जानेवारी २०२१ च्या १७ तारखेला ज्यांची ११५ वी जयंती होती, त्या अंकमित्राची आज माहिती घेऊ. १९८४ मध्ये ‘असोसिएशन ऑफ मॅथेमॅटिक्स टीचर्स ऑफ इंडिया’च्या अधिवेशनात प्रा. जयंत नारळीकर यांच्या हस्ते ‘अंकमित्र’ ही उपाधी प्राप्त झालेले गणिती दत्तात्रय रामचंद्र कापरेकर यांचा जन्म १७ जानेवारी १९०५ रोजी डहाणू येथे झाला. त्यांच्या अंकमैत्रीची चुणूक दिसली ती ज्युनियर बी.एस्सी.च्या वर्गात असताना राष्ट्रीय स्तरावरच्या निबंध स्पर्धेत ‘थिअरी ऑफ एन्व्हेलप्स’ या त्यांच्या ९३ पानी निबंधाला मिळालेल्या प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकाने!

Prakash Ambedkar
प्रकाश आंबेडकरांनी काढला नवा मुद्दा, म्हणाले, “आम्ही घराणेशाहीचा..”
Indian Man who earns Rs 5 crore daily his parents wanted him to pursue PhD Google CEO Sundar Pichai Daily Salary Morning Habits
भारतीय तरुणाला दिवसाचा पगार ५ कोटी, नावाचा जगभर डंका; आई वडिलांची इच्छा होती PhD करावी पण त्यानं..
Sharad pawar on loksatta agralekh
“मी फक्त लोकसत्ताचा अग्रलेख वाचला”, अजित पवारांच्या ‘त्या’ पत्रावरून शरद पवारांचा खोचक टोला, काय लिहिलंय अग्रलेखात?
Nitisha Kaul sent back to uk
युकेतून भारतात आलेल्या काश्मिरी पंडित प्राध्यापिकेला इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी परत पाठवलं मायदेशी; नेमकं प्रकरण काय?

कापरेकरांनी १९३४ मध्ये गणिताच्या अखिल भारतीय वार्षिक अधिवेशनात आपला एक शोधलेख सादर केला. तेव्हापासून १९८५ पर्यंत त्यांनी अशा प्रत्येक अधिवेशनात शोधनिबंध वाचले. प्रगत गणिताचे शिक्षण किंवा गणक/संगणक उपलब्ध नसतानाही प्रचंड आकडेमोड करीत देवळालीसारख्या ठिकाणी माध्यमिक शिक्षक असूनदेखील त्यांचे संशोधन एकांडय़ा शिलेदाराप्रमाणे सुरू राहिले. तरीही त्यांच्या भरीव कार्याचा उल्लेख ‘सायंटिफिक अमेरिकन’सारख्या भारदस्त मासिकात झाला, हे विशेष!

संख्यांच्या विश्वात रमणाऱ्या कापरेकरांनी स्वत: शोधलेल्या विशेष संख्यांना हर्षद संख्या, स्वयंभू संख्या, दत्तात्रय संख्या, डेम्लो संख्या, आदी आकर्षक नावे दिली. ज्या संख्येला तिच्यातील अंकांच्या बेरजेने नि:शेष भाग जातो, ती हर्षद संख्या. जशी की १२, कारण तिला ३ ने नि:शेष भाग जातो.

प्रत्येक नैसर्गिक संख्येत त्या संख्येतील सर्व अंकांची बेरीज मिळवून नवीन संख्या मिळते. उदाहरणार्थ, १४ या जनक संख्येपासून १४ + (१+४) = १९ ही संख्या मिळते आणि १५ पासून १५ + (१+५) = २१. पण त्यातली २० ही संख्या त्या प्रकारे तयार होत नसल्याने २० ही स्वयंभू संख्या होय, अशी व्याख्या कापरेकरांनी दिली.

ज्या संख्येच्या वर्गाच्या दोन भागांची बेरीज मूळच्या संख्येइतकी असते अशी संख्या ‘कापरेकर संख्या’ म्हणून ओळखली जाते. उदाहरणार्थ, ४५ चा वर्ग २०२५ आणि २० व २५ ची बेरीजही ४५ म्हणून ४५ ही ‘कापरेकर संख्या’! असे संख्यांचे रंजक प्रकार त्यांनी शोधले. या संख्यांवर संशोधन चालू आहे.

३५ पुस्तके, ५० पेक्षा अधिक शोधनिबंध यांतून अंकशास्त्राला आणि मनोरंजनात्मक गणितालाही योगदान दिलेल्या कापरेकरांना काही विद्यापीठांच्या शिष्यवृत्ती मिळाल्या. स्वत:ला ‘गणितानंदी’ म्हणवणाऱ्या कापरेकरांचे ४ जुलै १९८६ रोजी नाशिक येथे देहावसान झाले. सुप्रसिद्ध ‘कापरेकर स्थिरांका’बद्दल पुढील लेखात जाणून घेऊ!

– प्रा. दिलीप गोटखिंडीकर

मराठी विज्ञान परिषद,

संकेतस्थळ : http://www.mavipa.org

ईमेल : office@mavipamumbai.org

(प्रा. दिलीप गोटखिंडीकर यांनी त्यांच्या निधनापूर्वी ‘कुतूहल’साठी लिहिलेला लेखांक.)