विज्ञानाच्या शिक्षणाने ‘पटकी (कॉलरा)सारख्या साथी पाण्याद्वारे पसरतात’ याचे ज्ञान सर्वदूर पोहोचल्याने पाणी गाळून वा तुरटी फिरवून प्यावे ही समज सर्वदूर रुजली. मोठय़ा गावांत आणि शहरे-महानगरांत नळाद्वारे पुरवले जाणारे पाणी शुद्ध असले तरी ते अधिक शुद्ध करून प्यावे अशी समाजाची मनोरचना झाली. त्यामुळेच भारतातही घरगुती जलशुद्धीकरणाची यंत्रसुविधा पुरविणारी मोठी बाजारपेठ तयार झाली आहे. आज शहरी भागात बहुतेकांच्या घरात एखादे जलशुद्धीकरण यंत्र निश्चितपणे आढळते. साध्या सँड फिल्टर (वाळूच्या कांडय़ा असलेला) किंवा गाळणपडदा असलेल्या मेम्ब्रेन फिल्टरपासून ते विजेवर चालणारी स्वयंचलित वा अर्धस्वयंचलित अत्याधुनिक जलशुद्धीकरण यंत्रे आज बाजारात उपलब्ध आहेत. यातील काही यंत्रांमध्ये अतिनील (अल्ट्राव्हॉयोलेट) किरणांद्वारे पाण्याचे शुद्धीकरण/ र्निजतुकीकरण  केले जाते.

त्याचप्रमाणे ‘रिव्हर्स ऑस्मॉसिस’सारख्या प्रक्रिया पाण्यातील क्षार घालवण्यासाठी वापरल्या जातात. काय आहे हे ‘रिव्हर्स ऑस्मॉसिस’? समजा, जास्त क्षारयुक्त आणि कमी क्षार असलेले पाणी क्षाररोधक पडद्याद्वारे विभागले आहे. अशा वेळी क्षाररोधक पडद्यातून जास्त क्षारयुक्त पाण्याकडे कमी क्षारयुक्त पाणी वाहते, या प्रक्रियेस ‘ऑस्मॉसिस’ (रसाकर्षण) असे म्हणतात. तर ‘रिव्हर्स ऑस्मॉसिस’ (प्रतिरसाकर्षण)मध्ये क्षाररोधक पडद्याच्या एका बाजूस असणाऱ्या अधिक क्षारयुक्त पाण्यावर दाब देऊन त्यास पडद्याच्या दुसऱ्या बाजूस ढकलले जाते. पडद्यातून क्षार पुढे जाऊ शकत नाहीत, त्यामुळे केवळ शुद्ध पाणीच पडद्यापल्याड येते.

unclean water supply, Thane, Rumors of unclean water,
ठाणे, कल्याणात अशुद्ध पाणीपुरवठ्याची अफवा; पालिका प्रशासन म्हणाले, अफवांवर विश्वास ठेऊ नका
mini paneer sabudana vada recipe
Recipe : तेलात न तळता बनवा साबुदाण्याचे कुरकुरीत ‘प्रोटीनयुक्त’ मिनी वडे! बनवताना घाला फक्त ‘हा’ पदार्थ
पाणीपुरवठ्याच्या तक्रारींची ‘संततधार’, पुणेकरांकडून चार दिवसांत ४०० तक्रारी
consuming Brazil nut nuts to help relieve the symptoms of hypothyroidism benefits of nuts help provide some relief
दिवसातून फक्त दोनदा ‘या’ ड्रायफ्रूटचे करा सेवन; थायरॉईड राहील नियंत्रणात? डॉक्टरांनी सांगितला फंडा

मात्र, अशी अद्ययावत यंत्रणा घरी लावल्यानंतर त्याची नीट माहिती न घेताच आपण ती चालवतो. अनेकदा त्या यंत्रासोबत आलेली माहितीपुस्तिका आपण संपूर्णपणे वाचतही नाही. त्यामुळे ही यंत्रणा पूर्णपणे कार्यरत आहे की नाही, याकडे आपले लक्ष नसते. अशा यंत्रातून येणारे पाणी अतिशय शुद्ध असणारच, या अंधविश्वासाने ते पीत असतो. वास्तविक अशा शुद्धीकरण प्रक्रियेतून निर्माण झालेले संपूर्णपणे जंतुविरहित आणि क्षारविरहित पाणी हे अनैसर्गिक आहे. कारण जीवनावश्यक काही क्षार आपल्याला फक्त पाण्यातूनच मिळतात. त्यामुळे आपल्याला मिनरल वॉटरची गरज असते. पाण्याच्या कृत्रिम शुद्धीकरण प्रक्रियेत आपल्याला आवश्यक आणि उपकारक असलेले अनेक सूक्ष्मजीव आपण नष्ट करतो. अतिशुद्ध पाणी पिण्याच्या हव्यासापोटी अनेकदा पिण्याच्या पाण्यातील थोडादेखील बदल आपल्याला अनारोग्याकडे नेऊ शकतो.

विद्याधर वालावलकर

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org