27 September 2020

News Flash

आजचे बर्लिन

पूर्व बर्लिनमधील सोव्हिएत युनियनच्या सरकारच्या अस्तानंतर पश्चिम बर्लिनकडील प्रवेश खुला करण्यात आला.

पूर्व बर्लिनमधील सोव्हिएत युनियनच्या सरकारच्या अस्तानंतर पश्चिम बर्लिनकडील प्रवेश खुला करण्यात आला. ९ ऑक्टोबर १९८९ रोजी दोन्ही बर्लिनमधल्या लोकांनी शहराच्या विभाजक भिंतीवर चढून नाच, गाणी आणि जल्लोष करून आनंदोत्सव साजरा केला. पुढे अनेक दिवस ‘बर्लिन वॉल’ तोडण्याचा कार्यक्रम लोकांनीच केला. बऱ्याच जणांनी त्या िभतीचे लहान तुकडे आणून २८ वष्रे सहन केलेल्या हालअपेष्टांचे स्मृतिचिन्ह म्हणून सांभाळून ठेवलेत. त्या ४३ कि.मी. लांबीच्या भिंतीचा फक्त छोटासा भाग स्मारक म्हणून सध्या शिल्लक ठेवलेला आहे. १९९० साली दोन्ही बर्लिनच्या एकीकरणानंतर तिथे फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनीचे सरकार आले. त्याआधी पश्चिम जर्मनीची राजधानी बॉन येथे होती. ती बरखास्त करण्यात आली. दोन महायुद्धांच्या जखमा आणि खुणा वागवणारे बर्लिन इतक्या झपाटय़ाने बदलतेय की, त्यावर विश्वासच बसणार नाही. गेल्या २५ वर्षांत विशेषत: पूर्व बर्लिनचे रंगरूप झपाटय़ाने बदलले आहे. ९०० चौ.कि.मी.वर पसरलेल्या बíलन शहराची सध्याची लोकसंख्या ३५ लाख आहे तर उपनगरीय लोकसंख्या १० लाख. १८९४ साली जर्मन साम्राज्याच्या संसदेसाठी बांधलेली बर्लिनमधील इमारत राइश्टाग येथेच सरकारी मुख्यालय आहे. पूर्वी बर्लिन विभक्त असताना पूर्व पश्चिम बर्लिन, २३ बरोजमध्ये विभागले होते. एकीकरण झाल्यावर सध्या प्रशासकीय व्यवस्थेसाठी बृहन बर्लिन १२ बरोजमध्येच विभागले आहे. बर्लिन शहर गेल्या अर्धशतकात कला, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रांतही एक जागतिक महत्त्वाचे शहर म्हणून ओळखले जाते. ७०० कलादालने असलेले बर्लिन सध्या सहा ते सात हजार कलाकारांचे निवासस्थान आहे. बर्लिनमध्ये असलेल्या १५३ म्युझियम्सपकी ज्युईश म्युझियमला अनन्यसाधारण महत्त्व आहे. बर्लिन शहरात असलेल्या ५० नाटय़गृहांपकी १७४२ साली सुरू झालेला बर्लिन स्टेट ऑपेरा हे सर्वात जुने नाटय़गृह समजले जाते.
– सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com

 

पक्ष्यांद्वारे परागण
अंजीर, वड, पिंपळ यांच्या कुळातील फुलांच्या पुष्पसहमती कुंभाप्रमाणे असतात. त्यांची फुले कुंभाच्या आतील बाजूस असून अत्यंत लहान असतात. कुंभाच्या तोंडाजवळ एक लहान छिद्र असते. नरपुष्पे छिद्राजवळ वसलेली असतात. ती तीन प्रकारची असतात. ज्यांच्या खालोखाल स्त्रीपुष्पे असतात. त्यांच्या टोकांना परागकण टिपण्यासाठी लांब सोंडेसारखे अवयव असतात. सर्वात तळाला तोकडय़ा सोंडेची स्त्रीपुष्पे असतात, त्यांना गॉल फ्लॉवर्स म्हणतात. क्लास्टोफॅगा नावाची मादी माशी तोंडाजवळच्या छिद्रातून आत शिरते व गॉल पुष्पांच्या बीजांडकोशात आपली फलन झालेली अंडी घालते. अंडय़ातून बाहेर पडणाऱ्या अळ्या गॉल पुष्पांच्या स्त्रीबीजांवर गुजराण करतात. त्यांची कोषावस्था संपून जेव्हा त्या मोठय़ा होतात तेव्हा त्या पुष्पकुंभातून बाहेर पडतात. बाहेर पडताना त्यांच्या शरीराला नरपुष्पांचे परागकण चिकटतात. या माश्या जेव्हा दुसऱ्या पुष्पकुंभात शिरतात तेव्हा तेथील लांब सोंडांच्या स्त्रीपुष्पांचे परागीकरण करतात.
ऑíकडच्या फुलांमध्ये मधमाशीला उतरण्यासाठी पाकळ्यांची एक खास धावपट्टी असते. ऑíकडच्या फुलातील परागकण सुटे नसतात. एकमेकांना चिकटून त्यांचे दोन संच तयार होतात, जे एकमेकांना एका टोकाला चिकटलेले असतात. मधमाशी पुष्परस गोळा करण्यासाठी आपली सोंड फुलांत खुपसते तेव्हा या चिकट पॉलिनिया माशीच्या कपाळाला चिकटतात व परागीभवन होते.
रुईच्या फुलांतदेखील अशाच जोड पॉलिनिया असतात. या फुलात मधमाशीला स्त्रीकेसराचा पंचकोनी सपाट पृष्ठभाग धावपट्टीचे काम करतो. या चिकट पॉलिनिया मधमाशीच्या केसाळ पायांना किंवा सोंडेला अडकून बाहेर पडतात. जेव्हा ती मधमाशी दुसऱ्या फुलाच्या स्त्रीकेसरावर उतरते तेव्हा फुलाचे परागीकरण होते.
सुरणाच्या काही जातीत पुष्पसहमतींमध्ये परागीकरण हे गोगलगायीच्या मार्फत होते. तर लांब चोचीच्या छोटय़ा पक्ष्यांद्वारे बिगनोनिया, थनबर्जीय स्टर्लिटझिया यांच्या फुलांचे परागीकरण होते. फुलांतील पुष्परस चोचीने शोषताना हे पक्षी एका फुलातील परागकण दुसऱ्या फुलाच्या स्त्रीकेसरापर्यंत पोहोचवतात यांत हमिंगबर्ड, हनी थ्रसीस अशा पक्ष्यांचा सहभाग असतो, काटेसावर एरिíथना अशा वृक्षांच्या मोठाल्या फुलांचे परागीकरण कावळे-मना अशा पक्ष्यांद्वारे होताना दिसते. पाण्याच्या खाली वाढणाऱ्या वनस्पतीत परागीभवन हे पाण्याच्या माध्यमातून होते. फुले धारण करणाऱ्या वनस्पतींमध्ये अशा प्रकारे विवाह संपन्न होतो.
– डॉ. रंजन देसाई
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2016 3:41 am

Web Title: barlin city
Next Stories
1 नागर आख्यान : बर्लिनची भिंत
2 कुतूहल : सपुष्प वनस्पतींमधील विवाह संस्था
3 दुसऱ्या महायुद्धातले बर्लिन
Just Now!
X