News Flash

आशिया आणि युरोप सांधणारे पूल

भारत, चीन वगरे देशांमधून युरोपात होणारे व्यापारी दळणवळण या खाडीतूनच होई.

मध्ययुगीन काळापासूनच इस्तंबूल शहर ज्या खाडीमुळे विभागले आहे त्या बॉस्फरस खाडीतल्या दळणवळणाला जागतिक महत्त्व आले होते. भारत, चीन वगरे देशांमधून युरोपात होणारे व्यापारी दळणवळण या खाडीतूनच होई. या खाडीच्या एका किनाऱ्याला आशियाची सरहद्द तर दुसऱ्याला युरोपची. पíशयनसम्राट डेरियसने इथे प्रथम पोन्टून पूल बांधला. पोन्टून म्हणजे लाकडाचे ओंडके आणि तराफे यांचा पूल. त्यानंतर अलीकडच्या काळात आशिया आणि युरोप एकमेकांना जोडणारे एकूण तीन मोठे पूल बांधले गेले. बॉस्फरस सामुद्रधुनीवर आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असा ‘फर्स्ट बॉस्फरस ब्रिज’, या पुलाचे काम १९७० ते १९७३ अशी तीन वष्रे चालले. १५६० मीटर लांबीचा आणि ३४ मीटर रुंदीचा हा बॉस्फरस ब्रिज स्टील रोप सस्पेन्शन तंत्राने (आपल्या हावडा ब्रिजसारखा) बांधला गेला आहे. पुलाच्या प्रमुख दोन खांबांमधील अंतर १०७४ मीटर तर पुलाची समुद्रपातळीपासून उंची आहे ६४ मीटर. आठ पदरी असलेल्या या पुलावरून ट्रकसारख्या अवजड व्यापारी वाहनांच्या वाहतुकीला बंदी आहे. या पुलाचे काम पूर्ण झाले तेव्हा तो सस्पेन्शन तंत्राचा जगातला चौथा लांब पूल होता. रोज दोन लाख वाहनांची वाहतूक करणारा हा पूल अलीकडे १५ जुल २०१६ रोजी इस्तंबूलमध्ये लष्कराने केलेल्या उठावात सरकारने दोन दिवस बंद ठेवला. २५ जुल २०१६ रोजी सरकारने याचे नाव ‘१५ जुल हुतात्मा पूल’ असे केले. फतेह सुलतानएहमत ब्रिज हा १५१० मीटर लांबीचा, १९८८ साली बांधून पूर्ण झालेला आशिया आणि युरोप सांधणारा दुसरा पूल. पुलावरील आठ पदरी रस्त्यावरून रोज दीड लाख वाहने धावत असतात. ३९ मीटर रुंदीचा हा पूलही स्टील रोप सस्पेन्शन तंत्रानेच बांधण्यात आला. याखेरीज ‘सुलतान ब्रिज’ या शहराच्या बाहेरून जाणाऱ्या पुलाचे बांधकाम २०१३ मध्ये सुरू झाले आहे. दोन कि.मी. लांबीच्या या तिसऱ्या पुलावरील चार पदरी रस्त्यावरून सर्व प्रकारची मोटार वाहने धावतील; तसेच रेल्वेमार्गही बांधण्यात येणार आहे. बॉस्फरस खाडीत पाण्याच्या पातळीखालून (५५ मीटर खोल असलेल्या) भुयारी मार्गातून धावणारा मार्मारा रेल्वेमार्गही कार्यरत आहे.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

 

लता किंवा वेली

काही वनस्पतींची खोडे लवचीक व कृश असल्या कारणाने त्यांना उंच वाढण्यासाठी आधाराची गरज असते, अशा वनस्पतींना आपण ‘वेल’ किंवा ‘लता’ म्हणतो. वेली आधारावर अनेक प्रकारे चढतात. काकडीवर्गीय वेली प्रताने किंवा तणावे (टेंड्रील) यांच्याद्वारे चढतात. गुळवेल आधाराभोवती वेटाळून चढते. पानवेल आणि मनीप्लांट खोडावर फुटलेल्या मुळांच्या आधाराने चढतात. रानजाई पानांचे देठ आधारावर वेटाळून चढते. कळलावी पानांच्या टोकावर असलेल्या तणाव्याने चढते. वाघनखीची (इ्रॠल्लल्ल्रं) तर गंमतच वाटते. तिचे तणावे त्रिशुळासारखे असून त्यांची टोके वाघनख्यांसारखी वळलेली असतात. त्या नख्यांद्वारे वाघनखीची वेल आधाराला पकडून वर चढत जाते. कालांतराने वाघनखीच्या खोडावर मुळे फुटतात आणि हीच मुळे त्या वेलीला पक्का आधार देतात. एकदा वाघनखींचा तणावा बोटावर घेऊन त्याची पकड अनुभवा, तेव्हाच त्याची गंमत उमजेल. पडदावेलीची (श्ी१ल्लल्ल्रंी’ंीॠल्ल्रऋ’्र४२) आणखी एक तऱ्हा. ती वेल असूनसुद्धा आधारावर चढू शकत नाही. तिला उंचावर चढवली की, तिच्या सर्वच शाखा एकमेकांना समांतर अशा पडद्यासारख्या खालीच उतरतात.

बोगनवेलीसारख्या काही वनस्पती धड ना झुडूप ना वेल अशा इतस्तत: वाढतात. अशा वनस्पतींना भ्रमणी (रँब्लर) असे म्हणतात. अशा वेडय़ावाकडय़ा वाढणाऱ्या वनस्पतींचाही एक फायदा असतो. अशा वनस्पतींना विविध प्रकारे वापरता येते. संरक्षणार्थ कुंपणासाठी बोगनवेल फारच उत्तम; कारण तिला गुरे, शेळ्या-मेंढय़ा शिवत नाहीत. तिला असलेल्या काटय़ांमुळे, इतस्तत: आणि वेडय़ावाकडय़ा फांद्यांमुळेही इतर जनावरांना शिरकाव करणे कठीण होते. बोगनवेलीसारख्या इतर रँब्लर्सना वळण देऊन व सुयोग्य छाटणीद्वारे एक तर वेलीसारखे किंवा झुडपासारखेही वाढवता येते, हा आणखी एक फायदा.

वेलींपासून सुंदर लताकुंज (गाझेबो) बनवता येतात. कमानीवर चढवून बागेच्या प्रवेशद्वाराची शोभा वाढवता येते. पडदीवर (ट्रेल्लीस) वेली चढवून शोभेची बाग आणि तरणतलाव यामध्ये खासगी अवकाश करता येतो. कुंडय़ांत लावण्याजोग्या लहानखुऱ्या वेलीही उपलब्ध असतात. त्या कुंडीतील छोटेखानी कमानी व ट्रेल्लीसवरही वाढवता येतात. विडय़ाची पानवेल कुंडीमध्ये मॉसस्टिकवर चढवून शोभेसाठीही उपयुक्त ठरते.

नंदन कलबाग (पुणे) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2016 3:21 am

Web Title: asia and europe joiner bridge
Next Stories
1 इस्तंबूलची जडणघडण
2 इस्तंबूलची सत्तांतरे
3 बायझंटाइन.. कान्स्टंटिनोपल.. इस्तंबूल
Just Now!
X