वनस्पती हा शब्द उच्चारतानाच सामान्यत: प्रत्येकाच्या डोळ्यासमोर फक्त प्रथम वृक्षच उभे राहतात. परंतु वृक्षांच्या व्यतिरिक्तवनस्पतींचे इतरही अनेक प्रकार आहेत हे जाणून घेण्यासाठी इतर वनस्पतींचा परिचय करून घेणे गरजेचे आहे. तत्पूर्वी वनस्पतींच्या वर्गीकरणासंबंधी जाणून घेतल्यास वनस्पतींचा परिचय करून घेणे सोपे होईल. तुम्हांस कोणी विचारले की तुम्हाला व्यवस्थितरीत्या केलेले काम आवडेल की गलथानपणाने केलेले? अर्थात तुम्ही पहिल्या पर्यायाशी सहमत असाल. एक उदाहरण घेऊ या, स्वयंपाकघरातील उपयोगी भांडी, चमचे, वाटय़ा, पेले, लहान-मोठय़ा थाळ्या आपण कशा ठेवतो? या वस्तू एखाद्या गोणपाटात भरून ठेवल्या तर वस्तू लागल्यावर ती शोधणे कठीण होऊ नये म्हणून सामान्यत: आपण या वस्तू नीट मांडणी करून ठेवतो, जेणेकरून कष्ट न पडता वस्तू वापरणे सोपे होते. एक प्रकारे हे त्या वस्तूंचे वर्गीकरणच नाही का? तसेच वाचनालयात पुस्तके सांकेतिक क्रमांकाप्रमाणे मांडलेली असतात. भौतिकशास्त्राचे पुस्तक इतिहासाच्या पुस्तकासोबत नसते. ५७५-५८० क्रमांक प्राणिशास्त्रावरील आणि ५८१-५८५ वनस्पतिशास्त्रावरील राखून ठेवील पुस्तकांसाठी राखून ठेवलेला असतो. ही एक आंतरराष्ट्रीय मान्य पद्धत आहे.
वरील दोन उदाहरणांवरून वर्गीकरण करणे का आवश्यक आहे हे लक्षात आले असेल. ठोबळमानाने आपल्याला माहिती असलेले वनस्पतींचे वर्गीकरण आपण रोपटे, झुडूप, वृक्ष, वेली इत्यादी असे करतो. उदाहरणार्थ – तुळस, सदाफुली, माका, गुलाब या वनस्पती रोपटे वर्गात मोडतात. कण्हेर, जास्वंद, अडुळसा, अनंत या झुडूप वर्गात. आंबा, वड, िपपळ, चिंच, वृक्ष आहेत आणि जाई, जुई, चमेली, मधुमालती या वेली आहेत. परंतु शास्त्रीयदृष्टय़ा अभ्यास करायचा झाल्यास असे ठोबळ वर्गीकरण पुरेसे नाही. शास्त्रीय वर्गीकरण करताना वनस्पतींमधील साम्य, भेद याचा विचार केला जातो. साम्य असलेल्या सर्व वनस्पती एका गटात मोडतात. तसेच काही वेलींचे खोड नाजूक न राहता लाकडासारखे जाड होते. अशा वेलींना आधारासाठी भक्कम वृक्षांची गरज असते. गारंबी उक्षी, चांबूळ या अशा प्रकारच्या काष्ठवेली आहेत.
– डॉ. सी. एस. लट्टू (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org

इतिहासाचे साक्षीदार
विविध देशांमधील अस्तित्वात असलेल्या प्राचीन किंवा मध्ययुगीन काळातल्या इमारती, इमारतींचे अवशेष, पुतळे त्यांच्या काळातला इतिहास आणि विशिष्ट घटना जिवंत ठेवतात. त्या त्या शहराची आणि पर्यायाने देशाची प्रगती, उन्नती किंवा झालेल्या अधोगतीचे अस्तित्वात असलेले ते एकुलते एक साक्षीदार असतात. दोन हजार वर्षांपूर्वी केवळ एक कडा, तरंगता पूल म्हणून तयार झालेला लंडन ब्रिज आणि सध्या उभा असलेला भरभक्कम आणि आधुनिक तंत्राचा वापर केलेला लंडन ब्रिज यांच्यातील तफावत लंडन आणि पर्यायाने इंग्लंडने केलेल्या उत्क्रांती, प्रगती यांचे मोजमाप होऊ शकते. त्याचप्रमाणे लंडनचे पार्लमेंट, पॅरिसचा कॉँकार्ड स्क्वेअर, अमृतसरची जालियनवाला बाग वगरे ठिकाणे बरेच काही बोलून जातात. प्रत्येक खेडय़ाची शहरापर्यंत झालेली वाटचाल तसेच त्या खेडय़ातील समाजजीवनाचे पुढे शहरी जीवनात होत गेलेले रूपांतर याचे निरीक्षण करणे उद्बोधक ठरेल.
या बदलत्या समाजजीवनाच्या विविध अंगांचा विचार करताना त्या शहरातील प्राचीन किंवा मध्ययुगीन काळातले रस्ते, इमारती, पूल, स्मारके, पुतळे, अवशेष हे सर्व त्या शहराच्या इतिहासाशी निगडित आहेत हे जाणवते.
विविध शहरांच्या नावांची व्युत्पत्ती, प्राचीन किंवा मध्ययुगीन काळातले त्यांचे अस्तित्व, तिथले समाजजीवन आणि वाहतूक व्यवस्थेत होत गेलेले बदल, त्या काळातल्या पार्लमेंटसारख्या राजकीय संस्थांच्या कामकाजात होत गेलेले बदल आणि रस्ते, पूल, पाणीपुरवठय़ासारख्या सुविधांमध्ये होत गेलेला बदल यांचे विश्लेषण करणे उद्बोधक ठरेल.

mini paneer sabudana vada recipe
Recipe : तेलात न तळता बनवा साबुदाण्याचे कुरकुरीत ‘प्रोटीनयुक्त’ मिनी वडे! बनवताना घाला फक्त ‘हा’ पदार्थ
Sun Transit In Mesh Rashi
काही तासांत सुर्य करेल मेष राशीत प्रवेश! पाहा, कोणत्या तीन राशींचे नशीब उजळणार? मिळणार भरपूर पैसा अन् प्रसिद्धी
Why are total solar eclipses rare Why is April 8 solar eclipse special
विश्लेषण : ८ एप्रिलचे सूर्यग्रहण वैशिष्ट्यपूर्ण का ठरते? खग्रास सूर्यग्रहण दुर्मीळ का असते?
Holi 2024, Natural Colors, Children, Celebrate, Harmful Chemicals, parents, caring tips, skin, eye, infection,
होळीतील रासायनिक रंगाने डोळे, त्वचेच्या आजाराचा धोका! मुलांची विशेष काळजी घेण्याची गरज

– सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com