स्थानिक स्वराज्य संस्थांकडून कचरा प्रक्रिया आणि निर्मूलन व्यवस्थेसाठी मुबलक जागा उपलब्ध करणे यास सर्वाधिक प्राधान्य देण्यात येते. सरकारी आणि महानगरपालिकेच्या स्वत:च्या हजारो एकर जमिनी आहेत, भूखंड आहेत. परंतु कचरा निर्मूलनासाठी या जागांचा वापर करण्यात असंख्य अडथळे येतात. यात सर्वात मोठा अडथळा म्हणजे प्रस्तावित जागेच्या आसपास असलेल्या नागरी वसाहतींमधील स्थानिक नागरिकांचा कडवा विरोध! या मानसिकतेला ‘निम्बी मानसिकता’ असा शब्द योजण्यात आला आहे. यातला ‘निम्बी’ हा शब्द ‘नॉट इन माय बॅकयार्ड’ या शब्दप्रयोगाचे लघुरूप आहे आणि त्याचा अर्थ अतिशय सरळ आहे. तुम्ही कचरा दुसरीकडे कुठेही नेऊन टाका, आम्हाला त्याच्याशी काही मतलब नाही.. फक्त तो आमच्या वस्तीजवळ, आमच्या अंगणात नको. नागरिकांच्या दृष्टीने विचार केला तर त्यांचा अशा प्रकल्पांना असलेला विरोध योग्यच ठरतो; कारण या कचऱ्याची प्रचंड दुर्गंधी येते, रोगराई पसरते, उंदीर, घुशी, माश्या, मच्छर आदींचा सुळसुळाट होतो. महाराष्ट्रात औरंगाबाद, उरळी कांचन या व अशा अनेक ठिकाणी या डम्पिंग ग्राऊंडचे प्रश्न अक्षरश: पेटल्याच्या घटना अगदी अलीकडच्या काळात घडल्या आहेत. त्यामुळे कचरा डम्पिंगसाठी  जागा मिळवणे ही स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी फार मोठी डोकेदुखी आहे.

corruption, neutral vigilance department,
‘तटस्थ दक्षता विभाग’ असल्याशिवाय प्रशासनातील भ्रष्टाचार थांबेल कसा?
UPSC ची तयारी: भारतीय राज्यव्यवस्था केंद्रराज्य संबंध, घटनादुरुस्ती
Upsc Preparation Legislature Judiciary in Indian Polity Paper of Civil Services Pre Exam
upsc ची तयारी: भारतीय राज्यव्यवस्था; कायदेमंडळ, न्यायमंडळ, पंचायती राज
toll plaza
विश्लेषण : भविष्यात टोलनाके बंद होणार? कशी असेल GPS आधारित नवी यंत्रणा?

पण शेवटी हा कचरा तुमच्या-आमच्या घरांतूनच येतो. त्यामुळे विरोध करत असताना नागरी कचरा व्यवस्थापन प्रक्रियेत तुमचा-आमचा सक्रिय सहभाग असणेदेखील तितकेच आवश्यक आहे. सोबतच्या चित्रात दाखवल्याप्रमाणे आपल्या घरातच कमीत कमी कचरा निर्माण होईल यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणे, ओला व सुका कचरा अतिशय काटेकोरपणे वेगळा करणे, ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मितीसाठी आपल्या घरात वा आपल्या सोसायटीच्या आवारात योग्य ती यंत्रणा उभारणे, सुक्या कचऱ्यातील घटक ‘रिसायकलिंग’ला देणे, विविध वस्तूंचा पुन्हा पुन्हा वापर होईल यासाठी प्रयत्न करणे, अशा अनेक मार्गानी आपण कचरा डेपोंची आवश्यकताच उरणार नाही अशी व्यवस्था करू शकतो.

महानगरपालिका काय करेल किंवा सरकार काय करेल याची व्यर्थ चर्चा न करता आपल्या घरापासून सुरुवात करून संघटितपणे आपल्या सोसायटीत, परिसरात कचरा व्यवस्थापनासाठी आदर्श यंत्रणा निर्माण करायला हवी. अनेक शहरांमध्ये असे संघटित प्रयत्न सुरू झाले आहेत. आशा करू या की पुढील काही वर्षांमध्ये सध्या आहेत ते कचरा डेपो बंद होतील आणि नव्याने अशा यंत्रणेची गरजच भासणार नाही!

– डॉ. संजय जोशी

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org