आजच्या तथाकथित स्पर्धात्मक जगात मुलांना लहानपणापासून वेगवेगळ्या स्पर्धाना घातलं जातं. त्यांच्या मनात स्पर्धेची नसíगक जाणीव निर्माण व्हायच्या आधीच स्पर्धा सुरू होतात. गाण्यांची स्पर्धा, नृत्याची स्पर्धा, विविध शालाबाह्य़ परीक्षा, खेळांच्या स्पर्धा, शाळांमधल्या परीक्षा, रिएलिटी शोज या सगळ्यांतून आपलंच मूल पहिलं कसं येईल, याची स्पर्धा आधी पालकांच्या प्रौढ मनात सुरू होते आणि मग ती बालमनापर्यंत पोहोचते.

कोणतीही गोष्ट स्पर्धेतल्या बक्षिसासाठी केली जाते, तेव्हा तेव्हा माणसाच्या, मुलांच्या मेंदूमध्ये डोपामाइनची निर्मिती होते. एकदा हे घडलं की, तेच पुन:पुन्हा करावंसं वाटतं. कारण हेच डोपामाइनचं काम आहे. वास्तविक ‘काही तरी मिळणं- बक्षीस मिळाल्यामुळे होणारा आनंद’ हा डोपामाइनमुळे होतो; पण पुढे ती सवय लागण्यामागेही याच रसायनाचा हात असतो. पहिला नंबर माझाच, असं वाटण्यामागेही हे रसायन कारणीभूत असतं. यामुळे पुढे पुढे अभ्यास किंवा ती कलेची जोपासना वगरे मागे पडून नंबरासाठी स्पर्धा होते. केव्हा तरी त्याही पुढे जाऊन ‘नंबर हवाच’ या ईष्य्रेपायी दुसऱ्याचा मत्सर, वाटेल ती तडजोड करायलाही माणसं मागेपुढे बघत नाहीत. स्पर्धा अशा प्रकारे डोक्यात भिनते. इथे कलेचा, खेळाचा संबंध आधीच तुटलेला असतो.

MPSC Mantra Increasing Opportunities in Public Service Commission Competitive Exams
MPSC मंत्र: लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा- वाढत्या संधी
mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’
Candidates Chess Tournament R Pragyanand success in defeating Alireza Firooza sport news
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा: प्रज्ञानंदने फिरूझाला रोखले! गुकेश-विदित, हम्पी-वैशालीमध्ये पहिल्या फेरीत बरोबरी
chess
भारतीय बुद्धिबळपटू सज्ज; प्रतिष्ठेच्या ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धेला आजपासून प्रारंभ

स्पर्धेत भाग घेतला आहे, त्यासाठी जिवापाड मेहनत करणं ही एक पायरी असते. प्रामाणिकपणे स्पर्धा जिंकणं यातलं यश सुंदर असतं; पण ‘मी सगळ्यात वरचढ’ ठरायला पाहिजे, ही दुसरी पायरी. यापुढे जाऊन ‘माझं अपयश मला सहन करता येत नाही’ ही तिसरी  पायरी.

अनेकदा ही स्पर्धा मुलांचं मन पोखरते. त्यांना साध्यासाध्या गोष्टींतला निभ्रेळ आनंद घेऊ देत नाही. जर अपयश मिळत असेल तर मी जगायला लायक नाही, असं वाटून नराश्यात जाणं ही चौथी पायरी. एखादी गोष्ट फक्त आपल्या आनंदासाठी करायची आहे, हे लक्षात येत नाही.

थोडक्यात काय, तर स्पर्धा वयाच्या जेवढी उशिरा सुरू होईल तेवढा मुलांना कलांचा- खेळांचा खराखुरा आनंद मनमुराद लुटता येईल. मुलांना त्यांचं बालपण त्यांना जगू देणं म्हणजे त्यांना हव्या त्या गोष्टीत, कलेत, खेळात, छंदात रमू देणं. त्यायोगे त्यांना स्वत:च्या मनाशी सुंदर संवाद साधता येईल. हा संवाद साधणं ‘इमोशनल इंटेलिजन्स’साठी आवश्यक आहे.

– डॉ. श्रुती पानसे

contact@shrutipanse.com