सोमवारी संध्याकाळी व मंगळवारी सकाळी होणारा पाणीपुरवठा बंद  होता.परंतु हे काम पूर्ण करण्यासाठी मंगळवारी संध्याकाळपर्यंत काम सुरू होते. त्यामुळे  मोरवे धरणातून मंगळवारी संध्याकाळी उशिरा पाणीपुरवठा सुरू केल्याने शहरात मंगळवारी संध्याकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा झाला त्यामुळे काही भागात पाणी तुटवडा जाणवला. देखभाल दुरुस्तीच्या कामादरम्यान पालिकेने झोपडपट्टी परिसरात एमआयडीसी कडूनही पाणीपुरवठा केला होता. मंगळवारी संध्याकाळी ही काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा झाल्यामुळे नागरिकांना पाणी तुटवडा जाणवला.

देखभाल दुरुस्तीच्या अत्यावश्यक कामामुळे सोमवारी संध्याकाळी व मंगळवारी सकाळी पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता मंगळवारी संध्याकाळ पर्यंत काम सुरू असल्याने उशिराने मोरबे धरणावरून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला शहरातील सर्व भागात बुधवारी सकाळी नियमितपणे पाणीपुरवठा करण्यात येईल.अरविंद शिंदे, कार्यकारी अभियंता ,मोरबे प्रकल्प