21 January 2019

News Flash

कुतूहल : कॅल्शियमचे उपयोग

कॅल्शियमची संयुगे मात्र अतिशय स्थिर, व जैव-अजैव सृष्टीसाठी अतिशय महत्त्वाची.

प्रतिनिधिक छायाचित्र

कॅल्शियमचा मूलद्रव्य म्हणून रसायनशास्त्राच्या अभ्यासासाठी आणि थोरियम, युरेनियम यांसारख्या धातूंच्या संयुगांचे विघटन करून मिळविण्यासाठी प्रामुख्याने उपयोग होतो. कॅल्शियमच्या मर्यादित उपयुक्ततेचे कारण त्याच्या धनविद्युत (Electropositive) स्वभावात आहे. आवर्तसारणीतील दुसऱ्याच गटात असल्यामुळे बाह्य़तम ‘४२’ कक्षेतील इलेक्ट्रॉन्स सहजपणे कॅल्शियमच्या अणूतून बाहेर पडू शकतात. त्यामुळे धातू म्हणून अस्थिर पण संयुगात स्थिर अशी त्याची अवस्था होते.

कॅल्शियमची संयुगे मात्र अतिशय स्थिर, व जैव-अजैव सृष्टीसाठी अतिशय महत्त्वाची. मानवी जीवनाशी तर कॅल्शियम संयुगांचे अतूट असे नाते आहे. अगदी टूथपेस्ट (Ca(OH)2) पासून त्याची सुरुवात होते. कुंकू तयार करण्यात कॅल्शियम हायड्रॉक्साइडचा हळदीबरोबर उपयोग केला जातो. किचन केमिस्ट्री आणि कॅल्शियमचा रसनात्मक संबंध आहे. मीठ, कांदा, लसूण, सूप यांची पावडर यांसारख्या पदार्थाचा प्रवाहीपणा टिकवण्यासाठी कॅल्शियमची काबरेनेट, फॉस्फेट, सिलिकेट यांसारखी संयुगे वापरली जातात. खाद्यपदार्थाचा कुरकुरीतपणा टिकवण्यासाठी तसेच खाद्यतेलातील फेसाळपण राखण्यासाठी, सँडविच स्प्रेडमध्ये कॅल्शियम ईडीटीए [उं(एऊळअ)] वापरले जाते. बेकरी पदार्थ करण्यासाठी व असे काही पदार्थ फुलवण्यासाठी कॅल्शियम काबरेनेट व कॅल्शियम फॉस्फेट यांसारखी संयुगे वापरली जातात. मानवी शरीरातील अनेक महत्त्वाच्या प्रक्रियांमध्ये कॅल्शियमची संयुगे महत्त्वाची भूमिका बजावतात. शरीरप्रक्रियेत कॅल्शियमची कमतरता जाणवू लागली तर शरीरातील अस्थींमधले कॅल्शियम वापरले जाते. ह्य़ामुळे शरीरातील हाडं अशक्त होतात व ऑस्टीओपोरॉसिस नावाचा विकार उद्भवतो. कॅल्शियमची कमतरता झाल्यास बाह्य़ मार्गाने कॅल्शियमचा पुरवठा करून भागत नाही, कारण शरीर अशा प्रकारे मिळालेल्या कॅल्शियमचा उपयोग करून घेऊ शकत नाही. त्यासाठी व्हिटॅमिन ‘डी’ जीवनसत्त्व लागते.

किमान पंचवीस टक्के सागरी जीव कोरल रिफ म्हणजेच प्रवाळ (कॅल्शियम काबरेनेट) सांभाळतात. मलोन्मल पसरणाऱ्या अशा प्रवाळांवर अब्जावधी डॉलर्सचा इको-टुरिझमचा व्यवसाय अवलंबून आहे. गगनचुंबी इमारतींच्या उभारणीत वापरात येणाऱ्या सिमेंटमध्ये कॅल्शियम सल्फेट उपयोगात आणले जाते. तसेच अशा इमारतींमधील आंतरिक रचनेत संगमरवर म्हणजेच कॅल्शियम काबरेनेट असते. अशा प्रकारे जीवनाच्या अनेक अंगांशी कॅल्शियमचा अभेद्य संबंध आहे.

-डॉ. रवींद्र देशमुख

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

First Published on April 16, 2018 3:53 am

Web Title: calcium information properties and uses