नेरुळ येथील वंडर्स पार्क हे नवी नवी मुंबई शहरातील लँडमार्क असून नवी मुंबई शहराबरोबरच उरण, पनवेल, ठाणे मुंबई या परिसरातील शहरातील अबाल वृद्धांचे महत्वपूर्ण प्रेक्षणीय ठिकाण आहे.सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या पार्कमध्ये विविध दुरुस्तीची तसेच नव्याने सुरु करण्यात येणाऱ्या आकर्षक खेळांची व्यवस्था करण्यात आली आहे. करोनाकाळापासून जवळजवळ अडीच वर्ष हे पार्क सर्वसामान्यांसाठी बंद आहे. त्यामुळे हे पार्क कधी सुरु होणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे.

हेही वाचा- नवी मुंबईतील शिक्षित भागातही वीज चोरी

Central Park in Thane, Thane,
ठाण्यातील सेंट्रल पार्ककडे पर्यटकांचा ओढा, पालिकेच्या तिजोरीत १ कोटी १६ लाखांचा महसूल जमा
Construction supervisor murder,
कोंढव्यात बांधकाम पर्यवेक्षकाचा चाकूने भोसकून खून; इमारतीवरून फेकून दिले
Mega block on Central Harbour and Trans Harbour route
मुंबई : मध्य, हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
Drain cleaning mumbai
नालेसफाईला सुरुवात, आतापर्यंत १५ टक्के गाळ काढला

वंडर्स पार्कचे संपूर्ण मेक ओव्हर करण्यात येत असून वीजव्यवस्थेसाठी आवश्यक असलेली काही कामे सुरु असून आकर्षक खेळण्यांची ट्रायल घेण्यात येत असल्याची माहिती अभियंता व उद्यान विभागामार्फत देण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वंडर्स पार्क मधील गजबज लवकरच पुन्हा अनुभवायला मिळणार आहे. शरद पवार यांच्या हस्ते या पार्कचे उद्घाटन करण्यात आले होते. वंडर्स पार्कमध्ये असलेली आकर्षक खेळणी, जगातील सात आश्चर्य दाखवणाऱ्या प्रतिकृती यासह अँम्पीथिएटर याबरोबरच आकर्षक तलाव खेळण्यासाठी असलेली प्रशस्त खेळण्याची जागा यामुळे येथे नेहमीच गर्दी पाहायला मिळत होती.

हेही वाचा- नवी मुंबई : कळंबोलीतील घरफोडीत २० तोळे सोने चोरी

नव्याने करण्यात आलेल्या कामामध्ये वंडर्स पार्कमध्ये म्युझिकल फाऊंटन लेझर शोसहित,ऑडिओ व्ह्युजअल यंत्रणा नविन बसविणे,तलावांची दुरूस्ती,वॉक वे सुधारणा,नव्याने विविध खेळांच्या साहित्याचे प्रकार बसवणे,खेळण्यांखालील रबर मॅट बदलणे,सर्व ठिकाणी सी.सी.टि.व्ही कॅमेरा बसविणे,प्रवेशद्वारावर बायोमॅट्रीक मशीन लावणे,नवीन विद्द्युत दिवे लावणे. उद्द्यानात आकर्षक कारंजे सुधारणा अशी जवळजवळ २१ कोटी पेक्षा अधिकच्या खर्चातून वंडर्स पार्कचे मेकओव्हर अंतिम टप्प्यात आले आहे. नेरुळमधील वंडर्स पार्कला नेहमीच मोठी गर्दी पाहायला मिळते.या उद्यानात नवी मुंबईसह ठाणे,खारघर,उरण,पनवेल येथुन टॉय ट्रेन तसेच विविध खेळण्यांची मजा घेण्यासाठी नागरीक येतात.परंतू आता खेळण्यांमध्ये ही वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे नव्याने सुरु होणाऱ्या वंडर्स पार्कची उत्सुकता सर्वांनाचं लागली आहे.

हेही वाचा- आरोग्य, शिक्षणासाठी शासकीय खर्च होणे गरजेचे ! माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

नवी मुंबई शहरात वंडर्स पार्क बरोबरच रॉक गार्डन निसर्ग उद्यान ,घणसोली पार्क, संवेदना उद्यान अशी अनेक उद्याने नागरिकांना आकर्षित करीत आहे. या वर्षाच्या अखेरीस हे पार्क नव्याने सुरुवात करण्याची जोरदार तयारी प्रशासनाने केली आहे. याच पार्कच्या शेजारी आकर्षक ठरणारे सायन्स सेंटरही अस्तित्वात येत आहे त्याचे कामही वेगाने सुरु असून या दोन्ही ठिकाणच्या वीजव्यवस्थेसाठी लागणारे सबस्टेशनचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या दोन्ही ठिकाणांची सबस्टेशन एकाच ठिकाणी असल्याने वंडर्स पार्क सुरु करण्यास उशीर होत असल्याचे बोलले जात आहे, या ठिकाणचे विद्युत विभागाचे काम कार्यकारी अभियंता सुनील लाड यांच्या मार्गदर्शनाखालीच विद्युत विभागाचे व सबस्टेशनचे काम सुरु आहे. महिनाभरात काम पूर्ण होऊन फेब्रुवारी अखेरपर्यंत वंडर्स पार्क सुरु करण्यासाठी पालिका प्रयत्नशील असल्याची माहिती पालिकेच्या उद्यान विभागाचे उपायुक्त नितीन नार्वेकर यांनी लोकसत्ताला दिली.

चौकट- वंडर्स पार्क येथे मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले असून खेळण्यांमध्ये ही वाढ करण्यात आली आहे तसेच याठिकाणी नव्याने सुरु करण्यात येणाऱ्या म्युझिकल शो यांसह या पार्कला अधिक देखणे रूप देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.या ठिकाणी असलेल्या विविध खेळण्यांची ट्रायल देखील सुरु करण्यात आली आहे. वंडर्स पार्क फेब्रुवारी अखेरपर्यंत सुरु करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. विद्युत विभागाचे काम अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती शहर अभियंता संजय देसाई यांनी दिली.

हेही वाचा- नवी मुंबई : रविवारी सुट्टीच्या दिवशीही वाहतूक कोंडी पिच्छा सोडेना

नवी मुंबईतील सीवूड नेरुळ आकर्षणाचे ठिकाण

सीवूड स्टेशन परिसरातच असलेला शहरातील मोठा व आकर्षक मॉल तर सीवूड्स स्थानकाच्या पूर्व दिशेला असलेले वंडर्स पार्क, रॉक गार्डन ,स्केटिंग पार्क, पारसिक हील, तर सीवूड पश्चिमेला असलेला पाम बीच मार्ग ज्वेल ऑफ नवी मुंबई यासारख्या नयनरम्य ठिकाणांमुळे नेरूळ व सीवूड्स परिसराला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे . वंडर्स पार्क लवकरच नव्याने सुरु होणार असल्याने छोट्या दोस्तांनाही याची उत्सकता लागून असल्याचे चित्र आहे.

वंडर्स पार्क लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी नवी मुंबईकरांकडून करण्यात येत आहे.पार्कमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले असून खेळण्यांसोबतच वंडर्स पार्कला नवा लुक देण्यात आलेला आहे. हे पार्क करोनापासून जवळजवळ अडीच वर्ष बंद होते .त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर हे पार्तक सुरु करावे, अशी मागणी माजी सभागृह नेते रवींद्र इथापे यांनी दिली.