scorecardresearch

यंदा पांढऱ्या कांद्याच्या हंगामाला विलंब, दरातही घसरण

अवकाळी पावसाने कांद्याच्या हंगामाला विलंब होत असून, दरातही घसरण झाली आहे

white onion
(फोटो सौजन्य- संग्रहित छायाचित्र, लोकसत्ता)

पूनम सकपाळ, लोकसत्ता टीम

नवी मुंबई: वाशी एपीएमसी बाजारात लाल कांद्यासह पांढरा कांदा ही दाखल होत आहे. आरोग्यासाठी गुणकारी ठरणाऱ्या पांढऱ्या कांद्याला उन्हाळ्यात विशेष मागणी असते. परंतु यंदा अवकाळी पावसाने कांद्याच्या हंगामाला विलंब होत असून, दरातही घसरण झाली आहे. मागील वर्षी प्रतिकिलो पांढरा कांदा २३-२५रुपयांनी उपलब्ध होता यावेळी मात्र १०-१५ रुपयांनी उपलब्ध आहे.

पांढऱ्या कांद्याची लागवड अलिबाग ,वसई ,नागपूर, नाशिक या ठिकाणी थोड्या प्रमाणात होते तर गुजरात मध्ये मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे पीएमसी बाजारात नाशिक,नागपूर इथून कमी तर गुजरात येथून मोठ्या प्रमाणावर पांढऱ्या कांद्याची आवक होते. वर्षभर बाजारात प्रमाणात तुरळक प्रमाणात पांढरा दाखल होत असतो, परंतु उन्हाळ्यात कांद्याचा हंगाम सुरू होतो. सध्या बाजारात लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर होत असून ग्राहक कमी असल्याने दरात सातत्याने घसरण पहावयास मिळत आहे. सध्या बाजारात दररोज कांद्याच्या शंभर ते दीडशे गाड्या दाखल होत आहेत. मात्र कांद्याला हवा तसा उठाव मिळत नसल्याने कांद्याचे दर घसरत आहेत.

आणखी वाचा- नवी मुंबई: गाड्यांच्या चाकांच्या चोरीने वाहनचालक हैराण, भंगार चोरी करणारी टोळी कार्यरत असल्याचा संशय

सध्या बाजारात लाल कांद्याची बंपर आवक होत आहे. त्यामुळे दरात घसरण होत आहे. यावर्षी मध्यंतरीच्या पडलेल्या अवकाळी पावसाने कांद्यांची लागवड उशिराने केली आहे . त्यामुळे कांदे उशिराने दाखल झाले आहेत. आज ही बाजारात पांढरा कांदा, गावरान कांद्याचा हंगाम सुरू होण्यासाठी एक ते दोन आठवड्याचा विलंब होत आहे. सध्या बाजारात अवघ्या १-२ गाड्या दाखल होत आहेत तेच मागील वर्षी ५ ते ६ गाड्या आवक होती. लाल कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याने पांढऱ्या कांद्याचे दरही गडगडले आहेत , अशी माहिती व्यापारी महेश राऊत यांनी दिली आहे.

आणखी वाचा- पनवेल पालिकेवर जनआक्रोश मोर्चात जेष्ठांपासून चिमुरडी मुले सहभागी

सध्या एपीएमसी बाजारात लाल कांद्याची आवक मोठया प्रमाणात होत आहे. तसेच कांद्याला हवा तसा उठाव नाही त्यामुळे दरात घसरण होत आहे. त्याच बरोबर यावर्षी पांढऱ्या कांद्याच्या हंगामाला विलंब होत आहे. शिवाय लाल कांदे दर घसरण त्यामुळे पांढऱ्या कांद्याचे दर ही कमी आहेत.
मनोहर तोतलानी
घाऊक व्यापारी, एपीएमसी

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-03-2023 at 18:04 IST
ताज्या बातम्या