१९३३ साली बर्लिन आणि जर्मनीत नॅशनल सोश्ॉलिस्ट पक्षाची सूत्रे हिटलरने आपल्या ताब्यात घेतल्यावर प्रथम त्याचे राजकीय विरोधक त्याने संपवले. त्यानंतर हिटलरने १ एप्रिल १९३३ रोजी प्रथमच बर्लीनमधील ज्यू डॉक्टर्स, ज्यू वकील आणि इतर ज्यू व्यावसायिक यांना इतर सर्व जर्मन नागरिकांनी वाळीत टाकण्याचे आवाहन केले. १० मे रोजी हिटलरने त्याला नको असलेले तत्त्वज्ञान सांगणारी पुस्तके जाळण्याचा कार्यक्रम त्याच्या नाझी पक्षामार्फत हाती घेतला. बर्लिनमधल्या युनिव्हर्सटिीच्या समोरच्या चौकात एक ज्यूंची मोठी लायब्ररी होती. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या लायब्ररीच्या सर्व वीस हजार पुस्तकांची होळी केली. १९३३-३४ या वर्षांमध्ये हिटलरला विरोध करणाऱ्या बर्लिनच्या ९६ नगरसेवकांना त्याने देहांताचे शासन केले. या घटनेचे स्मारक म्हणून पुढे एका चौकात ९६ काळ्या फरशा बसविलेल्या आहेत आणि जवळच्या एका बेल टॉवरवर ९६ घंटा बसवल्या आहेत. येथल्या हुम्बोल्ट विद्यापिठातच कार्ल मार्क्‍सने शिक्षण घेतले. विरोधक आणि ज्यू लोकांचे शिरकाण आणि हिटलरची हडेलहप्पी यामुळे बíलनमधले वातावरण जरी भयग्रस्त असले तरी काही क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रमही हिटलरने हाती घेतले. १९३६ 6 साली बर्लिनमध्ये जगातील पहिले दूरदर्शन प्रक्षेपण केंद्र सुरू झाले. १९३६ सालीच अकरावा ऑिलपिक क्रीडा महोत्सव बíलनमध्ये भरवला गेला. १९३७ साली बर्लिन शहर स्थापनेला सातशे वष्रे झाली. त्या स्मरणार्थ मोठा महोत्सव साजरा केला गेला. मार्च १९३८मध्ये हिटलरने ऑस्ट्रिया गिळंकृत केले आणि ज्यूंचा खरा छळवाद सुरू झाला. ९ नोव्हेंबर १९३८ रोजी ‘काच फोडीची रात्र’ या उपक्रमाखाली नाझी पक्ष कार्यकर्त्यांनी ज्यूंच्या बारापकी नऊ प्रार्थनामंदिरांना आग लावून ती भस्मसात केली, ज्यूंची दुकाने लुटली, त्यांच्या घरांवर दगडफेक करून बाराशे ज्यूंना पकडून त्यांची छळछावण्यांमध्ये रवानगी करण्यात आली.

– सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com

Solapur Murder wife, Solapur, Murder second wife,
सोलापूर : तीन घरांच्या दादल्यात आर्थिक कारणांवरून दुसऱ्या पत्नीचा खून, रक्ताने माखलेल्या चाकूसह पती पोलिसांत हजर
nashik crime news, nashik frau marathi news
नाशिकमध्ये कर्जदारांची मालमत्ता ताब्यात घेत फसवणूक, दोन सावकारांविरोधात गुन्हा; छाप्यात करारनामे, कोरे मुद्रांक, धनादेश जप्त
Hyderabad Inter-Faith Couple Attacked By Muslim
हैदराबादमध्ये आंतरधर्मीय जोडप्यावर हल्ला, VIDEO व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून कारवाई, ४ जण गजाआड
bengluru crime news
‘नवविवाहित दाम्पत्याचे खिडकी उघडी ठेवून शरीरसंबंध’, शेजारणीची पोलिसांत तक्रार

 

मटकी

मटकीची ओळख आपल्याला अगदी लहानपणापासून शिजवलेली उसळ या स्वरूपात  आहे. मटकी ही मूलत: भारतीय असून ऑस्ट्रेलिया, अमेरिका, थायलंड व आशिया खंडात तिची लागवड केली जाते. मटकीचे शास्त्रीय नाव ‘व्हिग्ना अकोनिटीफोलिया’ असे आहे. या वेलवर्गीय वनस्पतीची लागवड पाण्याची कमतरता असलेल्या भागात केली जाते. कोरडय़ा आणि शुष्क जमिनीत मटकीचे चांगले उत्पादन येते.

मटकीची मुळे मांसल असून पाने संयुक्त प्रकारची असतात. खोडावर आणि फांद्यांवर लव असते. मटकीच्या झुडपावर पिवळ्या रंगाची फुले मंजिरींच्या रूपात येतात. फुलांच्या पाकळ्यांची रचना वाटाण्याच्या पाकळ्यांच्या रचनेप्रमाणे असते. फुलांमध्ये स्वपरागणामुळे बीजोत्पादन होते. लेग्यूमिनोसी या कुळातील ही वनस्पती आहे.

फॉस्फरस, मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शिअम, सोडिअम, िझक, लोह, मँगेनिज ही खनिजे मटकीत प्रामुख्याने आढळून येतात. याचबरोबर मोठय़ा प्रमाणात जीवनसत्त्वाचा साठा असतो. यात मुख्यत: निअ‍ॅसिन, थायमीन (बी १), रायबोफ्लेवीन (बी २), बी ५, बी ६, फोलेट (बी ९) ही जीवनसत्त्वे आढळतात. पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेली तंतूमय कबरेदकेसुद्धा मटकीत भरपूर प्रमाणात असतात. या सर्व गुणधर्मामुळे अन्न म्हणून मटकी सर्वोत्तम आहे. मोड आलेल्या मटकीच्या उसळीतून आपल्याला वरील सर्व जीवनसत्त्वे मिळू शकतात. मोड आल्यामुळे त्यातील प्रथिने पचायला सोपी होतात. मोड न आलेल्या कडधान्यांत काही द्रव्ये असतात. ही द्रव्ये म्हणजे टॉनिन, फायटिक अ‍ॅसिड आणि ट्रिप्सिन इनहिबीटर जेव्हा आपण कडधान्य पाण्यात भिजवतो तेव्हा त्यातील  फायटिक अ‍ॅसिड आणि ट्रिप्सिन इनहिबीटर यांचे प्रमाण कमी होते, म्हणूनच मोड आलेली कडधान्ये खावीत, असा सल्ला डॉक्टर नेहमी देत असतात. आरोग्यशास्त्रात मटकी पित्तविकारावर अत्यंत गुणकारी आहे. पचनसंस्था व हृदयासाठी बलवर्धक आहे असे नमूद केले आहे.

मटकी खाणे हे जसे माणसासाठी उपयुक्त आहे तसेच जमिनीची धूप थांबावी म्हणून मटकीची लागवड अत्यंत उपयुक्त ठरते. मटकीचा पाला गुरांना चारा म्हणून उपयोगी पडतो. मटकीचे पर्यावरणीय महत्त्व लक्षात घेऊन आंतरपीक म्हणून आणि जमिनीची धूप थांबवण्यासाठी मटकीची लागवड मोठय़ा प्रमाणात केली पाहिजे.

 

 

– डॉ. मनीषा करपे
मराठी विज्ञान परिषद, 
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org