डच कंपनीच्या न्यू अ‍ॅमस्टरडॅम या वसाहतीवर १६६४ साली ब्रिटिशांनी अंमल करून डय़ूक ऑफ यॉर्कच्या नावाने या वसाहतीला नाव दिले – न्यूयॉर्क. त्यावेळी इंग्लंडच्या राजेपदी चार्ल्स द्वितीय होता. या चार्ल्स द्वितीयने ही न्यूयॉर्कची वसाहत त्याचा भाऊ डय़ूक ऑफ यॉर्क (हाच पुढे राजा जेम्स द्वितीय झाला) याला भेट दिली.
अमेरिकेत स्थापन झालेल्या तेरा युरोपियन वसाहतींवर वर्चस्व होते बिटिश पार्लमेंटचे. ब्रिटिशांनी नव्यानेच लागू केलेले स्टँप अ‍ॅक्ट, टाऊनशेंड टॅरीफ आणि टी अ‍ॅक्ट या जाचक कायद्यांमुळे वसाहतींवर अवास्तव करांचा बोजा लादला गेला. या कायद्यांमुळे वसाहतींमध्ये असंतोष पसरून त्याचे रूपांतर ब्रिटिश सत्तेविरुद्ध आंदोलन आणि पुढे १७८१ मध्ये त्याची परिणिती वसाहतींनी ब्रिटिश सरकारचे जोखड उतरवून त्या स्वतंत्र होण्यात झाली.
२५ नोव्हेंबर १७८३ रोजी शेवटच्या ब्रिटिश सन्य तुकडीने न्यूयॉर्क शहर आणि अमेरिका सोडली. त्याच दिवशी तेरा अमेरिकन वसाहतींचे सेनाप्रमुख जॉर्ज वॉिशग्टन यांचे न्यूयॉर्क मध्ये विजेत्याच्या दिमाखात आगमन झाले. पुढे अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचे संविधान तयार होण्यापूर्वी जानेवारी १७८५ ते मार्च १७८९ या काळात वसाहतींच्या फेडरेशनची काँग्रेस न्यूयॉर्क शहरात भरली. अमेरिकन संयुक्त संस्थानांचे संविधान वसाहतींच्या राज्यसंघाने स्वीकारल्यावर मार्च १७८९ मध्ये न्यूयॉर्क शहर हे संयुक्त संस्थानांचे पहिल्या राजधानीचे ठिकाण घोषित झाले.
न्यूयॉर्क शहरातील वॉल स्ट्रीटवरील फेडरल हॉल येथे डिसेंबर १७९० पर्यंत काँग्रेसची (अमेरिकी द्विदल कायदेमंडळाची) सभागृहे भरली. अमेरिकन संयुक्त संस्थानांचे पहिले उच्च न्यायालय या फेडरल हॉलमध्येच भरले, जॉर्ज वॉिशग्टन यांची संयुक्त संस्थानांच्या पहिल्या अध्यक्षपदाची घोषणा न्यूयॉर्क शहरात याच फेडरल हॉलमध्ये झाली. डिसेंबर १७९० नंतर संयुक्त संस्थानांची राजधानी न्यूयॉर्कहून फिलाडेल्फिया येथे हलविण्यात आली.
– सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com

 
भारतीय वनस्पतिशास्त्रज्ञ : डॉ. बी. बी. मुंडकुर
डॉ. भालचंद्र भवानीशंकर मुंडकुर यांचा जन्म कर्नाटकातील मुंडकुर या गावी २६ जून १८९६ मध्ये झाला. हायस्कूल परीक्षा १९१५ मध्ये उत्तीर्ण केल्यानंतर त्यांचे कॉलेजचे प्राथमिक शिक्षण मंगलोर येथील सेंट अ‍ॅलोसीस कॉलेजमध्ये झाले. नंतर त्यांनी मद्रासच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि बी.ए. ऑनर्स (वनस्पतीशास्त्र) प्रथम श्रेणीत उत्तीर्ण करून सुवर्णपदक मिळविले. शिक्षण संपवून काही काळ ते कलकत्त्यास कृषी अधिकारी म्हणून कार्यरत होते; परंतु १९२२ सालानंतर त्यांनी त्यांचे व्यावसायिक आयुष्य पूर्णपणे मायकोलॉजी आणि वनस्पती विकृतिशास्त्रासाठी वापरले. डॉ. मुंडकुर १९२२-२८ या दरम्यान धारवाड येथे असिस्टंट मायकोलॉजिस्ट म्हणून कापूस संशोधन केंद्रात होते.
