Yashashree Shinde Murder Case : उरण येथील युवतीच्या हत्येप्रकरणी दाऊद शेख याला कर्नाटकमधून अटक केली आहे. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याचे अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे दीपक साकोरे यांनी सांगितले. दरम्यान, पनवेल सेशन कोर्टाने ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
युवतीच्या पालकांनी २५ जुलै रोजी उरण पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. पोलिसांना उरण रेल्वे स्थानक परिसरात तिचा मृतदेह (Yashashree Shinde Murder Case) आढळून आला. तपासात दाऊद शेख नावाच्या युवकाचा व तिचा दूरध्वनी झाल्याचे समोर आले. दाऊद हा उरणमध्ये आढळला नाही. तो कर्नाटक येथील मूळ गावी गेल्याची शक्यता वर्तवली होती. मंगळवारी सकाळी दाऊदला अटक करण्यात आली. त्याच्याविरोधात अॅट्रोसिटअंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
#WATCH | Yashshri Shinde murder case | Accused Dawood was produced before Panvel Sessions Court today. He has been sent to 7-day Police custody. Sections of Scheduled Castes and Scheduled Tribes (Prevention of Atrocities) Act have also been invoked in the case.
— ANI (@ANI) July 31, 2024
(Video: Navi… pic.twitter.com/XxNc7nFt9v
याबाबत पोलीस अधिकारी साकोरे यांनी सांगितले की, दाऊद आणि ही युवती यांची ओळख होती. ते एकाच शाळेत होते. दाऊद करोनाकाळात कर्नाटकमध्ये गेल्याने त्यांचा संपर्क तुटला होता. सध्या तरी यात तो एकच आरोपी असून गुन्ह्यात त्याला कोणी मदत केली का, याशिवाय हत्येचे नेमके कारण काय आहे, आदी प्रकरणी तपास सुरू आहे, असे साकोरे यांनी सांगितले. ही युवती अल्पवयीन (Yashashree Shinde Murder Case) असताना दाऊदविरोधात तिच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कलमान्वये गुन्हा दाखल केला होता.
हेही वाचा >> Yashashree Shinde Murder Case : दाऊद शेखला अटक झाल्यानंतर यशश्रीच्या आईची थेट मागणी; म्हणाली, “टॉर्चर करून त्याला…”
आईने दिली संतप्त प्रतिक्रिया
“माझ्या मुलीला जेवढा त्रास झाला तेवढंच त्यालाही टॉर्चर करून फाशी दिली पाहिजे. हे प्रकरण फॅस्ट ट्रॅकवर चालवलं पाहिजे. माझ्या मुलीप्रमाणे ज्या मुली तडफडून गेल्या आहेत, त्यांनाही न्याय द्या. म्हणजे माझ्या लेकीलाही समाधान मिळेल. पण माझ्या मुलीला त्याने जेवढा त्रास दिला तेवढाच त्रास त्याला द्या आणि फाशी द्या. सध्या प्रकरण चर्चेत आहे म्हणून शिक्षेचं आश्वासन दिलं जाईल. पण त्याला फाशी दिलीच पाहिजे”, अशी प्रतिक्रिया यशश्रीच्या (Yashashree Shinde Murder Case) आईने दिली.