डॅन्यूब नदीच्या दुतर्फा बुडा, पेस्ट, ओबुडा आणि कोबान्या या चार वस्त्यांचे मिळून बुडापेस्ट शहर बनले. मुख्य बुडापेस्ट शहर आणि त्याची उपनगरे मिळून येथील लोकसंख्या ३३ लाख असून ते ५२५ चौ. कि.मी.वर विस्तारले आहे. बुडा आणि पेस्ट या बुडापेस्टच्या प्रमुख वस्त्या डॅन्यूब नदीवरील सात पुलांनी जोडल्या गेल्यात. जगातील सुंदर शहरांमध्ये गणले जाणारे बुडापेस्ट शहर युरोपियन लोकांना आवडते ते प्रामुख्याने तेथील उष्ण पाण्यांच्या झऱ्यांसाठी. या शहरात असे १२० उष्ण पाण्याचे झरे आहेत. येथील थर्मल बाथ कलात्मकतेने सजवून आधुनिक सोयींनी सुसज्ज आहेत. सोळाव्या शतकात १५० वष्रे येथे तुर्की आटोमन सुलतानांचा अंमल होता. त्या काळात त्यांनी येथे टर्किश बाथहाऊसेस सुरू केली. त्यातील काही सध्याही चालू आहेत. त्यातील काही तर मशिदींना जोडून आहेत. डॅन्यूबच्या दोन्ही किनाऱ्यांवर वसलेल्या बुडा आणि पेस्टपकी बुडा या भागात जुना ऐतिहासिक आणि सांस्कृतिक भाग म्हणजे राजवाडा, म्युझियम्स, नॅशनल गॅलरी, मथायस चर्च, फिशरमन्स बॅस्टियन इत्यादी अंतर्भूत आहेत. डाव्या किनाऱ्यावरील पेस्टमध्ये पार्लमेंट हाऊस, प्रमुख बँकांची कार्यालये, बाजारपेठा, आधुनिक उच्च दर्जाची हॉटेल्स वगरे आहेत. बुडापेस्ट शहरावर अनेक सत्तांतरे झाल्यामुळे शहरातील इमारतींच्या स्थापत्यावर रोमन, गॉथिक, रेनेसान्स, तुर्की, रशियन स्थापत्यशैलीचा प्रभाव दिसून येतो. बुडापेस्ट शहर नगर प्रशासनाने शहराची २३ बरोजमध्ये विभागणी केली आहे. ६ बरो बुडात, तर १६ पेस्टमध्ये आणि एक बरो डॅन्यूब नदीमध्ये असलेल्या लहान बेटाचा आहे. प्रत्येक बरोमधून बरो सदस्य मंडळ आणि बरो मेयर निवडला जातो. २३ बरोंच्या मेयर्समधून प्रमुख सिटी मेयर निवडला जातो. बुडापेस्टमधील सार्वजनिक वाहतुकीसाठी ट्राम, बस, मेट्रो रेल्वे या सेवांचे जाळे पसरले आहे.

सुनीत पोतनीस

Navi Mumbai, Escalating Traffic, traffic jam, airoli, belapur, Illegal Parking, traffic jam in Navi Mumbai, traffic jam belapur, traffic jam airoli, illegal parking in navi mumbai, marath news, two wheelar parking, four wheelar parking, navi mumbai citizens,
बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीचा खोळंबा, वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे ऐरोलीपासून बेलापूरपर्यंत वाहनतळांची सुविधा अपुरी
cryptocurrency fraud marathi news
क्रिप्टो करंन्सीच्या नावावर युवकाने गमावले २३ लाख रुपये
Traffic Routes Altered as Nashik s CBS to Canada Corner Road Undergoes 18 Month Concreting Work
काँक्रिटीकरणासाठी नाशिकमधील आठ रस्ते बंद – सीबीएस- कॅनडा कॉर्नर मार्गावर एकेरी वाहतूक
Mega block on Central Harbour and Trans Harbour route
मुंबई : मध्य, हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

sunitpotnis@rediffmail.com

 

