जंगलात फिरताना वन्य प्राण्यांचा मागमूस काढता यावा लागतो. जंगलात प्राण्यांच्या विष्ठेतून अनेक गोष्टी उलगडतात. म्हणजे अगदी त्याच्या अस्तित्वापासून, त्याच्या अन्नापर्यंत.. त्याने अन्न कधी आणि कुठे खाल्ले, त्याचा अधिवास आणि त्याचा ऋतूंप्रमाणे केलेला वापर, अन्नग्रहण केल्याची वेळ, त्याचे पचन झाले की नाही, त्याच्या आतडय़ातील जीवाणू, त्याचा अन्न घेतानाचा मूड, वगेरे.. इतकेच नाही तर जनुकीय अभ्यासातून विष्ठेचा उपयोग प्राण्याची प्रजाती ओळखण्यासाठीदेखील होतो. प्लिमथ प्रयोगशाळा तसेच एग्झेटर आणि अबर्ताय विद्यापीठातील अभ्यासानुसार मेटा-बारकोडिंगच्या साह्य़ाने विष्ठेतील डीएनएवरून ‘सील’ने कोणते भक्ष्य खाल्ले याचा अंदाज येऊ शकतो. त्यावरून त्या भक्ष्याच्या शरीरात किती प्लास्टिक आहे हे ठरविता येऊ शकते. अर्थात त्यामुळे प्राण्याचा जोखीम-घटकही  ठरवता येतो. शिकारी प्राणी भक्ष्य कसे खातात, काय खातात यावर त्या प्राण्याची विष्ठा कशी असेल हे अवलंबून असते. प्राणी मांस, हाडे, गवत, फळे, दाणे, बिया खातात. वाघ, सिंह यांसारख्या मांसाहारी प्राण्यांच्या विष्ठेला ‘स्कॅट’ म्हणतात, तर तृणभक्षी प्राण्याच्या विष्ठेला ‘पेलेट/ डंग’ असे म्हणतात. तरससारख्या हाडे खाणाऱ्या प्राण्याच्या विष्ठेवर कवच असते. काही प्राण्यांची विष्ठा टोकाला निमुळती, काहींची नळीसारखी, काहींच्या लहान आकाराच्या लेंडय़ा, तर जगातील सर्वात लहान वटवाघळाची विष्ठा अगदी टाचणीच्या डोक्याएवढी असते. काही साप तीन महिन्यांतून एकदा विष्ठा टाकतात. हिंस्र पक्ष्यांची विष्ठा मल-मूत्र अशी एकत्र असते.

विष्ठा दिसलेली जागासुद्धा तितकीच महत्त्वाची. जसे उघडय़ावर, गाडलेली, पाण्याजवळ, झाडाखाली, रस्त्यावर असलेली विष्ठा.. या गोष्टीसुद्धा बरेच काही सांगतात. विष्ठेचा आकार/ लांबी, पीळ, विष्ठेतील पदार्थ, पाणी याची नोंद ठेवणे हेसुद्धा महत्त्वाचे असते जसे, विष्ठेतील केस, बिया, लाकडाचा भुसा, अर्धवट पचलेले पदार्थ, भक्ष्याच्या शरीरातील एखादा भाग, दात, पिसे, जीवाणू, खवले, वगेरे.. या सर्व प्रकारच्या अभ्यासाला ‘स्कॅटोलॉजी’ किंवा ‘कॉप्रोलॉजी’ असे म्हणतात. या अभ्यासामुळे  माणसाच्या दबावापायी मांसाहारी प्राण्यांच्या अन्नात कसा फरक झाला आहे आणि ते मिळविण्यासाठी त्यांना कसा संघर्ष करावा लागतो आहे याचा अंदाज येतो; तसेच प्राण्यांतील सामाजिक संप्रेषण या विषयाचीही माहिती मिळते.

Caste end thought of Babasaheb Ambedkar and Mahatma Jyotiba Phule
फुले-आंबेडकरांचा जाती-अंत विचार
swanand kirkires article on kumar gandharv
आठवणींचा सराफा: गुरू तो सारिखा कोई नाही…
drama review of Himalayachi sawali
‘ती’च्या भोवती..! हिमालयाएवढी खंबीर!
Chaturang article a boy friendship with two female friends transparent and free communication
माझी मैत्रीण : पारदर्शक संवाद!

– डॉ. नीलिमा कुलकर्णी 

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org