१९२९ साली पुढील शिक्षणासाठी त्यांनी अमेरिकेस प्रयाण केले आणि आयवा स्टेट कॉलेज ऑफ अ‍ॅग्रिकल्चरमधून १९३१ साली पीएच.डी. मिळवली. त्यांचा विषय होता मायकोलॉजी आणि वनस्पती विकृतिशास्त्र. अमेरिकेतून परतल्यावर त्यांची नियुक्ती मायकोलॉजिस्ट म्हणून दिल्लीला इंडियन अ‍ॅग्रिकल्चर रीसर्च इन्स्टिटय़ूट येथे झाली. १९४७ साली त्यांची निवड प्रथम उपसंचालक, संचालक (वनस्पती संरक्षण), क्वारंटाइन अ‍ॅण्ड स्टोरेज या विभागात झाली. हे काम भारत सरकारच्या अन्न आणि कृषी विभागात येते. निवृत्त झाल्यावर प्रो. मुंडकुर पुणे विद्यापीठात वनस्पतिशास्त्राचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. डॉ. मुंडकुरांनी ८० शोधनिबंध प्रकाशित केले. त्यांनी १९४९ साली अभ्यासक्रमावर आधारित एक पुस्तक प्रकाशित केले- ‘फन्जाय अ‍ॅण्ड प्लांट डिसिजेस’. त्यांनी नवीन चार प्रजाती आणि १००हून अधिक जातींचा शोध लावला. त्यांनी एक मोनोग्राफ ‘उस्टीलोजिनोलिस ऑफ इंडिया’ लिहिला, ज्याचे प्रकाशन ‘कॉमनवेल्थ मायकालॉजिकल’ संस्थेतर्फे करण्यात आले. एका बुरशी वर्गातील वनस्पतीच्या प्रजातीला ‘मुंडकुरीएल्ला’ असे त्यांचे नाव देऊन त्यांना डॉ. तिरुमलाचार यांनी सन्मानित केले.
प्रा. मुंडकुर अमेरिकन फायटो पॅथॉलॉजिकल सोसायटी ऑफ सिग्मा क (वरअ) चे सदस्य होते. ते इंडियन फायटो पॅथॉलॉजिकलचे अध्यक्ष होते. त्यांनी इंडियन बोटॅनिकल काँग्रेसचे वनस्पती विभागाचे अध्यक्षपद १९५१ साली भूषविले. डॉ. मुंडकुर भारत सरकारच्या कृषी मिशन, जे अफगाणिस्तान येथे पाठविण्यात आले होते, ते त्यांचे सन्माननीय सदस्य होते. मुंडकुर यांचा मृत्यू डिसेंबर १९५२ मध्ये पुणे येथे झाला.
– डॉ. सी. एस. लट्ट,
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org

Gukesh vs Ian Nepo ends in a draw
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा : गुकेश-नेपोम्नियाशी लढत बरोबरीत, संयुक्त आघाडी कायम; विदितने प्रज्ञानंदला रोखले; कारुआना, नाकामुरा विजयी
mexico suspends diplomatic relations with ecuador after raid on embassy
मेक्सिको, इक्वेडोरचे राजनैतिक संबंध संपुष्टात; दूतावासातील इक्वेडोरच्या कारवाईनंतर मेक्सिकोचा निर्णय
baltimore
US Bridge Collapse: धोक्याची सूचना देणाऱ्या भारतीय खलाशांचे जो बायडेन यांनी मानले आभार
america bridge collapse
विश्लेषण : अमेरिकेत ४७ वर्ष जुना पूल कसा कोसळला? किती जणांनी गमावला जीव?