रशियाच्या एका संपूर्ण पिढीच्या मनावर आधिराज्य करणारा बोरिस लिओनीडोविच पास्तरनाक हा रशियन कवी, कादंबरीकार आणि कुशल अनुवादक १८९० साली मॉस्कोत जन्मला. बोरिसच्या वडिलांकडे कलाकार, कवी, संगीतज्ञांचे नेहमी येणे-जाणे असे. शैक्षणिक काळात सहा वष्रे संगीत शिकतानाच त्याने लेखन आणि काव्य करण्यास सुरुवात केली. ‘माय सिस्टर लाइफ’ हा त्याचा रशियन भाषेतला पहिला काव्यसंग्रह, आजही प्रभावी काव्य म्हणून ओळखला जातो. बोरिस पास्तरनाकचं नाव वाङ्मयाच्या इतिहासात अजरामर झालं ते त्याच्या ‘डॉ. झिवागो’ या कादंबरीमुळे. १९०५ आणि १९१७ साली झालेल्या रशियन राज्यक्रांत्यांच्या दरम्यानच्या काळातलं आणि तसंच पहिल्या महायुद्ध काळातल्या रशियन सामाजिक परिस्थितीचं उत्तम चित्रण डॉ. झिवागोत मिळतं. रशियात १९१७ साली घडलेल्या कम्युनिस्ट क्रांतीने रशियन समाजव्यवस्थेत मोठी उलथापालथ झाली.  डॉ. झिवागोखेरीज बोरिसच्या ‘थिम्स अ‍ॅण्ड व्हेरिएशन्स’, ‘द इयर १९०५’, ‘द सेकंड बर्थ’ इत्यादी काव्यसंग्रहातही क्रांतिकाळातल्या परिस्थितीच्या मनोवेधी वर्णनामुळे बोरिस पास्तरनाकचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं! पास्तरनाकचे समाजवादावरील स्वतंत्र विचार सोव्हिएत सरकारला न पटल्याने त्यांनी डॉ. झिवागोच्या प्रकाशनावर बंदी घातली. या कादंबरीचे हस्तलिखित इटलीतील मिलान येथे गुप्तपणे आणून १९५७ मध्ये डॉ. झिवागोचे प्रकाशन मिलानमध्ये करण्यात आले. जगप्रसिद्ध झालेल्या या कादंबरीला १९५८ सालचे साहित्याचे नोबेल पारितोषिक जाहीर झाले. त्यामुळे संतापलेल्या सोव्हिएत कम्युनिस्ट सरकारने पास्तरनाकला नोबेल पारितोषिक घेण्यास जाण्यावरही बंदी घातली. अखेर १९८८ मध्ये पास्तरनाकच्या पुढच्या वंशजांनी ते नोबेल पारितोषिक स्वीकारले. सोव्हिएत सरकारच्या बंधनांमुळे आणि गळचेपीमुळे बोरिसने २० वष्रे आपली कोणतीही स्वतंत्र साहित्यकृती प्रकाशित न करता गटे आणि शेक्सपियरच्या साहित्याचा रशियन भाषेत अनुवाद करण्याचे काम केले. १९६० साली या महान साहित्यिकाचा मृत्यू झाला. डॉ. झिवागो कादंबरीवर आधारित डेव्हिड लीन यांनी दिग्दíशत केलेला चित्रपट १९६५ मध्ये प्रदíशत झाला.

सुनीत पोतनीस

bollywood celebrity charge money for attending funeral
“बॉलीवूड सेलिब्रिटी अंत्यसंस्काराला जायचे पैसे घेतात,” प्रसिद्ध अभिनेत्याचा मोठा दावा; म्हणाला, “तेराव्याला जाण्याचे…”
Loksatta kalakaran Architecture heritage and reality
कलाकारण: वास्तुरचना, वारसा आणि वास्तव!
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
friend request natak review
नाटयरंग : ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ – घटस्फोटित बाप-मुलीच्या नात्यातील उत्कट तेढ

sunitpotnis@rediffmail.com 

 

