तोरिनो किंवा तुरीन हे उत्तर इटलीतील एक मोठे औद्योगिक आणि सांस्कृतिक केंद्र आल्प्स पर्वतरांगांच्या सान्निध्यात वसले आहे. ५८ अब्ज डॉलर इतकी आíथक उलाढाल असलेले तुरीन हे आíथकदृष्टय़ा इटलीतील रोम आणि मिलानखालोखाल तिसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. सुमारे १७ लाख लोकसंख्या असलेल्या तुरीनला इटलीच्या सांस्कृतिक इतिहासात मानाचे स्थान आहे. पर्यटन हा येथील एक मोठा उद्योग आहे. तुरीनमधील औद्योगिक क्षेत्रात वाहननिर्मिती उद्योगाचे प्रमाण मोठे आहे. दुसऱ्या महायुद्धात इटलीचा फॅसिस्ट नेता बेनिटो मुसोलिनीने येथील वाहन उद्योगाशी निगडित असलेल्या सर्व कारखान्यांना वेठीला धरून तीन वष्रे केवळ लष्करी वाहने, रणगाडे वगरेंची निर्मिती केली; पण या गोष्टींमुळे १९४३ साली दोस्त राष्ट्रांनी आपल्या बॉम्बफेकीत तुरीनला प्रमुख लक्ष्य केले. प्रचंड बॉम्बस्फोटांमुळे येथील वाहन उद्योग उद्ध्वस्त झाला. महायुद्ध संपल्यानंतर मात्र इटालियन सरकारने येथील वाहन उद्योग प्राधान्याने पूर्ववत उभा केला. तुरीन प्रामुख्याने फियाट कारचे शहर म्हणून ओळखले जाते. ‘फॅब्रिका इटालिना अटोमोबिली तोरीनो’चे संक्षिप्त नाव फियाट असे झाले. फियाट एसपीए ही कंपनी १८९९ साली तुरीनमध्ये स्थापन झाली. लहान मोटरगाडय़ा, रेल्वे वॅगन्स वगरे बनविणाऱ्या फियाट एसपीएव्ही कंपनीचे २०१४ साली ‘फियाट क्रिसलर ऑटोमोबाइल्स’ या इटालियन-अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनीत विलीनीकरण झाले. या कंपनीतर्फे फियाट, फियाट प्रोफेशनल, अल्फा रोमिओ, डॉज, क्रिसलर, जीप इत्यादी ब्रँडची वाहने बनविली जातात. वाहननिर्मितीशिवाय या ‘एफसीए’ कंपनीचा प्रसारमाध्यमांचा व्यवसाय आहे. इटालियन भाषेतील ‘ला स्ताम्पा’ आणि ‘सेकोलो’ ही दोन वृत्तपत्रे ही कंपनी चालवते. एफसीएशिवाय आलीव्हेत्ती, लॅवाझा, सुपर्गा वगरे वाहन निर्मात्यांचे कारखाने तुरीनमध्ये आहेत. १८२६ साली मिलानमध्ये सुरू झालेली जगातली पहिली चॉकलेट उत्पादक कंपनी आजही आपले श्रेष्ठत्व टिकवून आहे.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

 

*********************************************************

 

काझीरंगा उद्यानातील वनस्पती

काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आसाम राज्यात असून एकिशगी गेंडय़ासाठी प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे इथले वनस्पती जीवन वैविध्यपूर्ण आहे. बांबूच्या गर्द वनाबरोबरच लहान-मोठय़ा अनेक वनस्पतींनी राष्ट्रीय उद्यानाचे आकर्षण वाढवले आहे. पाणवनस्पती, गवताचे विविध प्रकार, झुडपे आणि लहान-मोठे वृक्ष यांच्यामुळे काझीरंगा पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे. हत्तीवर बसून उद्यानाचा फेरफटका मारताना हे आपल्याला जाणवते. इथे गेंडय़ापासून संरक्षण मिळावे म्हणून हत्तीवरूनच तुमची मिरवणूक काढतात असेच म्हणा ना! दलदलीच्या प्रदेशात अरुंडो ड्रोनक्स नावाचा बांबू वाढलेला दिसतो. या बांबूच्या कामटय़ापासून टेबल, खुच्र्या तयार करतात. आपल्याकडे आपण त्यांना केनचे फíनचर म्हणतो. इथला चिकणमातीचा भूभाग वर्षां ऋतूत पाण्याने भरून जातो. तिथे इतर वेळी ‘एरियान्थस’ नावाचे हत्तीगवत वाऱ्याबरोबर डोलत असलेले दिसेल. आसामी लोक त्यांच्या भाषेत त्याला एक्रा असे म्हणतात. उद्यानात अनेक ठिकाणी पाणथळ जागा दिसतील त्या जागेत मोनोकोरिया नावाची पाणवनस्पती पाहायला मिळेल. आपल्याकडच्या जलपर्णीची ती बहीणच म्हणायला हरकत नाही. विशेष म्हणजे इतरत्र २० मी.पर्यंत उंच वाढणारा हा वृक्ष इथे पाणी मुबलक असल्याकारणाने अधिक उंच वाढतो. लाल सावरीपासून कापूस मिळतो आणि त्याचा उपयोग मऊ उशा, लोड, तक्के आणि गाद्या करण्यासाठी होतो. थोडे आणखी पुढे दृष्टी फिरवलीत तर आपण ज्याला भेर्लीमाड म्हणतो ते वृक्ष पाहायला मिळतील. १२ मी. उंचीपर्यंत जाणारा हा वृक्ष नीरा आणि गूळ देतो हे आपल्याला माहीतच आहे. कारण आपल्या कोकणात मोठय़ा प्रमाणावर त्याची लागवड केली जाते. मुंबईतसुद्धा अनेक ठिकाणी तो पाहायला मिळतो. तामण किंवा जारूळ ज्याचे फूल आपल्या राज्याचे मानचिन्ह आहे तो वृक्षही काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात आहे. त्याचाच एक भाईबंद पार्वफ्लिोरा तोही इथे आहे. फॉक्सटेल ओíकड ही वनस्पती इथल्या वनात आहे. स्थानिक लोक वेगवेगळ्या प्रसंगी बिहू नाच करतात. त्या वेळी फॉक्सटेल फुलांच्या माळा गळ्यात आणि हातात घालतात. याशिवाय अनेक वनस्पती इथे आहेत.

– डॉ. किशोर कुलकर्णी (मुंबई)

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org