स्कविरग झाल्यानंतरची प्रक्रिया म्हणजे विरंजन (ब्लीचिंग) प्रक्रिया. ही अतिशय महत्त्वाची प्रक्रिया असल्यामुळे स्कविरग व्यवस्थित झालेले असायला हवे. तसेच कापडावर कुठेही पिवळे डाग असायला नकोत. असल्यास विरंजन प्रक्रियेत विरंजकाचे प्रमाण कमी-जास्त केले जाते. पूर्वी विरंजनासाठी कॅल्शिअम हायपोक्लोराईट हे पावडर स्वरूपात उपलब्ध असलेले रसायन वापरले जात होते. ही पावडर ब्लीचिंग पावडर म्हणून ओळखली जाते. विरंजनासाठी आता सोडिअम हायपोक्लोराईडचा उपयोग केला जातो. हे रसायन द्रव स्वरूपात वापरले जाते. या रसायनाचे विघटन होते, तेव्हा मोकळा होणारा (ड) या स्वरूपातील ऑक्सिजन अतिशय प्रभावी असतो. त्याची रंगावर प्रक्रिया होऊन कापड सफेद होते. सोडिअम हायपोक्लोराईटचे १२० ग्रॅम/लीटर या प्रमाणातील द्रावण वापरले जाते. कापडावर प्रक्रिया करताना द्रावणात ३ ग्रॅम प्रतिलिटर क्लोरीनचे प्रमाण ठेवून सामू १२ आणि तापमान ३० अंश सेल्सिअस एवढे ठेवले जाते. कापड द्रावणात ठेवण्याचा अवधी १ ते २ तास एवढाच असतो, म्हणजे विरंजन प्रक्रियेचे कापडावर विपरीत परिणाम होत नाहीत. विरंजन प्रक्रियेनंतर सोडिअम थायो सल्फेटच्या किंवा हायड्रोक्लोरिक आम्लाच्या द्रावणातून बुडवून काढले जाते. त्यामुळे उर्वरित क्लोरिनचे पूर्ण उच्चाटन केले जाते. पहिली धुलाई सोडिअम बायकाबरेनेटच्या द्रावणातून करतात तर नंतरची धुलाई साध्या पाण्यातून केली जाते.    विरंजन प्रक्रियेसाठी हायड्रोजन पेरॉक्साईडचा वापरही केला जातो. कापडाच्या वजनाच्या प्रमाणात हायड्रोजन पेरॉक्साईड (५०%), सोडिअम सिलिकेट आणि सोडा अ‍ॅश याचे द्रावण वापरले जाते. भट्टीत केल्या जाणाऱ्या या प्रक्रियेत प्रथम कापड भरून मग पाणी भरतात आणि नंतर रसायने घातली जातात. झाकण उघडे ठेवून भट्टीचे तापमान ९५ अंश सेल्सिअसपर्यंत गरम करून सहा तास कापड बुडवून ठेवतात. नंतर थंड पाण्याने कापडाची धुलाई केली जाते. ही दुसरी प्रक्रिया खर्चीक आहे. पण ही अधिक परिणामकारक असून टिकाऊ पण आहे. रंगीत धाग्यावर ह्य़ा प्रक्रियेत काहीही परिणाम होत नाही. नवीन आस्थापनामध्ये धुलाई, कांजी काढणे, स्कवरिंग आणि विरंजन या सर्व प्रक्रिया एकाच सलग यंत्रात एकामागोमाग एक केल्या जातात.

