स्पेनची राजधानी माद्रिदच्या लोकांची उत्सवप्रियता जगप्रसिद्ध आहेच. माद्रिदमध्ये वर्षभर विविध उत्सव साजरे केले जातात. हे लोक वर्षभर ज्याची आतुरतेने वाट पाहत असतात तो काíनव्हल उत्सव दर वर्षी २४ फेब्रुवारी ते १ मार्च असा आठवडाभर साजरा केला जातो. रोमन कॅथलिक पंथामध्ये साधारणत: ४० दिवस लेंट या नावाने पाळली जाणारी एक धार्मिक परंपरा आहे. या काळात कॅथलिक लोक, आपल्या चातुर्मासाप्रमाणे साधेपणाने राहणे, मांसाहार वज्र्य करणे, कोणतीही मौजमजा न करणे अशा प्रकारची धार्मिक बंधने पाळतात. हा लेंट सुरू होण्यापूर्वी सर्व प्रकारची मजा करण्याचा उत्सव म्हणजे काíनव्हल. आठवडाभर संगीत, नृत्याच्या मफली, मेजवान्या झाल्यावर शेवटच्या दिवशीची विविध मुखवटे चढवून रस्त्यातून निघणारी परेड म्हणजे मिरवणूक हा कार्निव्हलचा सर्वाधिक महत्त्वाचा भाग समजला जातो. २९ जून ते ३ जुल असे पाच दिवस चालणारा ‘गे प्राइड फेस्टिव्हल’ हा एक माद्रिदमध्ये साजरा होणारा आगळावेगळा उत्सव. या काळात शहरातले प्रमुख रस्ते दुतर्फा फुलांच्या ताटव्यांनी सजवलेले असतात. शहरातील प्लाझा डी प्रेडो झेरोलो या प्रमुख चौकात गे समाजाच्या म्हणजे समिलगी पुरुषांचे संमेलन भरते! पाच दिवस त्यांचे वाद्यवृंद आणि नृत्याचे कार्यक्रम चालतात. त्यांच्या विविध स्पर्धा भरवल्या जातात. यंदाच्या स्पर्धामध्ये उंच टाचांची पादत्राणे घालून धावण्याची स्पर्धा हे महत्त्वाचे आकर्षण होते! या स्पर्धामध्ये अधिक बक्षिसे मिळविणाऱ्या गे स्पर्धकास ‘ग्रे प्राइड’ हा बहुमानाचा पुरस्कार मिळतो आणि अखेरच्या दिवशी त्याची गावातून मिरवणूक काढली जाते! १५ मे रोजी सुरू होणारा आणि पुढे नऊ दिवस चालणारा ‘सान इस्रिडो’ हा माद्रिदचा सर्वात मोठा उत्सव. सान इस्रिडो हे माद्रिदचे ग्रामदैवत, त्याच्या स्मरणार्थ हा उत्सव भरवतात. ‘बुलफाइट’ हा स्पॅनिश लोकांचा आवडता खेळ एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरा होतो! माद्रिदमध्ये मार्च ते ऑक्टोबर या काळातल्या प्रत्येक रविवारी या बुलफाइट्स भरविल्या जातात. ‘फ्लॅमेन्को’ या स्पेनच्या विशेष नृत्यशैलीचा महोत्सव माद्रिदमध्ये जूनमध्ये भरवला जातो. याशिवाय माद्रिदमध्ये लहानसहान उत्सवांमुळे वर्षभरच उत्सवाचे वातावरण असते.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

 

 

प्रा. रामदेव मिश्रा (१९०८- १९९८)

भारतातील परिस्थितिकी विज्ञानाचे जनक मानले जाणारे रामदेव मिश्रा यांचे शालेय शिक्षण वाराणसीतील केंद्रीय हिंदू विद्यालय आणि उच्च शिक्षण बनारस हिंदू विश्वविद्यालय येथे झाले. सन १९३७ मध्ये त्यांनी लीड्स युनिव्हर्सटिीतून ‘इकॉलॉजी ऑफ ब्रिटिश लेकस्’ या विषयात प्रा. पिअर्साल यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरेट मिळवली.

भारतात परतल्यावर त्यांनी भागलपूर, वाराणसी आणि सागर येथील विश्वविद्यालयात अध्ययन-संशोधन करून देशात इकॉलॉजी या विषयाची मुहूर्तमेढ रोवली. सन्याच्या वसाहतीपासून संशोधनास सुरुवात करून त्यांनी गवताळ प्रदेश, वने, तलाव, महत्त्वाचे वृक्ष व झुडपे यावर संशोधन केले. प्रत्यक्ष निरीक्षणाबरोबरच प्रायोगिक संशोधनावर प्रथमपासून भर दिला. देशांतील पहिला फायटोट्रोन (प्रकाश, तापमान, आद्र्रता इत्यादींचे प्रमाण नियंत्रित ठेवता येणारी प्रयोग-खोली) उभारला. त्यांनी साठएक विद्यार्थ्यांना पीएच.डी.साठी मार्गदर्शन केले आणि शंभरावर संशोधन निबंध प्रसिद्ध केले. सी.एस.आय.आर., यू.जी.सी, पी.एल. ४८० यांच्या अनेक प्रकल्पांचे संचालन केले.

प्रा. मिश्रा हे इन्सा, एन. ए .एस्सी. एन.आय. ई. इत्यादी संस्थांचे फेलो होते. भारतातील पहिल्या इकॉलॉजी स्कूलचे ते संचालक असताना त्यांची कार्यपद्धती जवळून पाहण्याचे भाग्य मला लाभले होते. युनेस्कोचा इंटरनॅशनल बायोलोजीकल प्रोग्राम, मानव आणि बायोस्फिअर प्रोग्राम, युनोची वाळवंटीकरण समस्या समिती यासाठी ते कार्य करत. इंडियन सायन्स काँग्रेसच्या वनस्पती विभागाचे १९५८ मध्ये अध्यक्ष, इंडियन बोटॅनिकल सोसायटीचे अध्यक्ष, भारत सरकारच्या नॅशनल कमिटी फॉर एन्व्हायर्नमेन्ट प्रोटेक्शन अ‍ॅण्ड को-ऑर्डिनेशन (ठउएढउ) चे उपाध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे.

युनेपच्या डेझर्टिफिकेशन कंट्रोल सभेचे आणि स्कोपच्या हेलसिंकी (१९७१), नरोबी (१९७३) स्भांचे ते सल्लागार होते. त्यांना रशियन सायन्स अकादमीने सन्मानित केले होते. तर अमेरिकेतील स्मिथ्सोनिअन संस्थेचे ते निमंत्रित शास्त्रज्ञ होते. त्यांना मिळालेले काही सन्मान – मालवीय सुवर्णपदक, बिरबल सहानी सुवर्णपदक, जवाहरलाल नेहरू सुवर्णपदक, संजय गांधी सन्मान, स्वामी प्रणवानंद सरस्वती सन्मान असे आहेत.   प्रा. मिश्रा सुमारे दहा वैज्ञानिक नियतकालिकांचे संपादक होते. त्यांनी लिहिलेल्या अनेक पुस्तकांपकी डॉ. पुरी यांच्याबरोबर लिहिलेल्या ‘इंडियन मॅन्युअल प्लॅन्ट’ हे पुस्तक या विषयातले बायबल समजले जाते.

  प्रा. शरद चाफेकर

 मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२

office@mavipamumbai.org