वाहतूक कोंडीत भर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उरण : जेएनपीटी बंदराशी जोडणाऱ्या ३४८ क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावर नव्याने बांधण्यात येत असलेल्या आठ पदरी पुलावरील वर्षभरापूर्वी खचलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम कासवगतीने सुरू आहे. त्यामुळे दररोज जेएनपीटी बंदरात ये-जा करणाऱ्या शेकडो वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून वाहतूकदारांना वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे खचलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम १५ दिवसांत पूर्ण होईल असे भारतीय राज्य महामार्ग प्राधिकरणाचे संचालक प्रशांत फेगडे यांनी सांगितले होते. मात्र वर्षभरानंतरही दुरुस्तीचे काम पूर्ण झालेले नाही. यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.  मुंबई जेएनपीटी पोर्ट रोड कंपनीकडून जेएनपीटी परिसरात कोरिडॉर, आठ पदरी रस्ते तसेच सात उड्डाणपूल उभारण्यात येत असून ही सर्व कामे ‘एनएचआय’मार्फत सुरू आहेत. बहुतांश कामे मुदतीत झालेली नाहीत. त्यामुळे वारंवार संबंधित कामे पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. तरीही अनेक कामे अद्यापही रखडत रखडत सुरू आहेत.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Work damaged flyover slow ysh
First published on: 22-01-2022 at 00:02 IST