03 June 2020

News Flash

कुतूहल – रंगीत शर्ट

मुळात कापसामध्ये आणि त्यामुळे जो धाग्यांमध्ये येतो अशी पिवळ्या रंगाची छटा असते. या नसíगक रंगछटा वरून दिल्या जाणाऱ्या रंगाच्या चमकदारपणामध्ये अडचण बनू शकतात.

| August 12, 2015 06:23 am

मुळात कापसामध्ये आणि त्यामुळे जो धाग्यांमध्ये येतो अशी पिवळ्या रंगाची छटा असते. या नसíगक रंगछटा वरून दिल्या जाणाऱ्या रंगाच्या चमकदारपणामध्ये अडचण बनू शकतात. तसेच काही अनावश्यक दूषित कण उदा: मेण, रासायनिक खतांमुळे येणारे रसायनांचे कण असतात. त्यांच्या प्रभावामुळे, मूळ धाग्याची नवीन रंग शोषून घेण्याची क्षमता कमी होते. हे दूषित कण विरंजन (ब्लीचिंग) प्रक्रियेने काढले जातात व धाग्यांची रंग शोषून घेण्याची क्षमता वाढवून ते पुढील रंग देण्याच्या प्रक्रियेसाठी तयार केले जातात. ही पूर्वतयारी झाल्यावर या ‘पॅकेज’ला वेगवेगळे रंग दिले जातात. ‘रिअ‍ॅक्टिव्ह’ आणि ‘वॉट’ अशा दोन पद्धतींपकी गरजेनुसार कोणत्याही एका पद्धतीद्वारे ही प्रक्रिया पूर्ण होते. धाग्यांना रंग दिल्यानंतर ताण्याचे संग्रहित गट तयार केले जातात. डिझाइननुसार ते विभागवार यंत्रावर आयोजित केले जातात.
सेक्शनल वाìपग यंत्र व त्यावर होणारे पॅटर्न हा या संपूर्ण रंगीत वस्त्राचा आत्मा आहे. या डिझाइनशी सुसंगत राहील अशा प्रकारे, धाग्याचे शंकूच्या आकाराचे रीळ एकत्र ठेवून ‘वार्प बीम’- ताणा कोश बनवले जातात. या वेळी डोळ्यांत तेल घालून काळजी घ्यावी लागते. कारण इथे झालेल्या चुकीमुळे चुकीच्या रंगछटांचे पॅकेज लागल्यास प्रतिमाकृती (डिझाइन) चुकते व असा शर्ट घातल्यावर ती व्यक्ती विचित्र दिसेल. संपूर्ण पेहरावाची शान जाईल. इथे झालेली चूक सुधारण्याची नंतर संधी नाही.
समग्र विणकाम प्रक्रियेमध्ये ग्राहकाला मूल्य प्रदान करणाऱ्या ज्या पूर्वप्रक्रिया आहेत, त्यामध्ये रंगीत धाग्याच्या उत्पादनामध्ये सेक्शनल वाìपग अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. दर्जेदार अंतिम उत्पादन ग्राहकाच्या हातात जाण्यासाठी गुणवत्ता विभागाला सेक्शनल वाìपग हे मूल्यवर्धन केंद्र म्हणून जपावे लागते. यांसारख्या प्रक्रियांमधली गुंतागुंत समजण्याकरिता कुशल व परिपक्व बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञ आवश्यक असतात.
त्यानंतर ‘योग्य गुणवत्ता’- बहाल करण्यासाठी ‘वार्प बीम’ला-ताणा कोशाला- खळ लावली जाते. ‘साइिझग’ केले जाते. पूर्वी या प्रक्रियेमध्ये नैसर्गिक खळ वापरायचे. हल्ली कृत्रिम अणूंपासून बनवलेली अधिक क्षमता प्रदान करणारी रसायने वापरणे जरुरीचे असते. ‘साइिझग’मध्ये रंग जाण्याची शक्यता असते. यंत्रमागामुळे धाग्यावर येणारे ताणतणाव ‘वार्प शिट’ सहन करता यावे म्हणून ‘साइिझग’ केले जाते. सोबतच, वेफ्ट वाइंडिंग पूर्ण करून विणकामाची पूर्वतयारी संपन्न होते.
– सतीश भुटडा (कोल्हापूर) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

संस्थानांची बखर – उदयपूर संस्थान
छत्तारी राजपूत वंशाच्या मोरी गेहलोत परिहार आणि सिसोदिया या घराण्यांनी मेवाडमध्ये बाराशे वष्रे राज्य केले. ७३४ मध्ये चितोड येथे गेहलोतांनी सत्ता स्थापन केल्यावर मुस्लीम आक्रमणांमुळे आपली राजधानी अहर, त्यानंतर डुंगरपूर, नागदा आणि परत एकदा चितोड येथे हलविली. राणा रतनसिंह प्रथम हा चितोड येथे राजेपदावर असताना १३०३ साली दिल्लीचा सुलतान अल्लाउद्दीन खिलजीने आक्रमण करून चितोड उद्ध्वस्त करून गेहलोतांची सत्ता संपुष्टात आणली. या हल्ल्यातून वाचलेला सिसोदिया घराण्याचा तरुण हमीरसिंह प्रथम याला मेवाड सरदारांनी १३२६ साली मेवाडच्या गादीवर बसविले.
चितोड येथे सिसोदियांचे राज्य इ.स. १३२६ ते १५६८ असे होऊन एकूण बारा राजांनी शासन दिले. त्यापकी शेवटचा राजा आणि राणा संगचा पुत्र महाराणा उदयसिंह द्वितीयची कारकीर्द इ.स. १५४० ते १५६८ अशी झाली. १५६२ साली उदयसिंहाने मोगल बादशाह अकबराचा शत्रू माळव्याचा बाज बहाद्दर याला चितोडमध्ये आश्रय दिल्यामुळे अकबराने चितोडला वेढा घातला. १५६८ मध्ये झालेल्या युद्धात उदयसिंहाचा पराभव झाला आणि चितोडवर अकबराचा अंमल बसला; परंतु त्यातून उदयसिंह आपल्या कुटुंबीयांबरोबर शिताफीने निसटून आपल्या मूळ गावी, पिछोली येथे आला. पिछोली येथेच आपली नवीन राजधानी करून त्या गावाचे नाव बदलून त्याने उदयपूर असे केले.
अशा रीतीने, १५६८ साली उदयपूर येथे उदयसिंह द्वितीयने स्थापन केलेल्या सिसोदियांच्या घराण्याचे राज्य स्वतंत्र भारतात विलीन होईपर्यंत एकूण २२ राणांनी शासन दिले. राणा भीमसिंहच्या कारकीर्दीत १८१८ साली त्याने कंपनी सरकारबरोबर संरक्षण करार केल्यामुळे उदयपूर हे एक ब्रिटिश अंकित संस्थान बनले.
सुनीत पोतनीस -sunitpotnis@rediffmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 12, 2015 6:23 am

Web Title: colorful shirts
टॅग Navneet
Next Stories
1 कुतूहल – शर्टाचे कापड
2 सॅटिन वीण २
3 सॅटिन वीण – १
Just Now!
X