woman police constable commits suicide in navi mumbai zws 70 | Loksatta

नवी मुंबई: माझ्या आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नका

स्नेहा या सुमारे पाच वर्षा पासून नवी मुंबईतील कोपरखैरणे सेक्टर ५ येथे भाड्याच्या घरात राहत होत्या.

नवी मुंबई: माझ्या आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नका
प्रातिनिधिक फोटो

नवी मुंबई : माझ्या आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नका माझ्या आत्महत्येस कोणालाही जवाबदार धरू नका अशी चिठ्ठी लिहून पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका महिलेने गळफास घेत आत्महत्या केली आहे. स्नेहा थोरात असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव असून मुंबई पोलीस आयुक्तालय येथे त्या कार्यरत होत्या. स्नेहा या सुमारे पाच वर्षा पासून नवी मुंबईतील कोपरखैरणे सेक्टर ५ येथे भाड्याच्या घरात राहत होत्या.तर त्यांचा भाऊ स्वप्नील मोरे हा याच परिसरात राहत आहे. 

हेही वाचा >>> पनवेल : देवाचा प्रसाद देण्याच्या बहाण्याने बालिकेवर अत्याचार

गुरुवारी त्याने स्नेहा यांना अनेकदा फोन केला मात्र प्रतिसाद न दिल्याने त्यांनी स्नेहा यांचे घर गाठले. दरवाजाची कडी व बेल अनेकदा वाजवली तरीही आतून प्रतिसाद न मिळाल्याने दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी स्नेहा यांनी नायलॉन दोरी सिलिंग फॅनला बांधून गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्या. या बाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी आले व स्नेहा यांचा मृतदेह ताब्यात घेत पुढील तपासणी साठी मनपा रुग्णालयात दाखल केला.

स्नेहा यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत आपल्या आत्महत्येस कोणाला जवाबदार धरू नये असे नमूद करण्यात आले होते.स्नेहा या २०१४ च्या बॅचच्या आहेत. त्याची आत्महत्या ही दुर्दैवी घटना आहे.नैराश्यापोटी आत्महत्या हे उघड आहे. आत्महत्येस कोणालाही जवाबदार धरू नये असे लिहले असले तरी घटनेचा तपास आम्ही करीत आहोत . अशी माहिती पोलीस निरीक्षक गजानन कदम यांनी दिली.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-12-2022 at 12:07 IST
Next Story
पनवेल : देवाचा प्रसाद देण्याच्या बहाण्याने बालिकेवर अत्याचार