ऑस्ट्रेलियातील स्टायलो व सिरॅटो या गवतांचा अभ्यास करून जयंतराव पाटील यांनी ती पिके ठाणे जिल्ह्यातील कोसबाड येथे लावली व त्या हवामानात ती यशस्वी करून दाखवली. या पिकांचा चारा गुरांना दिल्यामुळे दूध उत्पादनात वाढ झाली. हे पाहून कृषीतज्ज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांनी ही पिके भारतभर लावावीत, असा सल्ला दिला. अ‍ॅस्परॅगस (शतावरी)ची एक मौल्यवान अमेरिकन भारतात आणून जयंतरावांनी ते इथल्या हवामानातही वाढवले.१९२७ साली ठाणे जिल्ह्यातील बोर्डी येथे जन्मलेले डॉ. जयंत शामराव पाटील यांचे शिक्षण बोर्डी, पुणे व कॅन्सास विद्यापीठ येथे झाले. नंतर ते कोसबाडच्या कृषी संस्थेत काम करू लागून तेथे ३४ वष्रे राहिले.कोसबाडला त्यांनी जलसंधारणासाठी पृष्ठभाग विहीर, हिरवळ खते, तीन पिकांचे चक्र, सकस चाऱ्याची पिके, फलोत्पादन, आहार बगीचे आणि कृषी वनीकरण या वनवासींना उपयुक्त तंत्रज्ञानाचा प्रसार केला. यामुळे वनवासींना अन्नसुरक्षा मिळाली. वनवासींच्या जमिनीवर उत्पादक रोजगार निर्माण झाल्यामुळे त्यांची गरिबी कमी झाली. हे करत असताना पर्यावरणाचा समतोल त्यांनी टिकवून धरला. त्यामुळे वनवासींचा शाश्वत विकास होऊ शकला. भारत सरकारच्या कृषी संशोधन परिषदेने शेतकरी व मच्छिमार यांना कौशल्य शिक्षण देण्यासाठी कोसबाडला एक केंद्र स्थापन केले व त्याचे डॉ. जयंतराव पाटील पहिले संचालक झाले. या केंद्रात वनवासी शेतकऱ्यांना धान्यपिके, भाजीपाला लागवड, फलोत्पादन, जनावरांचे संगोपन, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन व मत्स्यपालन याविषयी कौशल्य शिक्षण दिले जाते. जयंतरावांच्या कारकीर्दीत आदिवासींनी शेती उत्पादन, वाढवले, रोपवाटिका तयार केल्या, फळप्रक्रिया उद्योग सुरू केले व ती परंपरा आजही चालू आहे. १९८१ साली महाराष्ट्र शासनाने फलोत्पादन विभाग सुरू केला व ते त्याचे पहिले सल्लागार झाले. त्या काळात महाराष्ट्रात फलोत्पादनाचे प्रमाण बरेच वाढले. रेशीम व अन्नप्रक्रिया उद्योगासही त्यांनी खादी ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष म्हणून चालना दिली. १९९१ साली ते भारत सरकारच्या नियोजन आयोगाचे सदस्य झाले. त्यावेळी त्यांच्याकडे कृषी, ग्रामविकास, जलसिंचन, पंचायती राज, सहकार व ग्रामीण ऊर्जा या विषयांची जबाबदारी होती. पालघर तालुक्यातील अस्वली धरणाला त्यांनी चालना दिली. आयुष्यभरात त्यांना अनेक पुरस्कार मिळाले.

जे देखे रवी.. – स्वसंवेद्या
हा ज्ञानेश्वरीतला तिसरा शब्द.
परवा ही आधी फोनवर बोलत होती, मग मोलकरणीला सुनवत होती, मग खिडकीतल्या कावळ्याला दरडावत होती. मी गपचूप बसलो होतो तर मला काही तरी सांगू लागली. मी तिला म्हटले, ‘अगं, किती बोलतेस तू?’ तेव्हा म्हणाली, ‘तू पांढऱ्यावर काळं करत असतोस तेही बोलणंच असतं.’ अर्थात ही अबोला धरूनही बोलू शकते. एकदा सकाळी मी कामाला जायच्या आधी  येरझाऱ्या घालत होती. मला काही समजेना मी म्हणालो, ‘आजचं सकाळचं फिरणं घरातच काय?’ तरी बोलेना. मी म्हटले, ‘झालं तरी काय?’ तेव्हा म्हणाली, ‘स्वत:ला शहाणा समजतोस, वर्तमानपत्रावरची तारीखही तुला वाचता येत नाही.’ मग डोक्यात लख्ख प्रकाश पडला. तिचा वाढदिवस होता. हा माझा अपराधच. ४९ वर्षे लग्नाला झाली. एवढय़ा वर्षांची मैत्रीण माझी आणि मी वाढदिवस विसरलो, पण त्याहून वाईट स्वमग्नपणाचा कळस गाठला होता.
