पोळ्यांमध्ये साठविलेला मध पोळी न मोडता सुरक्षितपणे काढता यावा म्हणून मधनिष्कासन यंत्राची निर्मिती झाली. आईस्क्रीमच्या यंत्राप्रमाणे हॅण्डलच्या दांडय़ाने गरगर फिरवता येईल, अशा रचनेच्या या यंत्रात मधाची पोळी उभी ठेवली जातात. त्यामुळे पोळ्यांतील षट्कोनी घरात साठविलेला पातळ मध केंद्रोत्सारी गतीने बाहेर फेकला जातो आणि तोटीद्वारा गोळा करता येतो. रिकामी पोळी पुन्हा मोहोळाच्या पेटीत मध भरण्यासाठी पोळ्यात ठेवता येतात.

 मोहोळातील एकमेव राणीमुळे मोहोळ एकत्रितपणे कार्य करतं. मोहोळ हाताळताना किंवा मोहोळाच्या उठावाच्या प्रवृत्तीमुळे मोहोळ राणीसकट उडून जाऊ शकतं व मधपोळाचं नुकसान होतं. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी राणीला मोहोळात बंदिस्त ठेवावे लागते. त्याच वेळी कामकरी माश्यांची मोहोळाच्या दारातून होणारी जा-ये मुक्तपणे होऊ द्यावी लागते. राणी कामकरी माश्यांपेक्षा आकाराने मोठी असते. त्यामुळे कामकरी माश्या सहज जाऊ शकतील, पण राणी जाऊ शकणार नाही, एवढी लहान भोके असलेली द्वारपेटी मोहोळाच्या पेटीच्या द्वारावर बसवितात. त्याचप्रमाणे वरच्या मधाच्या कोठीत जाऊन राणीने अंडी घालू नयेत, म्हणूनही याच पद्धतीची जाळी संगोपनकक्ष व मधकोठी यांच्यामध्ये ठेवतात. याचा शोध सन १८००च्या सुमारास प्रोकोपोविच व त्याच्या सहकाऱ्यांनी लावला.

पुढे मधमाश्या पालनासाठी अनेक साधनांची निर्मिती झाली. मधमाश्यांची श्रवणशक्ती, दृष्टी, रंग व गंध ओळखण्याची क्षमता व कौशल्ये, संदेशवहन पद्धती, परागकण व मधुसंकलन पद्धती अशा विषयांवर संशोधन झाले.  मधमाश्यांना उपयुक्त तसेच घातक अशा विषारी वनस्पतींचा अभ्यास झाला. त्यांना उपयुक्त मधुवनस्पतींच्या लागवडीसाठी प्रयत्न झाले. मधमाश्यांद्वारा कृषीपीक संवर्धन कसे होते आणि त्यासाठी त्यांचा उपयोग कसा करून घेता येईल, यावरही जगभर संशोधन झाले व चालू आहे. परागकणांचे सखोल संशोधन झाले. त्यावरून मधुस्रोत निश्चित करण्याची पद्धत तयार झाली. मधमाश्यांच्या कमी डंख मारणाऱ्या मवाळ जातीच्या नवीन वाणांची आनुवंशिकशास्त्राचा आधार घेऊन आणि संगोपनशास्त्राच्या मदतीने निर्मिती करण्याचे यशस्वी प्रयत्न झाले. त्यासाठी राणीमाशीच्या कृत्रिम रेतन तंत्राची व साधनांची निर्मितीही करण्यात आली.

– डॉ. क. कृ. क्षीरसागर (पुणे) मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

 

आजचे महाराष्ट्रसारस्वत    १५ मे

१९०३ > कवी व समीक्षक रामचंद्र श्रीपाद जोग यांचा जन्म. ‘निशिगंध’ या नावाने त्यांनी काव्यरचना केली, तीन काव्यसंग्रह निघाले, परंतु त्यांची ओळख संस्कृत व अर्वाचीन मराठी काव्याचे सखोल अभ्यासक अशी राहिली. ‘मराठी वाङ्मयाभिरुचीचे विहंगमावलोकन’  ‘अभिनव काव्यप्रकाश’, ‘काव्यविभ्रम’, ‘सौंदर्यशोध, आनंदबोध’, ही पुस्तके अभ्यासकांना आजही उपयुक्त आहेत. ‘केशवसुत काव्यदर्शन’सह अनेक काव्यसंग्रहांचे सटीक संपादन त्यांनी केले.