प्रबोधन पर्व: स्त्रियांविरुद्धच्या गुन्ह्यांचे कायदेही स्त्रियांविरुद्ध
‘‘न्यायव्यवस्थेचा वरवर अभ्यास करतानाही ध्यानात येते की, या व्यवस्थेला अजूनही स्त्रियांचे स्वातंत्र्य पूर्णपणे मान्य झालेले नाही. वरिष्ठ जातींतील स्त्रियांना वैयक्तिक कायद्यामधील अन्याय बोचले तेवढे त्यांनी प्रयत्न करून दूर करून घेतले. पांढरपेशा स्त्रिया मिळवत्या झाल्यावर त्यांची कामगार कायद्यांशीही थोडी ओळख झाली. दंडसंहितेकडे मात्र जागृत स्त्रियांचे लक्ष अजूनही गेलेले नाही. दंडसंहिता गुन्हेगारांसाठी आहे ही समजूत त्याच्या मुळाशी कदाचित असेल. दंडसंहितेकडे इतके दुर्लक्ष होण्याचे कारण स्वातंत्र्यकाळापूर्वीपर्यंत वरिष्ठ व कनिष्ठ जातींमध्ये पसरलेली प्रचंड सामाजिक दरी हेही असेल. कनिष्ठ जातींतील स्त्रियांना अज्ञानामुळे अन्यायाकडे लक्ष द्यावेसे वाटत नसे. आणि आपल्याविरुद्ध एखादा गुन्हा झाला तर गुन्हेगाराविरुद्ध कोर्टात न जाता, स्त्रियांनाच दोष देऊन पुरुष आपल्या जबाबदारीतून मुक्त होत असत.’’
गीता साने ‘भारतीय स्त्रीजीवन’ (ऑगस्ट १९८६) या पुस्तकातील ‘स्त्री आणि भारतीय न्यायव्यवस्था’ या प्रकरणात स्त्रियांच्या दृष्टीने न्यायव्यवस्थेची चिकित्सा करतात. त्यातील त्रुटींवर बोट ठेवताना त्यातील दंडसंहितेच्या तरतुदीकडे निर्देश करताना लिहितात –
‘‘सर्वच कायदे स्त्रीला दुय्यम समजतात, पण त्यांतही दंडसंहिता अधिक जाचक आहे. तिच्याविरुद्ध एकाकी बंड करण्याची शक्ती कुणाही स्त्रीला नाही, कारण साऱ्या समाजाची संघटित शक्ती तिच्यावर तुटून पडून तिचा केव्हाच नायनाट करून टाकते. दंडसंहितेमध्ये योग्य ते फेरफार करून घेण्यासाठी, दंडसंहिता व तिची अंमलबजावणी यांचा सखोल अभ्यास करून, ‘स्त्री सगळी एकच आहे’ या तत्त्वावर नव्या तरतुदी पुढे रेटण्याची चळवळ उभारणे, एवढा एकच मार्ग स्त्रियांच्या पुढे आहे. जागृत स्त्रियांनी असे प्रयत्न न केल्यास, दंडसंहिता व तिला साथ देणारे क्रिमिनल प्रोसीजर कोड व साक्षीविषयक कायदा यांच्यात मूलभूत परिवर्तन आवश्यक आहे ही गोष्ट मान्य करणाऱ्यांनाही स्त्रीला समान स्थान देणाऱ्या तरतुदी पुरेशा प्रमाणात सुचण्याचा संभव नाही..’’

pune rte marathi news
आरटीई प्रवेश प्रक्रियेतील बदलांनंतर पहिल्यांदाच नोंदणी प्रक्रिया सुरू… कसा आहे पालकांचा प्रतिसाद?
mumbai, KEM Hospital, Artificial Insemination Center, Project Stalled, Election Code of Conduct, child, Infertility, husband wife, couple for Artificial Insemination, mumbai KEM Hospital,
मुंबई : ‘केईएम’च्या कृत्रिम गर्भधारणा केंद्राला आचारसंहितेचा फटका
Mahanirmiti Koradi Bharti 2024
Nagpur Jobs : महानिर्मिती कोराडी येथे १९६ पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू, आजच अर्ज करा
how to control blood sugar on the occasion of holi
Blood Sugar : होळीला गोड खाताना रक्तातील साखर कशी नियंत्रणात ठेवावी? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…

मनमोराचा पिसारा: ज्योती कलश छलके
आपण संगीत का ऐकतो? का संगीताच्या सात सुरांचे महाल बांधतो? का देहभान हरपून त्या नादब्रह्मात हरवून जातो? काय आहे माणसाच्या मेंदूतलं रहस्य? का निर्माण केलं त्यानं संगीत? असे अनेक प्रश्न मनाला छेडताना त्याची मानसिकतेचे गुपित उलगडण्याची धडपड करताना बुद्धिवादाची, तर्क विश्लेषणाची सारी महिरप गळून पडली आणि फक्त सूर उरले काही क्षण, फक्त मग मागे राहिली एक संपूर्ण जाणीव, एक विलक्षण अनुभव, दिव्यत्वाची प्रचीती देणारी अनुभूती. फक्त जाणीव राहिली चैतन्याची, अमूर्त स्वराची. अद्वितीय आणि अचंबित करणारी. उत्कट तरी शांत, आर्त तरी अंतस्फूर्तीचं स्फुरण देणारी..
