माथाडी कामगारांच्या शासनाच्या कामगार, गृह, पणन खात्याअंतर्गत प्रलंबित विविध प्रश्नांची येत्या एक महिन्यात सोडण्यात येईल , असे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी मुंबई येथे बुधवार दि.२१ रोजी सह्याद्री अतिथीगृह, झालेल्या सर्व संबंधितांच्या बैठकित दिले.
महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी माथाडी कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भातील निवेदन महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांना सादर केले होते. त्यासंदर्भात त्यांनी संह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे सर्व संबंधितांची बैठक आयोजित केली होती, त्यावेळी कामगार मंत्र्यांनी सविस्तर चर्चा करुन हे आश्वासन दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> उरण : द्रोणागिरी नोड मधील अनधिकृत बांधकामांवर सिडकोचा हातोडा

माथाडी सल्लागार समितीवर अनुभवी कामगार नेत्यांची नियुक्ती करावी, सल्लागार समितीच्या वेळावेळी संयुक्त बैठका घ्याव्या, माथाडी मंडळाच्या पुनर्रचना करुन त्यावर कामगारांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या अनुभवी कामगार नेत्यांच्या नेमणुका कराव्यात, माथाडी मंडळाच्या कार्यालयीन सेवेत माथाडी कामगारांच्या मुलांची भरती करावी, माथाडी मंडळात चेअरमन व सेक्रेटरी यांच्या नेमणुका करणे, कामगार विभागाने काढलेला दि.०५/०३/२०१९ चा पतपेढ्यांबाबत काढलेला शासन जीआर रद्द करणे, फॅक्टरीमध्ये माथाडी कायदा व मंडळाच्या योजनेची अंमलबजावणी होणे, माथाडी कायदा व मंडळाच्या योजनेतील त्रुटी दूर करणे, टाटा मोटर्स लिमिटेड पिंपरी, पुणे येथील माथाडी बोर्डाच्या टोळी नं. ४९५ च्या प्रश्नांची सोडवणुक करणे, विविध रेल्वे यार्डात सुविधा उपलब्ध करुन देणे, माथाडी हॉस्पीटलच्या कामकाजाच्या चौकशीचा अहवाल समितीकडून तातडीने सादर करणे, कोल्हापूर रेल्वे यार्डातील कामगारांच्या प्रश्नांची सोडवणुक करणे, माथाडी कामगारांच्या हक्काच्या कामात अडथळा आणून कामगारांवर गुंडगिरी करणाऱ्यांचा बंदोबस्त करणे, नोंदीत माथाडी कामगारांना हक्काचे काम करण्यास पोलीस संरक्षण देणे, नाशिक येथिल कामगारांच्या लेव्हीच्या व नागपूर बाजार समितीतील कामगारांच्या प्रश्नांची सोडवणुक करणे, मापाडी कामगारांना बाजार समितीच्या सेवेत घेणे इत्यादी मागण्या प्रलंबित आहेत.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will solve the pending issues of mathadi workers within a month assurance of state labor minister suresh khade amy
First published on: 22-09-2022 at 19:39 IST