२००४ > ‘सांगा आम्हाला बिर्ला बाटा, टाटा कुठं हाय रं.. तुमचा धनाचा साठा न् आमचा वाटा कुठं हाय रं..’ यासारखी संघर्षगीते लिहिणारे लोककवी व आंबेडकरी संघर्षांचे जनशाहीर वामन तबाजी कर्डक यांचे निधन. १९४० साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भेट घेऊन त्यांच्या सभांमध्ये वामनदादा गायले. त्यांचे तीनच गीतसंग्रह (वाटचाल- १९७३, मोहळ- १९७६ आणि हे गीत वामनाचे- १९७७) व आत्मकथन (माझ्या जीवनाचं गाणं- १९९६) प्रकाशित झाले असले, तरी पुढे त्यांच्या गाण्यांचे संग्रह अनेकांनी काढले; त्यांच्या योगदानाचा अभ्यासही अनेकांनी केला. २०१२ पासून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात ‘वामनदादा कर्डक अध्यासन’ स्थापण्यात आले आहे.

संजय वझरेकर

 

वॉर अँड पीस                               गृध्रसी / सायटिका झ्र् १

अष्टांग आयुर्वेद महाविद्यालयाचे संस्थापक सर्वेसर्वा कै. वैद्य हरिभाऊ परांजपे क्वचितच शिकवावयास येत. शल्यशालाक्य हा त्यांचा आवडीचा विषय. असेच एकदा ‘गृध्रसी’ – सायटिका हा विकार शिकवण्याचा योग त्यांनी आणला. ती आठवण नेहमीच होते.

अलीकडे एरवी पूर्ण निरोगी प्रकृती असलेले एक गृहस्थ कंबरेस एका बाजूला विलक्षण दुखतेय म्हणून आले. उगाचच सर्व तपासण्या कराव्या लागल्या होत्या. निमित्त स्कूटर बिघडल्यामुळे खूप ‘किक’ माराव्या लागल्या, हे झाले होते. असो. लेप, शेक, तात्पुरते औषध व काही दिवस स्कूटर बंद अशा उपचारांनी रुग्ण बरा झाला. एका दंतचिकित्सकांना दिवसाचे आठ आठ तास उभे राहण्याने हाच त्रास सुरू झाला. वरीलप्रमाणेच उपचारांनी त्यांना बरे वाटले. त्यांच्या दीर्घकाळच्या पेनकिलरपासून त्यांची सुटका झाली.

वातविकारात ढोबळमानाने दोन प्रकार पडतात. रस, रक्त, मांस इत्यादी धातूंचा क्षय झाल्यामुळे वात वाढतो. वाताच्या कार्यात, स्रोतातील अडथळ्यामुळे वहनक्रिया बिघडून नवे वातविकार उत्पन्न होतात. सायटिका वा गृध्रसी हा विकार दुसऱ्या प्रकारात मोडतो. शास्त्रकारांनी, पाष्र्णि प्रत्यंगुलींना या कंडरा मारुतार्दिता । सक्थ्युत्क्षेपं निगृण्हाति गृध्रसीं तां प्रचक्षते ।। . एवढेच वर्णन केले असले तरी जेव्हा या विकाराच्या कळा, तीव्र वेदना सुरू होतात तेव्हा बोलता सोय नाही इतका त्रास रोगी भोगतो. अशा गृध्रसीस शास्त्रात खल्ली म्हणतात. आगंतु कारणाप्रमाणेच, आमनिर्मिती हे सायटिका विकाराचे एक प्रमुख कारण आहे असा अनुभव आहे.

 लक्षणे- प्रथमत: कंबरेपासून तीव्र वेदना, ताठणे सुरू होणे. क्रमाक्रमाने पाठ, मांडय़ा, पोटरी- शेवटी टाचेपर्यंत वेदना, ताठणे, कंप, टोचल्यासारखी पीडा. किंचितही हालचाल सहन होत नाही. मलावरोध, चिकट परसाकडे, भूक नसणे, अरुची. डोळ्यावर झापड, तोंडाला पाणी सुटणे, अवयव जखडल्यासारखे वाटतात. आमवातासारखी इतर लक्षणे होणे.

