News Flash

बर्केलिअम

सातत्याने नव्याचा शोध घेण्याची जिज्ञासा आणि प्रयत्न शास्त्रज्ञांना स्वस्थ बसू देत नाही, हेच खरं!

सातत्याने नव्याचा शोध घेण्याची जिज्ञासा आणि प्रयत्न शास्त्रज्ञांना स्वस्थ बसू देत नाही, हेच खरं! मूलद्रव्यांची आवर्तसारणी निर्माण झाल्यावर त्यात सतत नवनवीन पदार्थ शोधून भर टाकत राहाण्याची हौस अनावरच! बर्कले कॅलिफोíनया येथील विद्यापीठातील ग्लेन सीबोर्गने अ‍ॅक्टिनाइड गटामधील मूलद्रव्यांचा शोध लावण्याचा सपाटाच लावला होता आणि बर्केलिअम हे असे पाचवे कृत्रिम मूलद्रव्य १९४९ मध्ये प्रयोगशाळेत निर्माण करण्यात यश मिळवले. स्टॅन्ली थाँप्सन, ग्लेन सीबोर्ग आणि अल्बर्ट घीओर्सो या त्रिकुटाने एका सायक्लोट्रॉनद्वारे ७ मिलिग्रॅम अमेरिशिअम-२४१च्या आम्लिक द्रावणावर अल्फा किरणांचा जबर मारा केला आणि बर्केलिअम-२४३ तयार झाले; ते त्यांनी आयन विनिमयाद्वारे वेगळे केले. सुमारे ९ वर्षांनंतर डोळ्याला दिसू शकेल इतके हे मूलद्रव्य तयार झाले. १९६२ मध्ये अति सूक्ष्म प्रमाणात बर्केलिअम क्लोराईड तयार केले. चांदीसारखा दिसणारा हा धातू फ्लोरिन, क्लोरिन, ऑक्सिजनबरोबर संयुगे करतो. आम्लामध्ये चटकन विरघळणाऱ्या या मूलद्रव्याचे नाव त्याच्या बर्कले या जन्मगावापासून ठेवण्यात आले आहे. याचा आपल्याला तसा उपयोग नाही; मुळात इतकी यातायात करून थोडेसे द्रव्य हाती लागते. किरणोत्सारी असल्यामुळे इतर किरणोत्सारी पदार्थासारखेच त्यापासून धोकेही आहेतच! अशा या मूलद्रव्याची १० समस्थानिके आहेत. सर्वात जास्त म्हणजे ३३० वष्रे एवढे अर्ध-आयुष्य कालावधी असलेले एकच; बर्केलिअम-२४९! ते अगदी सौम्य ऊर्जेचे इलेक्ट्रॉन सोडते पण त्यातून निर्माण होणारे कॅलिफोíनअम-२४९ मात्र उच्च क्षमतेचे अल्फा-किरण सोडते जे त्रासदायक ठरते. असे हे मूलद्रव्य किरणोत्सारामुळे झालेल्या अपघात-क्षेत्रात काही काळ सापडण्याची शक्यता असते; उदा. चेर्नोबील, थ्री माईल आईलँड येथील अपघात पण पृथ्वीच्या कवचात मात्र नसíगकरीत्या नसते.

२००९ मध्ये २५० दिवस ‘कॅलिफोर्निअम-२४४’ वर अल्फा किरणांचा मारा करून नंतर ९० दिवस शुद्धीकरण करून ओक रीज येथील प्रयोगशाळेत रशिया व अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमानाने २२ मिलिग्रॅम बर्केलिअम-२४९ तयार केले ज्याचा उपयोग करून शास्त्रज्ञांना आणखी नवी वजनदार मूलद्रव्ये बनवायची आहेत. या शास्त्रज्ञांच्या कल्पनाशक्तीला सलाम!

– डॉ. कविता रेगे

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2018 12:23 am

Web Title: berkelium chemical element
Next Stories
1 जे आले ते रमले.. : दिल्लीकर सासकिया राव (२)
2 कुतूहल : ग्लेन थिओडोर सीबोर्ग
3 जे आले ते रमले.. : सासकिया राव डी हास (१)
Just Now!
X