अ‍ॅडॉल्फ हिटलरने त्याचे राजकीय विरोधक आणि ज्यू जमातीचे पद्धतशीर शिरकाण सुरू केले. बíलन शहरात १९३३ साली १,६०,००० ज्यू राहात होते. हिटलरच्या कडव्या ज्यूविरोधाचे चटके बसू लागल्यावर त्यांनी साधारणत: १९३६ पासून बíलनपासून दूरवरच्या गावांमध्ये स्थलांतर सुरू केले. परंतु हिटलरचे हात त्यांच्यापर्यंत पोहोचू लागल्यावर बऱ्याच ज्यूंनी दुसऱ्या देशांमध्ये पलायन केले. १९४१ पर्यंत ९०,००० ज्यू दुसऱ्या देशांमध्ये स्थलांतर करण्यात यशस्वी झाले. साधारणत: ५९,००० ज्यू हिटलरच्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये मारले गेले. १४०० ज्यू मात्र एवढय़ा मोठय़ा शिरकाणातून इतर बíलनकरांच्या मदतीमुळे बíलनमध्ये सहीसलामत राहिले. १ सप्टेंबर १९३९ रोजी हिटलरने पोलंडविरुद्ध युद्धाची घोषणा करून दुसरे विश्वयुद्ध सुरू झाले. १९४३ साली जर्मन सन्याच्या स्टालिनग्राडमध्ये झालेल्या अनपेक्षित पराभवानंतर हिटलरचा प्रचारमंत्री जोसेफ गोबेल्सने दोस्त राष्ट्रांविरुद्ध लढा आणखी प्रखर करण्याची घोषणा बर्लिनमध्ये केली. या घोषणेनंतर दोस्त राष्ट्रांच्या आघाडीने बर्लिनवर जोरदार बॉम्बवर्षांव चालू केला. १९४३ च्या अखेरीपर्यंत बर्लिनमधल्या दहा लाख नागरिकांनी युद्धाच्या भीतीने दुसरीकडे स्थलांतर केले, तर अँग्लो-अमेरिकन बॉम्बहल्ल्यात ५०,००० बíलनकर बळी पडले. जुल १९४४ मध्ये हिटलरच्या सहकाऱ्यांमध्ये त्याच्या खुनाचे कारस्थान शिजत होते. ते उघडकीला येऊन कर्नल क्लॉक ग्राफ आणि त्याच्या ९० सहकाऱ्यांना बर्लिनमधील लष्कराच्या मुख्यालयातच गोळ्या घातल्या गेल्या. पुढचे पाच महिने या कटाशी संबंधित व्यक्तींची मोठय़ा प्रमाणात धरपकड होऊन एकूण २५०० लोकांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले. २१ एप्रिल १९४५ रोजी लाल सेनेने बíलनमध्ये प्रवेश करून शहरातच युद्ध सुरू झाले. ३० एप्रिल रोजी या दुसऱ्या महायुद्धाची अखेर हिटलरच्या आत्महत्येने झाली. ८ मे १९४५ रोजी कार्लशास्र्त या बíलनच्या उपनगरातील जर्मन लष्करी छावणीत जर्मनीचे प्रमुख लष्करी अधिकारी आणि दोस्त राष्ट्रांच्या आघाडीचे प्रतिनिधी यांनी तहाच्या दस्तऐवजांवर सह्य़ा केल्या आणि दुसऱ्या महायुद्धाची सांगता झाली.
– सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com

 
विष पचविण्यासाठी बदल
एका सार्वजनिक उद्यानात गवताच्या गालिच्याचीही काळजी घेतली जाई. उद्यानातल्या दिव्यांच्या खांबावर पांढरा रंग लावण्याचे काम चालू होते. रंगाऱ्याच्या हातातून रंग गवताच्या गालिच्यावर सांडला. रंगातल्या अ‍ॅल्युमिनिअमचा परिणाम होऊन रंग पडलेल्या भागातले गवत जळून गेले. गालिच्यात एक बोडके ठिगळ दिसू लागले. माळ्याला वाईट वाटले. आठेक दिवसांनंतर गवतावर पाणी मारताना माळ्याला त्या ठिगळावर गवताची पाती दिसली. बाजूला गवताच्याच जातीची, पण आकारात रंगात थोडासा बदल असलेली पाने जराशी आखूड गडद हिरव्या रंगाची.
आठवडय़ानंतर ठिगळावरचे गवत दाट वाढले, पण रंगरूप तसेच वेगळे. माळ्याने ते गवत उद्यान अधिकाऱ्याला दाखवले. अधिकाऱ्याने दोन्ही प्रकारच्या गवतांचे नमुने मुळांसह गोळा करून तपासणीसाठी विद्यापीठात दिले. ठिगळातल्या गवताच्या प्रकाराबद्दल चौकशी केली. महिन्यानंतर उत्तर आले दोन्ही गवतांचे नाव एकच, पण ठिगळात नव्याने निर्माण झालेल्या प्रकाराला अ‍ॅल्युमिनिअम निषिद्ध नाही.
दुर्वा (सायनोडॉन) या गवतामध्ये नव्या पिढीत नवीन प्रकारचे वाण निर्मिण्याची क्षमता आहे. नव्या वाणाला मातीतल्या अ‍ॅल्युमिनिअमच्या अस्तित्वाने काही फरक पडत नाही. म्हणून ते वाण त्या ढिगावर वाढले.
वनस्पतिविश्वात असे बदल दाखवणाऱ्या अनेक जाती आहेत. काहींमध्ये बदल होण्यासाठी रोपटय़ांच्या अनेक पिढय़ा जाव्या लागतात, तर काहींच्यात असा बदल एखाददुसऱ्या पिढीतही होऊ शकतो म्हणून निरनिराळ्या रासायनिक द्रव्यांच्या, अगदी जड विषारी धातूंच्या खाणीच्या परिसरातसुद्धा अशी द्रव्ये पचवून वाढत राहणारे वनस्पती प्रकार सापडतात.
चुना खाऊन वाढणारी झाडे आपण नेहमी पाहतोच. ठाणे जिल्हय़ातील तुंगारेश्वर टेकडय़ांवर अ‍ॅल्युमिनिअम, व्हॅनॅडियम शोषूनही टाकळ्याचे वाण वाढल्याची नोंद आहे. राजस्थानातल्या झाडावर जस्त व शिसे खाऊन जगणारे दुर्मीळ वाण आहेत. इंग्लंडमधल्या आस्रेनिक खाणींच्या परिसरातील सायलीनचे वाण, अमेरिकेतील सॉल्ट लेक सिटीजवळच्या िबघ्ॉम कॅन्यन या तांब्याच्या खाण परिसरातील म्यूलेनबर्जयिा अशी अनेक उदाहरणे आहेत
असे बदल त्या त्या वनस्पतीतील शारीरिक सहनशीलतेचा परिणाम आहे, की जनुकीय बदलाचा परिणाम आहे ते प्रयोगांच्या साहाय्याने ठरवता येते.
डॉ. शरद चाफेकर
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org