News Flash

डच अ‍ॅडमिरल डी लॅनॉय (१)

डी लॅनॉय हा मूळचा हॉलंडचा निवासी.

युरोपातील विविध देशांमधील अनेक धाडसी तरुण, लष्कराचा अनुभव असलेले सेनाधिकारी सतराव्या अठराव्या शतकात हिंदुस्थानात येऊन येथील संस्थानिकांकडे लष्करात नोकरीस लागले. त्यातील काहींनी आपल्या कर्तबगारीने आपली विशेष ओळख करून ठेवली आहे. त्रावणकोरच्या महाराजा मरतड वर्माच्या आरमाराचा अ‍ॅडमिरल डी लॅनॉय हा त्यापकी एक.

डी लॅनॉय हा मूळचा हॉलंडचा निवासी. याचे पूर्ण नाव युस्टॅशियस डी लॅनॉय, जन्म इ.स.१७१५ मधील दक्षिण हॉलंडमधील बेल्जियन परगण्यातला. वडीलही सन्यातच होते. बालपण समुद्रकाठी गेल्यामुळे एक दर्यावर्दी बनण्याचे स्वप्न पाहणारा डी लॅनॉय डच ईस्ट इंडिया कंपनीच्या आरमारात नोकरीस लागला. या काळात डच ईस्ट इंडिया कंपनीचा व्यापार हिंदुस्थानात प्रामुख्याने केरळच्या मलबार किनारपट्टीवर चालत होता. मिरे आणि मसाल्याचे पदार्थ, मोती, कापड वगरे वस्तू खरेदी करून युरोपियन प्रदेशात विकणारी ही कंपनी जगातली तत्कालीन सर्वात मोठी बहुराष्ट्रीय कंपनी म्हणता येईल. आíथकदृष्टय़ा संपन्न बनलेल्या या कंपनीकडे चांगले प्रबळ लष्कर आणि नौदलही होते. केरळातील सर्व प्रदेशातल्या मिरे आणि मसाल्याच्या पदार्थाच्या व्यापारावर पूर्णपणे आपली हुकूमत बसवण्याचा या कंपनीचा प्रयत्न चालला होता. १७२९ साली त्रावणकोर राज्याच्या राजेपदी आलेला थिरूनाल मरतड वर्मा हा केवळ राजकीय मुत्सद्दी आणि कार्यकुशल प्रशासकच नव्हता, तर युद्धकुशल सेनानीही होता. त्याने आपले समर्थ नौदल उभे करून दक्षिण भारतातले एक प्रबळ राज्य बनवले. मरतड वर्माने कन्याकुमारीच्या आसपासचे अनके जहागीरदार आणि सरंजामदार, छोटी राज्ये यांना लढायांमध्ये पराभूत करून राज्यविस्तार केला. त्याने पराभूत केलेल्या अनेक जहागीरदार, सामंतांशी त्या काळात डच ईस्ट इंडिया कंपनीचा व्यापारी संबंध होता. मरतड वर्माने या सामंत, जहागीरदारांकडून डच कंपनीला मिळणारे मसाल्याचे पदार्थ आणि इतर माल अत्यंत चढय़ा किमतीला देण्यास सुरुवात केल्यावर डच ईस्ट इंडिया कंपनी आणि त्रावणकोर राज्य यांच्यात १७३९ पासून चकमकी उडायला लागल्या.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 10, 2018 2:23 am

Web Title: admiral de lenoy
Next Stories
1 टंगस्टनसारखा कोणी नाही..!
2 कुतूहल : भक्षक लांडगा आणि जड दगड
3 जे आले ते रमले..: लँबटनचे कष्टसाध्य सर्वेक्षण (२)
Just Now!
X