scorecardresearch

भाज्यांचे घाऊक दर उतरणीला ; आवक पूर्ववत व ग्राहक कमी असल्याचा परिणाम

गुरुवारी एपीएमसीतील भाजीपाला बाजारात एकूण ५१८ गाडय़ा भाजीपाला आवक झाली.

नवी मुंबई : आवक रोडावल्याने गेल्या महिन्यात शंभरीपर्यंत गेलेले भाज्यांच दर आता उतरले आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजर समितीत भाज्यांची आवक वाढली आहे. त्यात ग्राहक कमी असल्याने दरात दहा ते वीस टक्केपर्यंत घट झाली आहे. मात्र भेंडी, गवार, हिरवी मिरची दर आजूनही ८० रुपये प्रतिकिलोच्या घरात आहेत. 

गुरुवारी एपीएमसीतील भाजीपाला बाजारात एकूण ५१८ गाडय़ा भाजीपाला आवक झाली. त्यामध्ये कोबी, फ्लॉवर, गाजर, हिरवी मिरची, टोमॅटो, शिमला इत्यादी भाज्यांचे दर १० ते २० टक्के कोसळले आहेत.

बाजारात नेहमी ६०० गाडय़ा आवक होते.  गुरुवारी ५१८ गाडय़ा आवक झाली. म्हणजे  ७५ ते ८० गाडय़ा आवक कमी होती. मात्र बाजारात ग्राहक कमी असल्याने दर कमी झाले आहेत.

गाजर, कोबी, फ्लॉवर आणखी स्वस्त होणार

जोधपूर, इंदूरबरोबर नाशिकमधील गाजर आवक होण्यास सुरुवात झाली असल्याने आवक वाढली आहे. तसेच हिरवी मिरची ही हैद्राबाद, कर्नाटक तर फरसबी ही नाशिक, पुणे येथून दाखल होत आहे. पुढील कालावधीत गाजर , कोबी, फ्लॉवर या भाज्यांचा स्वस्ताईचा हंगाम सुरू होईल.

भाज्यांचे घाऊक दर (रु/किलो)

भाजी          सध्याचे        आधीचे               

कोबी          २०-२२               ३२-३४

फ्लॉवर         २०-२२       २०-२२

हिरवी मिरची    ६५-७०       ७०-७५

टोमॅटो        १८-२०       ३२-३४

गवार         ६५-७०       ७५-८०

भेंडी          ६५-७०       ७५-८०

शिमला मिरची    ३६-४०       ४०-४४

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Wholesale prices of vegetables dropped by 10 to 20 percent zws

ताज्या बातम्या