वैद्य प. य. वैद्य खडीवाले

 

जे देखे रवी..        वंचना वनवास आणि वणवण = ज्यू

१९७२ च्या हिवाळ्यात नाताळचे पडघम वाजू लागल्यावर ें२ आणि नंतरचे सात दिवस कोणी ऊ४३८ करायची याबद्दल रदबदली सुरू झाली. त्यावेळी टेलर नावाचा आमच्या जमूतला एक निवासी डॉक्टर मला म्हणाला, ‘मला ें२ मध्ये सुट्टी घेण्याची गरज नाही. कारण मी आहे ज्यू पण माझा ज्यूपणा इथे कोणाला माहीत नाही. म्हणून मी सुट्टी घेण्याचे नाटक करणार आहे. त्यावेळी मी तुला मदत करीन पण आमचा एक सण थोडा आधी येतो आहे त्यावेळी मला मदत कर.’ तेव्हा अमेरिकेतल्या लोकांमध्ये ज्यू लोकांबद्दलची भावना किती खोल असणार याची कल्पना आली. जगभर पसरलेल्या ज्यू लोकांमध्ये शारीरिक साम्य फारसे नाही. परंतु गुणवत्ता, चिकाटी, कळपाने राहण्याची वृत्ती, शिक्षणाबद्दल आस्था आणि सहजासहजी मते न बदलण्याचा स्वभाव यामुळे हे लोक जगातील अनेक देशांत, एतद्देशीयांच्या नजरेत सलत राहिले आहेत. इजिप्तमधून त्यांना म्हणूनच हाकलले तेव्हा मोझेस त्यांचा नेता होता. पुढे कर्मठ ज्यू पुजाऱ्यांविरुद्ध येशूने एल्गार दिला तेव्हा यांनी रोमन सरदारांशी संगनमताने येशूला क्रुसावर चढवले असा कच्चाबच्चा इतिहास आहे. तेव्हापासून आमच्या देवाच्या मुलाचे मारेकरी अशी यांची ख्याती झाली आणि वर्षांनुवर्षे नव्हे अनेक शतके यांच्या हालाला पारावार उरला नाही.

 शेतकरी, दुकानदार, कलाकार, नोकरदार, व्यापारी, शिक्षक, मुत्सदी अशा अनेक रूपांमध्ये ते सर्वत्र वावरले पण थोडे वर चढले की बहिष्कृत केले गेले आणि देशोधडीला लागले असेच अनेक शतके होत गेले. हे ख्रिश्चन झाले नाहीत हे त्यांच्यावरच्या रागाचे मुख्य कारण. पुढे हिटलरने तर यांची जमात नष्ट व्हावी म्हणून अनेक लाख ज्यू लोकांना यमसदनाला पाठवले. त्या काळातले जे पाच लाख लोक अमेरिकेला पळाले त्यातले एक लाख ज्यू होते आणि हिटलरला भीती वाटण्याजोगे तरी काय होते? जर्मनीतली फक्त एक टक्का माणसे ज्यू होती. जगात तर अर्धा टक्काही नसतील. तरी जर्मनीला जी नोबेल पारितोषिके मिळाली त्यातली तीस टक्के ज्यू लोकांना मिळाली आणि तेच प्रमाण थोडय़ाफार फरकाने जगात आहे. ख्रिश्चनांशी वैमनस्य म्हणून मोहम्मद पैगंबराने यांच्याशी जवळीक करण्याचा प्रयत्न केला, पण तिथेही यांनी आपले वेगळेपण दाखवले. तेव्हा तोही विरोधात गेला. यांच्याबद्दल एकच गंमत सांगतो. मनोविश्व उलगडणारा फ्रॉईड, विश्वाचे अंतरंग उलगडणारा आइनस्टाइन आणि समाजाची आर्थिक उलगड नव्याने मांडणारा मार्क्‍स तिघेही ज्यू होते. आणि असेच शेकडो-हजारो झाले. आणि माझा मित्र टेलर म्हणत होता मला माझे ज्यूपण उघड करायची इच्छा नाही. मनुष्यजातीला मुक्ती नाही हेच खरे!

रविन मायदेव थत्ते