शेवटी माणसे भाषेवर जगतात. आणि त्यातल्या त्यात भावनिक भाषेवर जगतात. कपाळावरच्या आठय़ा हीसुद्धा भाषा असते. गाडीचा हॉर्न वाजवण्याचेही प्रकार असतात. पत्र संपताना तुझा, तुमचा, आपला असे लिहितात तेव्हा सूक्ष्म फेरफार असतो. भाषेच्या अधारेच, चांगले-वाईट, सत्य-असत्य ठरत असते. चांगले-वाईट अर्थातच काळानुरूप बदलते. विज्ञानात सत्य-असत्य नव्या दृष्टिकोनातून पाहिले जाते. किंबहुना तत्त्वज्ञानात ‘माणूसजात जन्मायच्या आधी सूर्योदय किंवा चंद्राची कोर सुंदर होती की नाही,’ असा प्रश्न विचारण्याची पद्धत आहे. हा प्रश्न मोठा जटिल आहे. सौंदर्य अनुभवल्यानंतर त्याचे वर्णन केले जाते. अनुभव आणि वर्णन दोन्ही नसेल तर सौंदर्य कोठले, असा प्रश्न तयार होतो. उत्तर असे असते की, संवेदना असलेल्या जगातच अनुभव घेता येतात आणि हे अनुभव दुसऱ्याला सांगता येतात. जे मनोविश्व संवेदनांपासून मुक्त होते तिथे सगळे अळीमिळी गुपचिळी असते. आणि केवळ चैतन्याची ज्योत पाजळत राहते. दहा मिनिटे असे करण्याचा प्रयत्न केला तर जेमतेम दहा सेकंद जमते. माणूस जात जन्मायच्या आधी सूर्योदयाबरोबर पक्ष्यांची किलबिल सुरू होत असणार. पक्षी-प्राणी नसतानाही वसंतपालवी फुटली असणार.. किरणांच्या संवेदनाच्या आधारे. त्याच्याही खूप आधी विश्वाची बॅग उघडून हे सारे बाहेर पडायच्या आधी काय असणार? ज्याच्यामुळे या सगळ्या संवेदना झाल्या तो काय संवेदनाशून्य असणार आहे का? तिथेही काही तरी घुमत असणारच, पण तो घुमणारा आणि ऐकणारा एकच एवढाच फरक. इथे सत्य-असत्य, चांगले-वाईट हे गुंडाळून ठेवलेले असते.
विश्वाची बॅग अजून उघडायची असते. तेव्हाचा हा स्वसंवेद्य.
– रविन मायदेव थत्ते  rlthatte@gmail.com

Farmers, Farmers news,
प्रकल्प घोषणेपूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे
Kolhapur Police arrest gang selling fake notes
बनावट नोटांची छपाई, विक्री करणारी टोळी कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात; म्होरक्याचे नेत्यांशी लागेबांधे असल्याची चर्चा
Why did Nitin Gadkari say that blockade the forest officials in Gadchiroli
“वनविभाग ‘झारीतील शुक्राचार्य’; त्यांच्या अधिकाऱ्यांना घेराव घाला”, नितीन गडकरी गडचिरोलीत असे का म्हणाले…
Raju Shetty
शेतकरी, कामगारांचा आवाज संसदेत बेधडकपणे मांडण्यासाठी विजयी करा – राजू शेट्टी यांचे आवाहन

वॉर अँड पीस – मूतखडा : भाग-२
लक्षणे- वृक्क (किडनी), मूत्रवाहिनी, मूत्राशय, पाठ, कंबर, ओटीपोट या भागांत कळा मारणे, काही वेळेस त्या कळा असहय़ होणे. लघवी अडखळत, थोडी थोडी व काही वेळेस दोन धारा असलेली होणे. लघवीला लाल रंग येणे. लघवी भरपूर प्रमाणात तयार होणे, पण त्या प्रमाणात बाहेर न पडणे. लघवीसंबंधी अजिबात कसलाच त्रास न होणे, मूतखडा आहे हेसुद्धा कोणत्याच लक्षणावरून न कळणे, परंतु हातापायांवर, चेहऱ्यावर सूज येणे, रक्तदाब वाढणे, रक्तदाब वाढल्यामुळे दृष्टिदोष निर्माण होणे.
