26 February 2020

News Flash

मेंदूशी मैत्री : तरुण समाज

पूर्वीच्या काळी ‘आता माझं काय राहिलंय आता’ असा अत्यंत निराश विचार करण्याचं एक वय असायचं.

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. श्रुती पानसे

‘मला पासष्टाव्या वर्षी नवी भाषा शिकायची आहे.’ ‘मला कम्प्युटरवर काम करणं जमायला हवं.’ ‘लांबच्या सहलीला जायचं आहे.’ ‘नवीन पद्धतीचे पदार्थ करून बघायचे आहेत’ असे अत्यंत सकारात्मक विचार कित्येकांच्या मनात येत असतात. ही चांगली गोष्ट आहे. ज्या वेळेस आपली खरी आवड सापडते, तेव्हा आतमध्ये ऊर्जा निर्माण झालेली असते. कधीच कशातून मिळणार नाही असा आनंद आपल्याला जे आवडतं ते करण्यात मिळतो. या आवडीच्या कामात कितीही वेळ गेला, कितीही कष्ट पडले तरी चालतं. अशा पद्धतीने मूलभूत स्वरूपाचं काम हातून  घडण्याची शक्यता असते.

पूर्वीच्या काळी ‘आता माझं काय राहिलंय आता’ असा अत्यंत निराश विचार करण्याचं एक वय असायचं. मात्र आज तेच वय नवं काहीतरी शिकू बघतंय, ही आपला समाज तरुण झालाय याची खूण आहे.अशाच प्रकारे, आपल्या स्वत:ला नक्की काय आवडतं याचा शोध सगळी प्रौढ माणसं घेतात का? वास्तविक, आपल्या आत नक्की कसली ‘पॅशन’ आहे हे प्रत्येकाने शोधायला हवं. पण सगळी माणसं असं काही शोधतातच असं नाही. जी थोडी माणसं हे शोधत असतील, ते जर आत्ताच्या वयात काय आवडतं? काय आवडेल? काय झेपेल? शोभेल? याचा विचार आणि स्वत:च्या इच्छांना मुरड घालत राहू नये.

पण कित्येक प्रौढ माणसांना आपला खरा आनंद कशात लपलेला आहे हेच माहीत नसतं. म्हणून कितीतरी माणसं नुसता आला दिवस घालवत असतात. जे काही समोर उपलब्ध असेल त्यात वेळ  घालवतात. आणि त्या वेळ घालवण्यातच आनंद आहे असं वाटायला लागतं. नवीन कौशल्यं शिकण्याला कसलंच वय नसतं. त्यासाठी आपला मेंदू अतिशय तत्पर असतो. उलट शिकायला नवीन काहीतरी मिळणार याने मेंदूला चालनाच मिळते. मेंदू न्युरॉन्सच्या जोडण्यांचं काम जोमाने करायला घेतो. आपल्याला काय करायला अजिबात आवडत नाही हे तर मोठं होईपर्यंत व्यवस्थित कळलेलं असतं. न आवडणाऱ्या गोष्टी हातात घ्यायची काहीच गरज नाही. त्यापेक्षा वेगळं काही तरी करायला हवं. हीच तर आहे कोणत्याही वयातली मेंदूशी मत्री!

contact@shrutipanse.com

First Published on June 19, 2019 12:10 am

Web Title: article on young society
Next Stories
1 कुतूहल : पृथ्वी फिरते आहे!
2 मेंदूशी मैत्री : विश्लेषणासाठी अवधी
3 कुतूहल : प्रकाशाचा वेग
Just Now!
X