– डॉ. यश वेलणकर

अनेकांना ध्यानात गूढ अनुभव अपेक्षित असतो. ध्यान लागणे म्हणजे तंद्री लागणे अपेक्षित असते. अशा ध्यानात दिव्य प्रकाश दिसतो, स्वर्गीय नाद ऐकू येतात, अपार्थिव गंध जाणवतो. या साऱ्यांना आध्यात्मिक गूढ अनुभव म्हटले जाते. सत्त्वावजय चिकित्सेत साक्षीध्यानाचा उपयोग केला जातो, त्याचा उद्देश मात्र असे अनुभव घेणे हा नाही. या ध्यानात तंद्री अपेक्षित नसते, तर अधिक सजगता अपेक्षित असते. आपले लक्ष या क्षणी परिसरात, शरीरात आणि मनात जे काही घडते आहे त्यावर नेऊन- ‘हे हवे’, ‘हे नको’ अशी कोणतीही प्रतिक्रिया न करता त्याचा स्वीकार करणे म्हणजे साक्षीध्यान होय. माणूस तंद्रीत, ट्रान्समध्ये असताना त्याचे देहमनाचे भान हरपलेले असते. यास ‘फ्लो’ म्हणता येईल. एकाग्रता ध्यानाचा अधिक सराव केल्याने हे शक्य होते. पण ‘फ्लो स्टेट’ आणि ‘माइन्डफुलनेस’ या दोन वेगवेगळ्या स्थिती आहेत.

Maldhok birds
अग्रलेख: पूतनामावशीचे पर्यावरणप्रेम!
navi mumbai, Valve Repair, Traffic Congestion, footpath close, Pedestrian Woes, kopar khairane, teen taki area, marathi news,
व्हॉल्व दुरुस्तीच्या कामामुळे पादचाऱ्यांचे हाल; कोपरखैरणेत तीन टाकी परिसरात पदपथ बंद
Rural Health Services pregnant woman from Nandurbar lost her life due to lack of timely medical care
ग्रामीण आरोग्य सेवा : ठसठसती जखम!
how to control blood sugar on the occasion of holi
Blood Sugar : होळीला गोड खाताना रक्तातील साखर कशी नियंत्रणात ठेवावी? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…

‘फ्लो स्टेट’ आनंददायी असली, तरी वारंवार त्या स्थितीत जाता येत नाही. याउलट लक्ष वर्तमान क्षणात आणून जे काही जाणवते त्याचा स्वीकार म्हणजे क्षणसाक्षित्व वारंवार अनुभवता येते. या सरावाचा उद्देश कोणतेही अतींद्रिय अनुभव घेणे हा नसतो. शरीरातील संवेदना, मनातील विचार, भावना यांचे भान आणि स्वीकार यामुळे चिंता, राग, उदासी अशा त्रासदायक जैविक भावनांची तीव्रता, वारंवारता आणि कालावधी कमी होतो. क्षणसाक्षित्व आणि साक्षीध्यान यांच्या सरावाचा तोच उद्देश आहे. असा सराव करताना प्रकाश दिसला, प्रतिमा दिसल्या, आवाज ऐकू आले तरी त्यांना महत्त्व द्यायचे नाही. मनात येणाऱ्या विचारांचीच ती वेगवेगळी रूपे आहेत याचे भान ठेवायचे. ही दृश्ये नकोत, त्यांची भीती वाटते अशी प्रतिक्रिया करायची नाही वा हा अनुभव पुन:पुन्हा यावा अशी आसक्तीही ठेवायची नाही.

मी शरीरापेक्षा वेगळा आहे असे वाटणे, म्हणजे ‘आउट ऑफ बॉडी’ अनुभव काहींना येतो. मेंदुविज्ञानानुसार त्यामध्येही कोणतीही गूढता नाही. डोळे उघडे ठेवून वेगाने स्वत:भोवती गिरक्या मारल्या की डोळे आणि शरीराची स्थिती जाणणारी मेंदूतील यंत्रणा यांचा ताळमेळ बिघडतो. त्यामुळे चक्कर येते, काही जणांना मी शरीराच्या बाहेर आहे असे वाटते. हा अनुभव म्हणजे साक्षीभाव नाही. असा अनुभव, चक्कर किंवा शरीरातील वेदना यांचा न घाबरता स्वीकार हा साक्षीभाव आहे. माणसांना गूढतेचे अकारण आकर्षण असते. साक्षीध्यानात गूढता नाही; ते ध्यान ‘लागणे’ नसून ध्यान ‘देणे’ आहे.

yashwel@gmail.com