कारणे- खूप थंड, खूप उष्ण, गोड, तिखट, कफवर्धक, पचावयास जड, तेलकट, तुपकट, चहा, टोमॅटो, तीळ, कोबी, खूप बियांचे वांगे, काकडी, पालेभाज्या अशा पदार्थाचा जेवणात अतिरेक असणे. झोप, विश्रांती, कामाच्या वेळा यांच्याकरिता असलेले आरोग्याचे सामान्य नियम न पाळणे. शौचाचा व लघवीचा वेग अडविणे, विशेषत: लघवीस वेळेवर न जाणे. चहा, विडी, तंबाखू, कोल्ड्रिंक, मद्य यांचे अधिक सेवन करणे. वेडीवाकडी आसने, अवघडून बसणे, कसरतीचे वा मेहनतीचे ताकदीपेक्षा अधिक श्रम. वेदनाशामक ए.पी.सी. असलेल्या गोळय़ा बराच काळ घेणे.
शरीर व परीक्षण- पाठ, कंबर व ओटीपोट या मूत्रवह स्रोतसाच्या मार्गात सूज/ दुख आहे का, हे स्पर्शाने अवश्य बघावे. मूत्राची वारंवार तपासणी करून त्यात गढूळपणा, आम्लता, सिकताकण, शर्करा यांच्याबद्दल खात्री करून घ्यावी. जेवढय़ा प्रमाणात लघवी व्हावयास हवी तेवढी होते का यावर बारकाईने लक्ष हवे.
उपचारांची दिशा- शरीरात मूत्र तयार होणाऱ्या वृक्कामध्ये (किडनी) भरपूर मूत्र तयार होऊन त्याचा परिणाम, मूतखडे विरघळवण्यात किंवा त्यांना गती देण्याकडे व्हावयास हवा. कालच्यापेक्षा आज लघवीचे प्रमाण वाढत आहे का हे पहावे. लघवी सहजपणे व्हावयास हवी. आपल्या मूत्रपिंडाची रचना व कार्य पाण्याचे जिवंत झरे असलेल्या विहिरीसारखे आहे. आपल्या मूत्रपिंडाने अशा जिवंत विहिरीसारखे काम केले पाहिजे.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत   – ३ जून
१८८२> विसाव्या शतकाच्या उदयकाळातील स्त्रीजीवन अत्यंत ताकदीने व त्या काळातल्या पुरोगामी विचारांनिशी मांडणाऱ्या कथाकार आनंदीबाई शिवराम शिर्के (माहेरचे नाव अनसूया गोविंदराव शिंदे) यांचा जन्म. बडोद्यातील मिस मेरी भोर यांच्या या शिष्येने ‘कुमारी आनंदी’ या नावाने कुमारवयातच लेखन सुरू केले होते. कथाकुंज, कुंजविकास, जुईच्या कळय़ा, भावनांचे खेळ व इतर गोष्टी, गुलाबजाम, तृणपुष्पे, साखरपुडा असे त्यांचे कथासंग्रह प्रकाशित झाले. ‘सांजवात’ या त्यांच्या आत्मचरित्रातून पुरोगामी सामाजिक भान आणि समाज यांच्यातील नाते उलगडते. आनंदीबाईंनी बालसाहित्यही लिहिले होते.
१८९८ > ‘जातिभेद विवेकसार’ हा ग्रंथ लिहिणारे, संतवाङ्मयाचे अभ्यासक आणि संपादक तुकारामतात्या पडवळ यांचा जन्म. ‘तत्त्वविवेचक’ छापखान्याचे ते संचालक होते. ‘तुकारामबाबा व त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा (दोन खंडांत) व ‘श्री एकनाथ महाराजांच्या अभंगांची गाथा’ ही त्यांची संपादने महत्त्वपूर्ण ठरली.
१९५६ >  नाटककार वीर वामनराव जोशी यांचे निधन. ‘राक्षसी महत्त्वाकांक्षा’ आणि ‘रणदुंदुभी’ ही त्यांची नाटके रंगभूमीवर गाजली. ‘हिंदुस्थान’ साप्ताहिक त्यांनी चालविले होते.  
– संजय वझरेकर