‘कॅरी निर्मिक’ ही संकरित जात असील (देशी कोंबडी) आणि कॅरी रेड यांचे संकरण करून तयार केली आहे. नराचे वजन तीन ते चार किलो, तर मादीचे दोन ते तीन किलो असते. मादी १९६ दिवसांनंतर अंडी देण्यास सुरुवात करते. वर्षांला ९२ अंडी देते. अंडय़ाचे वजन ५० ग्रॅम असते.
‘कॅरी श्यामा’ ही कडकनाथ आणि कॅरी रेड यांचे संकरण करून तयार केली आहे. पंख, त्वचा, चोच, मांडी व पाय काळसर रंगाचे असतात. मांसाचा रंग प्रामुख्याने काळा असतो. स्थानिक भाषेत या जातीला कालामासी म्हणतात. मध्य प्रदेशातील धार जिल्ह्य़ात तसेच राजस्थान, गुजरातमध्येही ती आढळते. यांच्या मांस व अंडय़ांमध्ये लोहयुक्त पदार्थ जास्त प्रमाणात असतात. मांसात २५ टक्के प्रथिने असतात. २० आठवडय़ांत या पक्ष्याचे वजन दोन किलो भरते. हे पक्षी १८० दिवसांनंतर अंडी देण्यास सुरुवात करतात. वर्षांला १०५ अंडी देतात.
 ‘अपकॅरी’ ही कडकनाथ, असील, नेकेडनेक, फ्रिजेल या प्रत्येक जातीची देल्लामरेड जातीशी संकरण करून तयार केली आहे. हे पक्षी १३० दिवसांनंतर अंडी देण्यास सुरुवात करतात. वर्षांला १८० अंडी देतात. अंडय़ाचे वजन ५२ ते ५५ ग्रॅम असते.
‘गिरीराजा’ ही देशी जात पशुवैद्यकीय महाविद्यालय, बेंगळुरू येथे विकसित केलेली आहे. हा पक्षी उबवणीनंतर २२ ते २३ आठवडय़ांनी अंडी देण्यास सुरुवात करतो. नराचे वजन चार किलो तर मादीचे तीन किलो असते. वर्षांला १८० ते १९० अंडी देते.
‘वनराजा’ जात हैदराबादच्या कुक्कुटपालन प्रकल्पाने विकसित केली आहे. हे पक्षी वर्षांला १६० ते १८० अंडी देतात. हलके वजन आणि लांब पाय यामुळे ते शत्रूपासून स्वत:चे रक्षण सहज करू शकतात.
‘कृषी ब्रो’ जातदेखील हैदराबादच्या कुक्कुटपालन प्रकल्पाने विकसित केली आहे. हा मांसल असून रोग प्रतिकारक क्षमता अधिक असते. खाद्याचे मांसात रूपांतर करण्याची क्षमता कमी असते, परंतु सहा आठवडय़ांतच यांचे वजन प्रमाणित असते.
‘ग्रामश्री’ जात १५९ दिवसांनी अंडी देण्यास सुरुवात करते. वर्षांला १८० अंडी देतात. अंडय़ाचे वजन ५० ग्रॅम असते.

जे देखे रवी..  –  भिंती पत्रके
स्वच्छता अभियान चालू असताना माझ्या डोक्यात सर्वात जास्त सणक जात असे ती भिंतीवर चिकटविलेल्या पत्रकांनी. दर काही महिन्यांनी युनियनचे निरनिराळ्या रंगाचे फलक आणि झेंडे तर लागतच असत, पण या रुग्णालयात कुणाची मुंज, लग्न, बारसे याच्या निमंत्रणपत्रिकाही लागत असत. एकाने इथे प्रथम एका जुन्या कपडय़ांच्या विक्रीची प्रचंड जाहिरात केली. लोक थांबून बघू लागले, पण विक्रीच्या जागी जाणार कोण म्हणून मग याने कपडेच इथे आणले आणि ते विकू लागला. मंडईत जायच्याऐवजी आपण भल्यामोठय़ा गाडीच्या खिडकीतून डबल पार्किंग करून केळी विकत घेतो आणि सुटे पैसे मिळेपर्यंत वाहतूक तुंबवितो तसेच हे. एका कोठल्या तरी बँकेची निवडणूक होती. अक्षरश: शेकडोंनी निरनिराळ्या उमेदवारांच्या जीवघेण्या छबी असलेले कागद चिकटविले गेले तेव्हा मी अधिष्ठात्याला म्हटले, ‘अहो हे काय?’ ते म्हणाले निवडणूक संपू दे, डिंक वितळला की कागद अलगद खाली पडतील मग ते आपण उचलू.