संरक्षित क्षेत्र-जाळे

पृथ्वीवरील जैव-विविधतेने नटलेल्या १७ देशांपकी भारत एक आहे. डॉ. खोशू यांच्या अंदाजाप्रमाणे देशात ६४ जीम्नोस्पर्म आणि १७००० च्यावर फुलझाडांचे प्रकार आहेत. फुलझाडांपकी ५१५० प्रजाती स्थानिक असून त्यातील सुमारे ३५०० हिमालयाच्या पायथ्याजवळाच्या पश्चिम-पूर्व पसरलेल्या डोंगरात आढळतात. तर १६०० पश्चिम घाटात आहेत. देशात जन्मलेल्या वनस्पतींमध्ये खाद्यपदार्थ पुरवणाऱ्या पुढील प्रजाती महत्त्वाच्या आहेत. काश्मीर – तूर, चवळी; इशान्य भारत – भात, आंबा, िलबू, असंख्य औषधी वनस्पती; गुजरात – काकडी, ओकरा, वांगे; द.भारत – नारळ, केळी, काळी मिरी, आले, ऊस, इत्यादी.

मानवजातीला अन्न पुरवणाऱ्या या आणि अशा अनेक वनस्पतींची  मूळ जन्मस्थाने हिमालयाचा पायथा, पश्चिम व पूर्व घाट आणि अंदमान-निकोबार बेटे येथे आहेत. ही जन्मस्थाने नव्या प्रजातींच्या (नसíगक वा कृत्रिम पद्धतीने) निर्मितीसाठी संरक्षित ठेवणे जरुरीचे आहे.

वनस्पती व प्राण्यांची निवासी क्षेत्रे संरक्षण्यासाठी देशात संरक्षित क्षेत्रांचे जाळे कायद्याने तयार करण्यात आले आहे. त्याप्रमाणे १०२ राष्ट्रीय उद्याने, ५१५ वन्यजीव अभयारण्ये, ४७ जमीन आणि सामुद्रिक क्षेत्रे व ४ जमाती संरक्षण क्षेत्रे, अशी एकूण ६६८ क्षेत्रे  असून त्यांनी एकूण १,६१,२२१.५७ चौ.किलोमीटर , (देशाचा ४.९० टक्के) भूभाग व्यापला आहे. नियमाप्रमाणे या क्षेत्रांचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी केंद्र व राज्य शासनांची आहे.

या संरक्षित क्षेत्रांच्या व्यवस्थापनात वन्य प्राण्यांकडे लक्ष पुरवले जाते त्या मानाने वनस्पती संरक्षणाकडेही लक्ष पुरवणे जरुरीचे आहे, परंतु पृथ्वीच्या फक्त २.४ टक्के भूभाग असलेल्या या देशात लोकसंख्या १६.७ टक्के आणि गुरे १८ टक्के आहेत. अशा परिस्थितीत वनक्षेत्र संरक्षण अनेक कारणांमुळे कठीण वा अशक्यही ठरते. तरीही, क्षेत्र रक्षण हे  वनस्पतींच्या जपणुकीत जरुरीचे आहे. परंपरागत चालत आलेल्या देवरायांमुळे वनस्पती नसíगक परिसरात जपल्या जातात. नसíगक परिसराबाहेर जपणूक करण्याच्या प्रयत्नात वनस्पती उद्यानाचे महत्त्व अतुलनीय आहे. अनेक विद्यापीठात उद्याने, बिया संग्रह, याद्वारे वनस्पती रक्षण केले जात आहे. देशातील महत्त्वाची जनुक-रक्षण केंद्रे दिल्लीतील कृषी-संशोधन संस्था (कअफक) आणि हैदराबादमधील इक्रीसाट (कउफकरअळ) येथे आहेत. अन्न शाश्वतीच्या दृष्टीने  अन्नधान्यांच्या २३ जातींपासून जनुकसंग्रह आणि जपणूक करणे युनेस्कोच्या वतीने सुरू आहे.

प्रा. शरद चाफेकर

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२

 office@mavipamumbai.org