आशा. मनातली होकारात्मकतेची दिव्य भावना, ‘आशा’ हा शब्द नाही, अनुभव नाहीये, देवत्वाचा, चैतन्याचा संपूर्ण मानवी अनुभव आहे. प्रसन्न करणारा, तरी त्या उत्स्फूर्ततेच्या जाणिवेनं भारून टाकणारा.
फक्त काही मिनिटं आणि सारं जीवन पालटून टाकणारा दीदींचा स्वर्गीय स्वर. गाणं आहे ‘ज्योती कलश छलके.’
एका प्रकाशमय रूपाचं स्वरबद्ध श्राव्य रूप म्हणजे लतादीदीनं म्हटलेलं हे गाणं.
गाण्याचे पं. नरेंद्र शर्मानं लिहिलेले शब्द तसे साधे, संस्कृतप्रचुर. वर्णन नित्य परिचित परिसराचं आहे. म्हणजे या कलशाकृती ज्योतीच्या तेजानं घर, अगण, उपवन उजळली आहेत.
आकाशातले उगवतीचे उज्ज्वल कुंकुम् रंगाचे कण सर्वत्र बरसत आहेत. फुलांच्या पाकळ्या हसत आहेत आणि शुभ्र हिमकणासारखे दंवबिंदू चमकत आहेत. (सर्वसाधारणत: न ऐकलं जाणारं)
दुसरं कडवं.
अंबर कुंकुम कण बरसाए
फूल पंखुडियोंपर मुस्काए
बिन्दु तुहिन जलके, बिन्दु, तुहिन जल के
ज्योती कलश छलके, ज्योती कलश छलके.
अशा शांत, प्रसन्न ज्योती तेजानं उजागर झालेल्या क्षणी, या पृथ्वीवरची सारी सृष्टी आता जागी झाली आहे.
आणि त्यानंतर शब्द येतात ‘सच सपने कलके. कालच्या काळात अंधारमयतेमध्ये स्वप्नं पाहिली उद्याच्या प्रसन्न दिवसाची ती स्वप्नं आज इथे, आता या क्षणी सत्य होत आहेत असा हा क्षण.
त्या शब्दात आणि सुरात संपूर्ण आत्मविश्वास आहे, स्वत:मधल्या दिव्यत्वाच्या अंशाची जाणीव आहे. दिवा लावण्याची नित्यकृती किती आश्वासकपणे आपल्याला धीर देते, अंधार संपविण्याचे मनोबल तुझ्यात आहे. फक्त तू ही ज्योत प्रज्वलित कर.
अशा मंगलमय क्षणी एक विलक्षण अनुभूती कवीला साकार होते. हे निळे आकाश, ही पृथ्वी आणि ही ज्योती हे जणू कृष्ण-यशोदाचं आपल्यासमोर प्रकट होणारं दृश्यरूप आहे!!
त्या नातेसंबंधामधलं दृढ प्रेमाचं नातं आपण या इथे अनुभवतो आहोत.
हे सगळे क्षण जगता आले कारण त्या सुरात, स्वरात आणि शब्दात सारं स्वत्व विरघळून गेलं.. बाकी बुद्धिमत्तेला पडणारे प्रश्न.. केव्हाच संपले, विरून गेले.
‘फिल्मी’ नसलेलं हे गाणं ज्यात आहे, तो चित्रपट ‘भाभी की चूडियाँ’. पडद्यावरील कलाकार मीनाकुमारी. हे स्वरशिल्प साकारलं आहे सुधीर फडके यांनी, त्यांच्या प्रतिभेनं अचंबित होतो.
डॉ.राजेंद्र बर्वे  drrajendrabarve@gmail.com