कोळसानिर्मितीपासून ते त्याच्या वापरापर्यंत अनेक टप्प्यांवर पर्यावरणीय दुष्परिणाम झाल्याचे आढळून येते. कोळशाच्या खाणी मुख्यत्वे जुनी जंगले असलेल्या परिसरात आढळतात. त्यामुळे या खाणी खणताना जंगलतोड तर होतेच, शिवाय वन्य पशुपक्ष्यांचे अधिवासदेखील नष्ट होतात. भूभागाचे संपूर्ण स्वरूप बदलून जाते. माती नापीक होते. खाणकामासाठी फोडलेल्या डोंगराची माती वाहून जवळच्या पाण्याचे स्रोत दगडांनी, खडकांनी आणि मातीने भरून जातात. त्यामुळे पाण्यातील सजीवांना धोका निर्माण होतो. हे सारे मिथेन, कार्बन डायऑक्साइड यांसारखे जागतिक तापमानवाढीत भर घालणारे वायू आणि कार्बन मोनॉक्साइड, सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन डायऑक्साइड यांसारख्या प्रदूषणकारी व निसर्गातील जीवसृष्टीला घातक अशा वायूंची निर्मिती होण्यास कारणीभूत ठरते.

Loksatta explained Many birds are on the verge of extinction but why is this happening
कित्येक पक्षी नामशेषत्वाच्या मार्गावर… पण असे का घडत आहे?
Sakkardara flyover, Nagpur,
नागपूर : भरधाव वाहनांसह अपघाताच्या भीतीचे सावट, सक्करदरा उड्डाण पुलावर मागील वर्षात १३ अपघात
Leopard in Vasai Fort area fear among citizens
वसई किल्ला परिसरात बिबट्याचा वावर… नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; वनविभागाकडून शोध सुरू
Uran, Mango Trees Burn, Forest Fire, chirner, Farmers, Demand Compensation, Hundreds of Trees, marathi news,
उरण : जंगलातील आगीमुळे आंब्याच्या झाडांची राख

वाढणाऱ्या तापमानाचा परिणाम एकूणच ऋतुचक्रावर दिसून येतो. अवकाळी पाऊस, वाढलेली उष्णता, थंडीचा ऋतू उशिरा सुरू होणे हे सर्व काही या हवामानबदलाचे परिणाम म्हणून घडत आहे. कार्बन मोनॉक्साइड वायूमुळे श्वास लागणे, डोकेदुखी आदी आजार होतात. सल्फर डायऑक्साइड आणि नायट्रोजन डायऑक्साइड हे वायू आम्लवर्षेसाठी कारणीभूत आहेत. या वायूंमुळे मनुष्याला डोळ्यांत जळजळ होणे, वासासंबंधीच्या तक्रारी व फुप्फुसांचे विकार इत्यादी आजार होतात. प्रत्यक्ष वीजनिर्मिती केंद्रात मोठय़ा प्रमाणात पाण्याचा वापर होतो. या पाण्याची गरज आसपासच्या गावांमधून भागवली जाते. त्याचा ताण गावात राहणाऱ्या माणसांना सहन करावा लागतो. त्याचप्रमाणे या परिसराचा कायापालट होऊन तिथली गर्दी वाढते, वाहनांची ये-जा सुरू होते. नैसर्गिक देखावा, शेतजमिनी सगळ्याचेच रूप बदलते.

औष्णिक विद्युतनिर्मिती केंद्रांमधून कोळशाच्या ज्वलनाने निर्माण झालेल्या ‘फ्लाय अ‍ॅश’मुळे शेतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे या केंद्रांमधून निर्माण होणाऱ्या विजेचा आपल्याला जरी फायदा होत असला, तरी प्रकल्पाजवळ असलेल्या गावकऱ्यांना असे प्रकल्प नकोसे वाटत असतील तर ते गैर ठरणार नाही. तरीही आपण अजूनही अशा पुनर्नवीकरण न करता येणाऱ्या ऊर्जास्रोतांवर अवलंबून आहोत. यावर सौरऊर्जेसारखे पर्याय उपलब्ध आहेत. एक सुजाण नागरिक म्हणून आपला या ऊर्जावापराचा वाटा कसा कमी करता येईल, याची खबरदारी जरी आपण घेतली तरी नसे थोडके!

– भाग्यश्री ग्रामपुरोहित

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org