20 September 2018

News Flash

जे आले ते रमले.. : पुराणवस्तू संशोधक क्लाऊड कोर्ट

महाराजांनी खूश होऊन क्लाऊडला जनरल या पदावर बढती दिली.

क्लाऊड कोर्टनी संग्रहीत केलेले नाण्यांचे छाप लंडनच्या ब्रिटीश म्युझियममध्ये आहेत.

नेपोलियनच्या सन्यदलात नोकरी केलेला क्लाऊड कोर्ट, नेपोलियनच्या अस्तानंतर १८२७ साली लाहोरात महाराजा रणजितसिंगांच्या फौजेत दाखल झाला. महाराजांनी त्याला प्रथम भाडोत्री सैनिक म्हणून नेमले पण लवकरच क्लाऊडचा हरहुन्नरी स्वभाव, वैज्ञानिक दृष्टिकोन, भौगोलिक ज्ञान इत्यादी गुणविशेष लक्षात आल्यावर महाराजांनी त्याच्यावर युरोपीय पद्धतीचे तोफदल तयार करून त्याच्यासाठी लागणारे शिक्षण लोकांना देण्याची जबाबदारी टाकली. यापूर्वी महाराजांच्या सेनेत फक्त घोडदळ आणि पायदळ होते. महाराजांच्या अपेक्षेहूनही क्लाऊडने नवीन तोफदलाची योजना, उभारणी आणि त्यासाठी लोकांना शिक्षित करण्याची कामगिरी उत्तम बजावली. महाराजांनी खूश होऊन क्लाऊडला जनरल या पदावर बढती दिली.

HOT DEALS
  • Honor 7X 64 GB Blue
    ₹ 16010 MRP ₹ 16999 -6%
  • Honor 7X 64 GB Blue
    ₹ 15445 MRP ₹ 16999 -9%

हे करीत असताना लढायांमध्येही त्याचा सहभाग असे. १८३४ची पेशावरची लढाई आणि १८३७ची जामरूदची, या दोन्ही लढती क्लाऊडच्या नेतृत्वाखाली लढून त्याने विजय मिळवून दिला. क्लाऊड जिथे जिथे जाई तिथली भौगोलिक माहिती आणि पुरातात्त्विक माहिती गोळा करण्याचा त्याचा छंद होता. क्वचित काही ठिकाणी त्याने उत्खनन करून पुराणवस्तूही संग्रहित केल्या. त्याला पर्शियन भाषाही उत्तम अवगत होती. त्याच्या भौगोलिक ज्ञानाच्या जोरावर त्याने बगदादहून निघून केरमानशा, हेरात, गझनी, कंदहार, काबूल, पेशावर माग्रे लाहोरला येण्याचा सोपा मार्ग ठरवला. या सर्व प्रदेशांचा आणि मार्गाचा त्याने नकाशा तयार केला होता. क्लाऊड रणजितसिंगांकडे फौज-ए-खासमध्ये नोकरी करीत असताना संपूर्ण पंजाबची सखोल भौगोलिक माहिती मिळवून त्या प्रदेशाचा त्याने सविस्तर नकाशा बनवला. क्लाऊडने पेशावरच्या परिसरात अनेक ठिकाणी उत्खनन करून त्या प्रदेशातल्या बुद्ध मूर्ती, स्तूप, बौद्ध अवशेष शोधून काढणाऱ्या सुरुवातीच्या इतिहास संशोधकांपैकी क्लाऊड कोर्ट होता. पुढे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा लुधियाना येथील रेसिडेंटचा साहाय्यक कॅप्टन वेड याने क्लाऊड कोर्टने तयार केलेला हा पंजाबचा भौगोलिक नकाशा कंपनी सरकारच्या उपयोगासाठी ५००० रुपयांना विकत घेऊन कलकत्त्याला गव्हर्नर जनरलकडे पाठवला.

sunitpotnis@rediffmail.com

 

 

First Published on August 16, 2018 2:59 am

Web Title: claude auguste court behaviour