यावर उपाय म्हणून मी स्वत:च्या संस्थेतर्फे एक डझनभर फळे घेतले तर लोक म्हणाले, ‘खडूचा खर्च कोण करणार?’ छपाईपेक्षा खडू महाग हे तेव्हा कळले. मग खडू दिले तर थोडे दिवस ठीक चालले, पण पुढे त्या फळ्यावरच कागद चिकटविण्यात आले आणि फळेही खराब झाले.
 टिळक रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालय असल्यामुळे विद्यार्थी आणि निवासी पदव्युत्तर डॉक्टर्स यांच्यासाठी असंख्य नोटिसा लागतात. त्या एका तकलादू पुठ्ठय़ावर लावून ते पुठ्ठे जमिनीवर लोळत असत. मुलामुलींची ही झुंबड त्या पुठ्ठय़ांसमोर वाकून-वाकून गर्दी करीत असे, तेव्हा संस्थेच्या खर्चाने मी ज्यावर टाचणीने पत्रके लावता येतील, अशी लांब चपटी लाकडाची सुबक कपाटे करून दिली, त्याला कडय़ा दिल्या आणि ती उभे राहून नीट बघता येतील, अशी व्यवस्था केली. त्यात एक रहस्यकथा घडली.
 एक एका महत्त्वाच्या निवासी डॉक्टर्सच्या हंगामी नेमणुकीच्या जाहिरातीचे परिपत्रकच नाहीसे झाले. आता सगळे व्यवस्थित दिसू लागले होते त्यामुळे चोरी करणे सोपे झाले होते. ती मुलाखत मग नंतर घ्यावी लागली तोवर चोर परत आला होता, अशी बातमी मिळाली. मग, मग मला कुलपे घ्यावी लागली. शैक्षणिक संस्थांमध्ये पाहुणे भाषणे द्यायला येतात, त्याच्या माहितीचे खास फलक मी दर मजल्यावर आणि प्रवेशद्वाराजवळ दिले होते. त्यावर भाषणांची, वक्त्यांची व कार्यक्रमांची माहिती मिळत असे. त्याचीही परिपत्रके भिंतीवर चिकटविण्यात आली. तेव्हा त्या विभागप्रमुखाला मी विचारले. तो म्हणाला, ‘घाई झाली. ज्ञानप्रसारासाठी सगळे चालते. तुम्ही दुर्लक्ष करा.’
 मी म्हणालो, ‘तेही खरेच.’
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com

Caste end thought of Babasaheb Ambedkar and Mahatma Jyotiba Phule
फुले-आंबेडकरांचा जाती-अंत विचार
500 Years Later Surya Grahan Collides With Rarest Chaturgrahi Yog
५०० वर्षांनी सूर्य ग्रहणाला अद्भुत दुर्मिळ योग; ८ एप्रिलपासून ‘या’ राशींच्या नशिबात अमाप श्रीमंती, नशीब चमकणार
shukra and rahu planet will make vipreet rajyog these zodiac could be lucky
राहू- शुक्राच्या संयोगाने ५० वर्षांनंतर तयार होणार विपरीत राजयोग; या तीन राशींच्या लोकांचे नशीब फळफळणार?
In redevelopment of flat holders Redevelopment Senior
पुनर्विकासातील ज्येष्ठ!

वॉर अँड पीस –  उदानवायू विकार: वर्णक्षय- भाग १
आयुर्वेदिय तत्त्वज्ञानाप्रमाणे वात, पित्त, कफ या तीन दोषांवर; त्यांच्या कार्यावर, शरीरातील प्रमाणावर, आपली देहस्थिती अवलंबून आहे. यांचे प्रत्येकी पाच प्रकार शरीरात भिन्न भिन्न अवयवात; वेगवेगळ्या स्वरूपाचे काम- शरीरस्वास्थ्य टिकवणे, बिघडवणे वा सुधारण्याचे करत असतात. वाताच्या प्राण, उदान, समान, व्यान, अपान या पाच प्रकारांपैकी उदानवायूला आपल्या दैनंदिन जीवनात प्राणवायूचे खालोखाल महत्त्व आहे.
