हवेच्या प्रदूषणासंदर्भात सर्वसामान्य लोकांच्या माहितीसाठी सरकारच्या संबंधित यंत्रणांकडून हवा किती प्रमाणात शुद्ध किंवा अशुद्ध आहे हे दाखवणारा हवेचा गुणवत्ता निर्देशांक (एअर क्वॉलिटी इंडेक्स) वेळोवेळी जाहीर केला जातो. नायट्रोजन, कार्बनची संयुगे व धूलिकण (पीएम- पार्टिक्युलेट मॅटर) यांचे हवेतील प्रमाण किती आहे, यावर हवेची गुणवत्ता अवलंबून असते. हवेत घातक वायूंच्या बरोबरीने विविध प्रकारचे लक्षावधी अतिसूक्ष्म धूलिकण असतात. मानवी आरोग्याच्या दृष्टीने जास्त घातक असलेले धूलिकण पीएम २.५ (२.५ मायक्रॉनपेक्षा लहान आकाराचे) आणि पीएम १० (१० मायक्रॉनपेक्षा लहान आकाराचे) अशा दोन प्रकारचे आहेत. हवेतील या प्रदूषक घटकांमुळे आबालवृद्धांमध्ये दमा, त्याचप्रमाणे श्वासनलिका आणि श्वसनमार्ग, फुप्फुस यांचा दाह यांसारख्या व्याधी निर्माण होतात. या व्याधी साथीच्या रोगांपेक्षा जास्त जीवघेण्या ठरतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार दरवर्षी जगभरात ७० लक्ष लोक प्रदूषणामुळे जिवाला मुकतात; भारतात दर दोन मिनिटांनी एक मृत्यू होतो.

solapur, 1139 crores turnover, onion business in Solapur, during adverse times, onion profit solapur, solapur Agricultural Produce Market Committee, onion in solapur, farmer, marathi news,
प्रतिकूल काळातही सोलापुरात वर्षात कांदा व्यवहारातून ११३९ कोटींची उलाढाल
Increase in number of cancer patients in India
भारताला कर्करोगाचा विळखा आणखी घट्ट! जाणून घ्या कोणत्या कर्करोगाचा धोका वाढला…
Average life expectancy of Indians
आनंदाची बातमी! भारतीयांच्या सरासरी आयुर्मानात होतेय वाढ; जाणून घ्या कारणे…
Madhabi Puri Buch, SEBI, Indian market, GST, investment
गुंतवणूकदारांच्या वाढत्या आस्थेमुळे भांडवली बाजाराला उच्च मूल्यांकन – सेबी

या प्रदूषणाप्रमाणेच सध्या जगभरात महामारी फैलावत असलेला करोना विषाणूदेखील माणसाच्या श्वसनसंस्थेवरच हल्ला करतो आहे. करोनाचा प्रसार दृश्य स्वरूपाचा आणि जलदगतीचा असतो, तर हवेचे प्रदूषण हे मंदगतीने होणारे अदृश्य रूपातले घातक आक्रमण असते. उपलब्ध विदेनुसार ज्या व्यक्तींची श्वसनसंस्था, फुप्फुसे हवेतील प्रदूषणामुळे आधीच व्याधिग्रस्त झाली आहेत, अशा व्यक्तींना करोना विषाणूचा संसर्ग पटकन होतो आणि तो जिवाला घातक ठरू शकतो.

या पार्श्वभूमीवर सध्याच्या करोनावासात मानवी जीवन आणि निसर्ग यांबाबतीत अनेक गोष्टींचा साक्षात्कार होत आहे. या काळातील प्रदीर्घ टाळेबंदीमुळे हवामानावर निश्चितपणे सकारात्मक परिणाम झाला आहे. शहरा-गावांतील बंद बाजारपेठा, बंद कारखाने, रस्त्यांवरील वाहनांची अतिशय अल्प प्रमाणात होत असलेली ये-जा यामुळे हानिकारक प्रदूषणाला आळा बसल्याचे उपलब्ध विदेवरून दिसत आहे. हवेतील सूक्ष्म कणांच्या आणि विविध प्रकारच्या घातक वायूंच्या प्रमाणात गतवर्षीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे.

सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अ‍ॅण्ड क्लीन एअर (सीआरईए) आणि सिस्टीम ऑफ एअर क्वॉलिटी अ‍ॅण्ड वेदर फॉरकास्टिंग अ‍ॅण्ड रिसर्च (सफर-इंडिया) या संस्थांतील संशोधकांनी देशभरातील हवेचा आढावा घेऊन काढलेले निष्कर्ष निश्चितच आल्हाददायक आहेत. त्यांनी गतवर्षीच्या मार्च-एप्रिलमधील हवेच्या उपलब्ध विदेशी यंदाच्या मार्च-एप्रिलच्या हवेच्या गुणवत्ताविषयक विदेची तुलना केली असता, यंदा या काळात हवेची गुणवत्ता सुधारल्याचे आढळले.

– जोसेफ तुस्कानो

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org