कपडा पांढरा असेल तर त्यावरील डाग नजरेत भरतो. सर्व सामान्यत: कॉलर आणि पूर्ण बाह्य़ांच्या शर्टाचे कफ येथे जास्त मळलेले असते. तो मळ साफ करण्यासाठी कफ अँड कॉलर क्लीनर या नावाचे रसायन बाजारात मिळते, त्याचा वापर करावा. मग तो शर्ट नेहमीप्रमाणे धुवावा. पॉलिशचे डाग पडले असतील तरी उपरोक्त रसायनांचा चांगला उपयोग होतो. तेलाचे डाग पडले असतील तर तिथे निर्मलक (डिर्टजट) लावून काही वेळ ठेवावा आणि नंतर धुवावा. घामाने कपडय़ावर पिवळेपणा येतो, तो घालवण्यासाठी ब्लिचिंगचा मार्ग काही काळानंतर स्वीकारावा.

मिश्र तंतूचे कापड असेल, खास करून पॉलिस्टरमिश्रित असेल तर, तो कपडा गरम पाण्यात बुडवण्यापूर्वी पाण्याचे तापमान ५० डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त नाही ना याची खातरजमा करावी. त्यापेक्षा अधिक तापमान अशा कापडाला हानिकारक ठरते. रंगीत कपडे आणि सफेद कपडे एकत्र धुतल्याने रंगीत कपडय़ाचा रंग सफेद कपडय़ाला लागू शकतो. हे टाळण्यासाठी एक साधी तपासणी करता येते. पांढरा कपडा (कोणताही) एका बाजूला थोडा ओला करून तो रंगीत कापडाच्या कोपऱ्यावर हळूवारपणे घासा. रंग निघत असेल तर, तो वेगळा धुवावा अन्यथा इतर पांढऱ्या कपडय़ावर (तो ओला असल्यामुळे) डाग पडू शकतो. एक उपाय म्हणजे त्या रंगीत ओल्या भागावर सुका पांढरा कपडा घासा म्हणजे काही प्रमाणात पाणी शोषले जाईल व डागाची तीव्रता कमी होईल.
अशी तपासणी केल्यावर रंगीत कापडाचा रंग जातो आहे असे लक्षात आल्यास तो वेगळा धुवावा. अन्यथा त्याचा रंग इतर कपडय़ाला लागेल. रंगीत कपडा धुतल्यावर तो चांगला खळबळून घ्यावा आणि मग पिळून सुकायला घाला. रंगीत कपडे सावलीत वाळवणे उत्तम. भडक रंगीत कपडय़ासाठी ७.५चा सामू (पी.एच.) असलेले निर्मलकाचे द्रावण वापरा. सौम्य रंगासाठी १० सामूचे द्रावण चालते.
रंगीत कपडे पाण्यात भिजवल्यावर रंग जाऊ नये म्हणून रंगीत कपडा मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवावा. त्या द्रावणामधून कपडा बाहेर काढून मग निर्मलक टाकावे. त्यामुळे समतोल द्रावण तयार होईल, त्याचा वापर करा. अतिगडद, गडद आणि फिके रंग असलेले कपडेही वेगवेगळे धुतलेले चांगले.

Why are naphthalene balls kept with clothes to be put away How do you use naphthalene balls in a wardrobe
कपड्यांमधील ओलसरपणा, कुबट वास होईल गायब; कपाटात ठेवा ‘ही’ गोळी, जाणून घ्या वापराची योग्य पद्धत
Recipes of raw mango mango sauce recipe in marathi
वाळवण विशेष! घरगुती मसाल्यासह बनवा कैरीचा वर्षभर टिकणारा सॉस; लहान मुलंही खातील आवडीनं
summer
सुसह्य उन्हाळा!
Do you know the police in this city ride buffaloes for patrolling?
बफेलो सोल्जर्स! ‘या’ ठिकाणी पोलीस चक्क रेड्यावर बसून घालतात गस्त!

 विजय रोद्द (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org

संस्थानांची बखर

श्रीमंत निजामाचे महाकुटुंब

सर्वच बाबतीत अफाट आणि विक्षिप्त असलेला हैदराबादचा अखेरचा निजाम मीर उस्मान अलीखान हा जगातील सर्वाधिक धनवान म्हणून बहुचíचत होता. हैदराबाद संस्थानाच्या राज्यक्षेत्रापकी ३०% भूभागाचा स्वामी असलेल्या या निजामाला त्याच्या सर्फ-ए-खास (खासगी) मालमत्तेतून मिळणारे सालाना उत्पन्न अडीच कोटी रुपये इतके प्रचंड होते. त्याच्याकडच्या अमर्याद दौलतीचा अंदाज बहुधा त्यालाही नसावा! जगप्रसिद्ध जेकब डायमंड हा शहामृगाच्या अंडय़ाएवढा १८७ कॅरेटचा हिरा तो पेपरवेटसारखा वापरित असे. त्याच्या किंग कोठी या निवासस्थानात हिरे-माणकांच्या किमती अलंकारांनी खचाखच भरलेल्या ट्रंक, अलमाऱ्यांची रेलचेल असे.
१९५० च्या सुमारास या निजामाने आपल्या जवळच्या सोन्याच्या साठय़ातील काही भाग एका खास रेल्वेने मुंबईस पाठवून विकला. त्यातून त्याला सहा कोटी रुपयांची रक्कम मिळाली! अति कुटुंबवत्सल असलेल्या या निजामाचे कुटुंबही त्याच्या श्रीमंतीला साजेसेच होते. सात बेगमा, ४२ अनधिकृत पत्नी (रखेल्या), ८० हून अधिक औरस आणि अनौरस मुले आणि काही नातवंडे असा हा महापरिवार होता.
सात बेगमांपकी दुल्हन पाशा बेगम ही त्याची आवडती बेगम. उस्मान अलीखानचे मातृप्रेम हासुद्धा एक चच्रेचा विषय होता. सरकारी लव्याजम्यासह तो रोज माता जोहरा बेगमचे दर्शन घेईच, पण तिच्या मृत्यूनंतरही तिच्या कबरीचे रोजचे दर्शन कधी चुकले नाही. जेमतेम साडेचार फूट उंचीच्या ४० किलो वजनाच्या किरकोळ शरीरयष्टीच्या या निजामाची राहणी आणि पेहरावातून त्याच्या कंजूषपणाचे प्रदर्शन होत असे. त्याने एक शेरवानी बारा वष्रे ठिगळे लावून लावून वापरली, आयुष्यभर एकच लाल रूमी टोपी वापरली. एकदा त्याचे जुने ब्लँकेट फाटले म्हणून सेवकाच्या हातात त्याने २५ रुपये ठेवून नवीन ब्लँकेट आणण्यास पाठविले. ३५ रु. पेक्षा कमी किमतीला ब्लँकेट मिळत नाही असा निरोप घेऊन सेवक आल्यावर निजामाने जुनेच ब्लँकेट स्वत:च ठिगळे लावून अखेरीपर्यंत वापरले!

सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com