जागतिक महिला दिन फक्त शुभेच्छा न देता सर्वार्थाने महिलांमधील सुप्त गुणांचे कौतुक झाले पाहिजे . अशा गुणवान,यशवंत कर्तबगार महिलांचा कौतुक सोहळा साहित्य मंदिर वाशी येथे साजरा करण्यात आला.महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग,ग्रंथालय संचालनालय, मुंबई जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय ठाणे व वाशीतील प्रा.माणिकराव कीर्तने वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा कौतुक सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन महापालिका अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांच्या हस्ते करण्यात आले तर शालिनी इंगोले सहाय्यक ग्रंथालय संचालक मुंबई विभाग यांनी अध्यक्षपद भूषविले होते.

हेही वाचा >>>जिल्हा स्तरावर महिलांना बाजारपेठ उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट- गिरीष महाजन

3334 children underwent heart surgery under the National Child Health Programme
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ३,३३४ मुलांवर हृदय शस्त्रक्रिया! दोन कोटी बालकांची आरोग्य तपासणी…
Success Story Mira Kulkarni
एकट्या मातेची मेणबत्ती व्यवसायाने सुरुवात; भारतातील सर्वांत श्रीमंत महिलांच्या यादीतील स्थानापर्यंत गरुडझेप!
Golden Jubilee of Mumbai grahak Panchayat fighting for consumer rights
ग्राहकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या जागल्याचा सुवर्णमहोत्सव…
This video of an elderly cobbler and two stray dogs in Mumbai
“जगातील सर्व श्रीमंतापेक्षा श्रीमंत आहे हा व्यक्ती”! भटक्या कुत्र्यांना प्रेमाने थोपटणाऱ्या काकांचा हृदयस्पर्शी Video Viral

नवी मुंबईतील प्रसिद्ध कवियत्री तथा नवकवीयत्रींनी “संवाद नात्यांचा-कविता डॉट कॉम” या अनोख्या कार्यक्रमाद्वारे महिलांच्या विविध भावनांचे कंगोरे सहज उलगडून सभागृहाला मंत्रमुग्ध केले. सुजाता ढोले यांनी महिला दिनाचे उद्दिष्ट विशद करताना महिलांनी व्यक्त व्हायलाच हवा हा संदेश दिला. शालिनी इंगोले यांनी महाराष्ट्र सरकार महिलांसाठी राबवीत असलेल्या योजनांचा आढावा घेतला. जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रशांत पाटील यांनी ठाणे जिल्ह्यातील ग्रंथालयाचा लेखाजोखा मांडताना प्रा.माणिकराव कीर्तने वाचनालयाच्या सहयोगाबद्दल कौतुकोद्गगार काढले. प्रा.अश्विनी बाचलकर यांनी महिलांचा सर्व प्रांतातील वावर हा जागर सदैव असाच राहावा म्हणून भरभरुन शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा >>>नेरुळ विभागामध्ये कोट्यांवधीची वीजचोरी उघड करण्यात महिलांचे योगदान, २.३१ कोटींची विक्रमी वसुली

जागतिक महिला दिन आणि भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नवी मुंबईतील १०० महिलांचा भव्य सत्कार खास सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला. महिलांमध्ये विशेष कार्य करणाऱ्या शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय, समाजसेवा, कला, हॉस्पिटल,परिवहन इत्यादी अनेक क्षेत्रात कार्य करीत असलेल्या व उत्तुंग भरारी मारण्यासाठी तयार असणाऱ्या महिलांची निवड करण्यात आली होती. मराठी साहित्य,संस्कृती व कला मंडळाचे अध्यक्ष सुभाष कुळकर्णी यांनी सर्वांचे आभार मानले.