 

भारतीय वनस्पतिशास्त्रज्ञ : प्रा. एल्ला गोन्झाल्विस

प्रा. एल्ला गोन्झाल्विस मुंबई विद्यापीठातून बी.एस्सी. आणि एम.एस्सी. झाल्या तेव्हा एम. एस्सी.ला वनस्पतिशास्त्रात विशेष  तज्ज्ञता विषय विभागाची पद्धत नव्हती. उमेदवाराकडून शास्त्राच्या सर्व विभागांत तज्ज्ञतेची अपेक्षा असे. त्यांना वनस्पतींची घडण आणि त्यांचे कार्य यात आणि विषय शिकवण्यात विशेष रस असे. त्या बॉम्बे प्रेसिडेन्सी शिक्षण विभागात रुजू झाल्या आणि कर्नाटक विद्यापीठ, धारवाड आणि रॉयल इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स, मुंबई, येथे अध्यापन केले. हे करीत असताना झाडांवरील पानांचे आकार आणि रचना यांवर संशोधन करून शोधनिबंध प्रसिद्ध केले.

धारवाडच्या कॉलेजमध्ये असताना त्यांची प्रा. एम.ओ.पी. अय्यंगार या प्रसिद्ध शास्त्रज्ञांशी भेट झाली. त्यांच्या सूचनेवरून प्रा. गोन्झाल्विस यांनी ‘पश्चिम भारतातील गोडय़ा पाण्यातील शैवाल प्रकार’ यावर सतत दोन दशके संशोधन केले आणि अनेक शोधनिबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिद्ध केले. त्यात अनेक नवीन शैवाल प्रकारांची माहिती प्रथमच उजेडात आणली. उस्तेनियम हा नवीन जीन्स शोधला.

मुंबईच्या विज्ञान संस्थेत काम करीत असताना प्रा. गोन्झाल्विस यांनी नसíगक उष्ण झऱ्यातील शैवाल प्रकार, समुद्रीय शैवालातील अमिनो आम्ल, प्रथिने, पेप्ताइड आणि कारा या शैवालाची जंतुनाशकता यांवर संशोधन केले. भारतीय केंद्रीय कपास संस्थेसाठी धर्मराजुलू यांच्यासह वनस्पतिनाशक कवके या विषयावर आणि प्रा. प यांच्यासह फुलांमधील अन्नवाहन रचनेवर संशोधन केले.

‘उडोगोनिएल्स ऑफ इंडिया’ या विषयावर ग्रंथ लिहिण्यासाठी प्रा. गोन्झाल्विस यांना भारतीय कृषिसंशोधन संस्थेने आमंत्रित केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांना एम.एस्सी. आणि पीएच. डी. प्राप्त झाली.  इंग्रजी भाषेवरील त्यांचे प्रभुत्व इतके सर्वश्रुत होते की वरिष्ठ पदावरील अनेक अधिकारी महत्त्वाच्या लिखाणासाठी त्यांची मदत घेत. निवृत्तीनंतर मुंबईच्या सेंट झेवियर महाविद्यालयात त्यांनी संशोधन चालू ठेवले.  उत्कृष्ट शिक्षक, संशोधन आणि हसतमुख व्यक्ती म्हणून त्यांना अतिशय मान होता. धार्मिक वृत्तीच्या प्रा. एल्ला गोन्झाल्विस यांना सन १९६३ मध्ये आंतरराष्ट्रीय युखारिस्टिक काँग्रेसच्या मुंबईच्या अधिवेशनात पोप जॉन तेविसावे यांनी  गौरवले होते.

(अनुवाद : प्रा. शरद चाफेकर)

 

प्रा. राघवेंद्र पै

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२

 office@mavipamumbai.org