News Flash

नागर आख्यान : बर्लिनची भिंत

दुसऱ्या महायुद्धात उद्ध्वस्त झालेल्या जर्मनीचे चार तुकडे करून ते चार जेत्यांनी आपसात वाटून घेतले.

दुसऱ्या महायुद्धात उद्ध्वस्त झालेल्या जर्मनीचे चार तुकडे करून ते चार जेत्यांनी आपसात वाटून घेतले. त्याचप्रमाणे राजधानी बíलनचेही झालेले चार तुकडे जेत्यांमध्ये वाटले गेले. त्यापकी पश्चिमेचे तीन तुकडे अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सकडे आले, तर पूर्वेकडचा तुकडा रशियाच्या सोव्हिएत युनियनकडे आला. पश्चिम बíलनमध्ये आíथक सुबत्ता, जीवनावश्यक वस्तूंची मुबलकता, व्यक्तिस्वातंत्र्य होते, तर त्याच्या उलट पूर्वेकडे डबघाईला आलेली आíथक परिस्थिती, वस्तूंची टंचाई आणि आकाशाला भिडलेले भाव, सरकारी जाच. यामुळे १९४५ साली फाळणी झाल्यापासून पूर्वेकडचे लोक पश्चिमेकडे स्थलांतर करू लागले. इ.स. १९४९ ते १९६१ या काळात पूर्वेकडचे २५ लक्ष विद्वान, बुद्धिजीवी, कुशल कारागीर पश्चिम बर्लिनमध्ये राहावयास गेले. या काळात पूर्व बíलनची लोकसंख्या वीस टक्क्यांनी घटल्यामुळे निकिता क्रुश्चेव्ह यांनी १३ ऑगस्ट १९६१ रोजी पश्चिम बर्लिनकडची सरहद्द बंद करून पूर्व आणि पश्चिम बर्लिनमध्ये एका दिवसात ४३ कि.मी. लांबीचे काटेरी तारांचे कुंपण घातले. त्यानंतर बाकी पश्चिम बर्लिनभोवती १५५ कि.मी. लांबीचे कुंपण घालून संपूर्ण कुंपणामध्ये ११६ वॉच टॉवर्स बांधले गेले. पुढे पूर्व-पश्चिम बर्लिनमधील ४३ कि.मी. कुंपणाच्या दोन्ही बाजूंना ३.६ मीटर उंचीच्या दोन िभती बांधण्यात आल्या. सवा मीटर रुंदीच्या या दोन िभतींमध्ये १०० मीटरचे अंतर होते. लोकांनी िभतींवरून पलीकडे जाऊ नये म्हणून वॉच टॉवर्समधल्या बंदुकधाऱ्या सनिकांना िभतीवरून जाणाऱ्यांना गोळ्या घालायचे अधिकार होते, तारांच्या कुंपणात विद्युतप्रवाह सोडला होता. तरीही १९६१ ते १९८९ या काळात ५००० लोकांनी यशस्वी पलायन केले, तर त्या प्रयत्नात २०० जण मृत्युमुखी पडले. पुढे सोव्हिएत युनियनच्या अस्तानंतर ९ ऑक्टोबर १९८९ रोजी पूर्व बर्लिन सरकारने पश्चिमेकडचा प्रवेश खुला केल्यावर दोन्ही बíलनवासीयांनी िभतीवर चढून नाचगाण्यांच्या जल्लोशात आपला आनंद व्यक्त करून ही बर्लिनची िभत तोडूनफोडून टाकली. ३ ऑक्टोबर १९९० रोजी पूर्व व पश्चिम बर्लिनचे एकीकरण झाले.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com

कुतूहल – कीटकांद्वारे परागण
कीटकांमार्फत परागीभवन होणारी फुले विविध प्रकारे कीटकांना आकर्षति करतात. त्यांचे परागकण खरखरीत व चिकट असल्याने कीटकांच्या पायांना किंवा अंगावरील केसांना चिकटतात व कीटक ते एका फुलाकडून दुसऱ्या फुलाकडे स्थलांतरित करतात.
जास्वंद, सूर्यफूल, कारवी अशी भडक रंगाची फुले, मोठय़ा आकाराची फुले कीटकांना आकर्षति करतात. विविध कीटकांना वेगवेगळे रंग आकर्षति करतात. उदा. मधमाशांना निळा रंग, तर फुलपाखरांना लाल रंग आवडतो.
काही कीटक फुलांच्या गंधाने आकर्षति होतात व त्यांचे परागीभवन करतात. पारिजातक, रातराणीसारखी रात्री उमलणारी सफेद फुले किंवा विशेष आकर्षक रंग नसलेली काही फुले त्यांच्या सुगंधाने निशाचर कीटकांना आकर्षति करतात, तर सुरण, अळू यांच्या पुष्पसहमती तसेच जगातील सर्वात मोठय़ा आकाराची ‘रॅफ्लेसिया’ची फुले त्यांच्या दरुगधीमुळे माश्यांना आकर्षति करतात.
कित्येक फुलांच्या पाकळ्यांच्या तळाशी मधुर पुष्परस स्रवणाऱ्या ग्रंथी असतात. पुष्कळ कीटक, फुलपाखरे अशा फुलांवर रुंजी घालताना दिसतात. कारवी, जांभूळ, गेळ अशा फुलांचा मधमाश्यांनी गोळा केलेल्या पुष्परसांचा मध होतो व त्यांच्या नावाने तो प्रसिद्ध आहे.
भडक रंग, गंध आणि मधुर पुष्परसाच्या प्रलोभनाप्रमाणेच निसर्ग काही वनस्पतींच्या अवयवांमध्ये खास बदल घडवून आणतो. त्याच्यामुळे ठरावीक कीटकांद्वारेच त्यांचे परागीकरण होते. तुळशीच्या कुळातील ‘साल्विया’ या वनस्पतीच्या फुलांतील पुंकेसर व स्त्रीकेसर वेगवेगळ्या वेळेस वयात येतात. हे दोन्ही अवयव संयुक्तपाकळ्यांत दडलेले असतात.
पुंकेसर आधी परिपक्व होतो. मधमाशी त्या फुलात शिरताक्षणी पुंकेसराचा मागील भाग आत ढकलला जातो. त्यामुळे परागकोश असलेला पुढील भाग मधमाशीच्या पाठीवर टेकतो व त्यातील परागकणांचा सडा तिच्या पाठीवरील केसांवर पडतो. यथावकाश स्त्रीकेसर परिपक्व होतो. त्याची वाढ होऊन तो संयुक्त पाकळ्यांच्या खाली लोंबतो. तेव्हा दुसऱ्या फुलातील परागकण पाठीवर घेऊन फिरणारी मधमाशी पुष्परस प्राशन करण्यासाठी फुलात शिरते त्या वेळेस तिच्या पाठीच्या केसात अडकलेले परागकण तो टिपून घेतो. अशा रीतीने सॅल्वियाचे परागीकरण होते.
– डॉ. रंजन देसाई ,मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 30, 2016 12:52 am

Web Title: berlin wall
टॅग : Navneet
Next Stories
1 कुतूहल : सपुष्प वनस्पतींमधील विवाह संस्था
2 दुसऱ्या महायुद्धातले बर्लिन
3 बर्लिनची सूत्रे हिटलरकडे
Just Now!
X