साधारणत: बाराव्या शतकात स्थापन झालेले कोचिनचे हिंदू राज्य प्रथम पेरुमपदप्पू स्वरूपम् या नावाने ओळखले जात होते. चेरा राजघराण्याची केरळातील सत्ता अस्त पावल्यावर त्यांच्या एका नातलगाने पेरुमपदप्पू येथे बाराव्या शतकात छोटेखानी राज्य स्थापन केले.
त्यांच्या शेजारी इडापल्ली येथे असलेल्या नंबुदरी राजांचा कोशी आणि विपीन हा प्रदेश त्यांनी मिळविला. त्याच काळात कोशी हे एक उत्तम नसíगक बंदर म्हणून विकसित केले जाऊन या बंदरातून मसाल्याच्या पदार्थाचा व्यापार सुरू झाला. शेजारच्या कालिकतचा राजा झामोरीन याच्या आक्रमणांमुळे कोचिनचे राज्यक्षेत्र कमी कमी होत जाऊन पुढे कोचिन हे कालिकतचे मांडलिक राज्य बनले. पुढे १५ व्या शतकात पोर्तुगीज कालिकत येथे आल्यावर त्यांचा झामोरीनशी झालेल्या संघर्षांचा फायदा कोचिनच्या राजाने उठविला. झामोरीनच्या हल्ल्यांमुळे बेजार झालेल्या कोशीचा तत्कालीन राजा उन्नीरामन कोयीकल प्रथम याने पोर्तुगीज अधिकारी पेट्रो काब्राल याच्याशी १५०० साली लष्करी आणि नौदल युती करून झामोरीनविरुद्ध संरक्षण मिळविले. अशा रीतीने पोर्तुगीजांचा भारतीय राजकारणात प्रवेश झाला. युती करून पोर्तुगीजांचे संरक्षित राज्य म्हणून कोचिनने पोर्तुगीजांना अनेक स्थानिक राजांविरुद्ध मदत केली. पोर्तुगीज-कोचिन युती इ.स. १५०३ ते १६६३ पर्यंत टिकली. त्यानंतर आलेल्या डच ईस्ट इंडिया कंपनीबरोबर युती करून त्यांचे अंकित बनलेल्या कोचिनने ही युती इ.स. १६६३ ते १७९५ या काळात टिकवली. पुढे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीबरोबर १७९५ साली संरक्षणात्मक करार करून कोचिन हे कंपनी सरकारचे अंकित संस्थान बनले.
– सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

चाणाक्ष वस्त्रप्रावरण

चाणाक्ष वस्त्रप्रावरण म्हणजे समग्र स्वयंसक्रिय व परिणामकारक उपक्रमशीलता अंतर्भूत असलेले पारंपरिक वस्त्रप्रावरण. हे पारंपरिक वस्त्रप्रावरण सुती पॉलिस्टर, नॉमेक्स, केवलर इत्यादी धाग्यांपासून बनलेले असते. प्रावरणाच्या अर्थपूर्ण उपयुक्ततेकरिता ही वस्त्रे यांत्रिक निर्माण प्रक्रिया, रंग देणे, पॉलिविनिल अल्कोहोल इत्यादी प्रक्रियेतून जाणे आवश्यक असते. चाणाक्ष वस्त्रप्रावरणे ऊर्जास्रोत व ऊर्जा साठवणीसाठी उपयुक्त ठरतात. मानव संलग्न वा मानव संवेदनक्षम (सेिन्सग) उपकरण यामध्ये कामाला येते. अत्यंत प्रचलित व सहज उपलब्ध असलेले चाणाक्ष वस्त्रप्रावरणांचे विद्युतवाहक, विद्युतधारक क्षमता असलेले महत्त्वाचे अंग म्हणजे धागा. वैशिष्टय़पूर्ण अभियांत्रिकीच्या सहयोगाने सोपस्कार करून बनवलेल्या या धाग्यांमुळे उत्पादकाला ग्रिडमधील इलेक्ट्रॉनिक उपकरणे जोडणे शक्य झाले आहे. वीजधारक क्षमता असलेल्या या वस्त्रप्रावरणाच्या गुणधर्मामुळे अशा धाग्यांचा वा वस्त्रांचा उपयोग जैविकशास्त्राच्या ई.सी.जी.सारख्या संवेदनमापन करणाऱ्या उपकरणात तसेच श्वसन, रक्तदाब, शरीराचे तापमान जाणण्यासाठी होतो. चाणाक्ष जीवनआरोग्यदायी अंगरखा हा जीवनस्वास्थ्य क्षेत्रात, क्रीडा क्षेत्रात, असुरक्षित पर्यावरणात, सुरक्षा जवानांचे स्वास्थ्य यामध्ये जैविक स्वास्थ्याचे अनुमान समजण्यासाठी मापदंड म्हणून उपयुक्त ठरले आहे. सद्य:स्थितीत प्रयोगशाळा व विद्यापीठातील चाणाक्ष वस्त्रप्रावरणावरील संशोधन खाली नमूद केलेल्या संकीर्ण सेिन्सग उपकरणावर केंद्रिभूत झालेला आहे. त्यांची उदाहरणे म्हणजे कार्बन इलेक्ट्रोड, सिलिकोन आधारित लवचीक बहुद्देशीय उपकरणे, पीझोइलेक्ट्रिक तंतू, छापील कार्बन नॅनोटय़ुब फिल्म. हे सर्व तंत्रज्ञान विज्ञानाच्या परिकल्पनेची चाणाक्ष वस्त्रप्रावरणे, मानवसंलग्न (इंटरफेस), अंकिकक्षमता या क्षेत्रात उपक्रमशीलता आणतील. नासाच्या मानव व यंत्रमानव अवकाश संशोधन क्षेत्रात चाणाक्ष वस्त्रप्रावरणे विविध कारणांसाठी उपयुक्त ठरत आहेत. अवकाशयानातील उपस्थित मानवी गटांचे सुखद, खात्रीलायक आणि नम्र (उपकारक) अनुमान काढण्यासाठी, संशोधन कार्यक्रम योजना, घन व कमी वजनाचे सेन्सर, अतींद्रिय अंगरख्यामध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे स्वच्छ व खात्रीलायक एकत्रीकरण, यांत्रिक मानवी आढावा घेणाऱ्या उपकरणांचे अनुमान पद्धतीत चाणाक्ष वस्त्रप्रावरणांची महत्त्वाची भूमिका आहे. अत्यंत कमी वित्त खर्च , ऊध्र्वरेखित आकार (अपमास व व्हॉल्युम) या चाणाक्ष वस्त्रप्रावरणांमुळे शक्य होईल.
– श्वेतकेतू
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office @mavipamumbai.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cochin state established
First published on: 21-12-2015 at 01:08 IST