उर- स्थानमुदानस्य नासानाभिगलांश्चरेत।
वाक्प्रवृत्तिप्रयत्नोर्जाबलवर्णस्मृतिक्रिय:। अ.ह.सू.१२/५ उदानवायूचे स्थान ऊर असून तो नाभि, गळा, नाक या स्थानांतून संचार करितो. वाचा, उत्साह, बल, वर्ण, स्मृती इत्यादी गोष्टी उत्पन्न करतो. अलीकडे विविध डॉक्टर, वैद्यमंडळींकडे अनेकानेक सज्जन आपापल्या मुला-मुलींना, नातवंडांना घेऊन जातात. ‘या बाळाची, मुलीची प्रकृती बघा; प्रकृतीपेक्षा त्वचा बघा.  आता कशी काळवंडलेली आहे.’ ‘हा लहानपणी काळासावळा पण तेज:पुंज होता. आता सुकलेल्या त्वचेचा होऊन बसला आहे.’ अशा तक्रारी घेऊन येतात.  इथे आयुर्वेदिय तत्त्वज्ञानाप्रमाणे उदानवायूचे कार्य बिघडले आहे का? त्याच्या कार्यात काही कमीपणा आहे का? असा विचार करायला लागतो.आहारातून शरीराचे पोषण झाल्यावर; यथायोग्य रसरक्तादि सात धातू व मलमूत्र स्वेद अशांची निर्मिती झाली आहे का? हे बघून औषधी योजना करावी लागते. उदानवायूच्या कार्याचे शारीरिक व मानसिक असे दोन भाग पडतात. रुग्णेतिहासात चिंता, अधिक विचार, काळजी अशी लक्षणे असल्यास ब्राह्मी घटकद्रव्ये असलेली ब्राह्मीवटी, सारस्वतारिष्ट, पंचगव्यघृत अशी औषधे वापरल्यास त्वचेच्या रंगात अपेक्षित बदल दीड महिन्यात होतो. मलमूत्रादि शारीरिक तक्रारी जास्त असल्यास; उपळसरी, त्रिफळा, महामंजिष्ठादि अशी पोटात घ्यावयाची औषधे, बाह्य़ोपचारार्थ दशांगलेप, शतधौतघृत, हेमांगीचूर्ण वापरावे. मीठ, आंबवलेले पदार्थ टाळावे. अपेक्षित वर्णबदल निश्चयाने होतो.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत –  ५ सप्टेंबर
१८७२ > ‘गावगाडा’ या पुस्तकाचे लेखक, ग्रामीण समाजरचना व मागास जातिसंस्थेचे अभ्यासक त्रिंबक नारायण आत्रे यांचा जन्म. ‘गावगाडा’त पारंपरिक बलुतेदारांसह विविध जाती-जमातींचा परिचय त्यांनी करून दिला असून समाजशास्त्रीय अभ्यासाच्या दृष्टीने हे पुस्तक आजही उपयुक्त आहे. ‘गुन्हेगारी जाती’ हे पुस्तकही आत्रे यांनी लिहिले, तसेच ‘सक्तीचे शिक्षण’ हा महत्त्वाचा निबंध ‘विविधज्ञानविस्तार’मध्ये लिहिला.
१८९५ > इतिहाससंशोधक व सांस्कृतिक ठेवा ठरलेल्या अनेक उत्तम ग्रंथांचे संपादक अनंत काकबा प्रियोळकर यांचा जन्म. ‘रघुनाथपंडित विरचित दमयंती स्वयंवर’, ‘गोमंतकाची सरस्वती’, ‘डॉ. भाऊ दाजी : काळ आणि कर्तृत्व’,  ‘दादोबा पांडुरंग तर्खडकरांचे चरित्र व आत्मचरित्र’, ‘लोकहितवादी लेखसंग्रह’, ‘नवनीत’ आदी ग्रंथ, तसेच दुर्मीळ ख्रिस्ती-मराठी पोथ्या यांचे संपादन त्यांनी केले. मराठीत दर्जेदार ललितलेख, तसेच इंग्रजीत गोव्याचा तथ्यपूर्ण इतिहास मांडणारी पुस्तकेही त्यांनी लिहिली.
१९७८ > कवी व कलंदर कलावंत रघुनाथ रामचंद्र तथा रॉय किणीकर यांचे निधन. ‘रात्र’ आणि ‘उत्तररात्र’ हे काव्यसंग्रह, ‘खजिन्याची विहीर’, ‘येगं येगं विठाबाई’ ही नाटके आणि अनेक ललितलेख त्यांनी लिहिले.
– संजय वझरेकर