डॉ. यश वेलणकर

ध्यानावर आधारित मानसोपचार एकविसाव्या शतकात विकसित झाले. त्यापूर्वी १९५० दशकात वर्तनचिकित्सा प्रभावी होती. त्यामध्ये मनातील भावना, विचार यांना महत्त्व दिले जात नव्हते. हे काही जणांना पटत नव्हते. डॉ. अल्बर्ट एलिस हे त्यातीलच एक. वर्तन बदलण्यासाठी चिंतन, विचार- म्हणजे ‘कॉग्निशन’ बदलायला हवे, या सिद्धांताचा पाया त्यांनी घातला. त्यामधूनच ‘कॉग्निटिव्ह सायन्स’ अशी अभ्यासशाखाच विकसित झाली. आता ही शाखा कृत्रिम बुद्धिमत्ता, संगणक आणि मेंदूविज्ञान यांमध्ये खूप महत्त्वाची मानली जाते. डॉ. एलिस यांनी विकसित केलेली ‘रॅशनल ईमोटिव्ह बिहेव्हियरल थेरपी’ सध्या लोकप्रिय आहे.

Prakash Ambedkar
प्रकाश आंबेडकरांनी काढला नवा मुद्दा, म्हणाले, “आम्ही घराणेशाहीचा..”
Indian Man who earns Rs 5 crore daily his parents wanted him to pursue PhD Google CEO Sundar Pichai Daily Salary Morning Habits
भारतीय तरुणाला दिवसाचा पगार ५ कोटी, नावाचा जगभर डंका; आई वडिलांची इच्छा होती PhD करावी पण त्यानं..
Jayant Patil on Ajit pawar letter
‘सत्तेमध्ये असल्याशिवाय विकास होत नाही’, अजित पवारांचं म्हणणं खरं; जयंत पाटील पुढे म्हणाले…
Supreme Court ban Patanjali from advertising
अग्रलेख : बाबांची बनवेगिरी !

डॉ. एलिस यांनी १९५३ मध्ये ‘रॅशनल थेरपी’ या नावाने चिकित्सा करायला सुरुवात केली. त्यात ते त्यांच्या क्लायंटच्या मनातील समज समजून घेण्याचा प्रयत्न करत. माणसाचा भावनिक त्रास चुकीचे, अविवेकी समज यांमुळे असतो. ते कसे अविवेकी आहेत याचे भान माणसाला आले, की तो ते बदलायला तयार होतो. मनातील हे समज बदलले, की माणसाच्या त्रासदायक भावनांची तीव्रता कमी होते आणि त्याचे वर्तनदेखील बदलते. विचार करून विवेकाने वागणे ही माणसाची अंगभूत क्षमता आहे, या सिद्धांतावर आधारित ही उपचार पद्धती असल्याने डॉ. एलिस यांनी तीस ‘रॅशनल थेरपी’ असे नाव दिले. १९५४ मध्ये ते इतर चिकित्सकांना ही थेरपी शिकवू लागले.

डॉ. एलिस यांनी १९५८ मध्ये ‘अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन’मध्ये त्यांचा सिद्धांत शोधनिबंधाच्या स्वरूपात मांडला. त्या वेळी तेथे वर्तन-चिकित्सकांचा पगडा होता. त्यामुळे डॉ. एलिस यांना फार पाठिंबा मिळाला नाही. तरीही त्यांनी आपले काम जिद्दीने चालू ठेवले. त्याच काळात त्यांची अ‍ॅरॉन बेक यांच्याशी भेट झाली. बेक यांनी ‘कॉग्निटिव्ह थेरपी’ या नावाने त्यांची मानसोपचार पद्धत विकसित केली होती. डॉ. एलिस यांनी त्याच काळात त्यांच्या थेरपीचे नाव ‘रॅशनल ईमोटिव्ह थेरपी’ असे केले. माणसांचा भावनिक त्रास हा बाह्य़ घटनांपेक्षा त्या घटनांचा ती माणसे जो अविवेकी विचार करतात त्यामुळे होतो- हा सिद्धांत बुद्ध, कन्फ्युशिअस व स्टोईक यांच्या अभ्यासातून आपल्याला सुचला, असे डॉ. एलिस सांगायचे. भारतात कि. मो. फडके यांनी १९८१ मध्ये ही मानसोपचार पद्धत शिकवायला सुरुवात केली.

yashwel@gmail.com