गाय / म्हैस गाभण राहते, व्यायल्यानंतर चीक देते व पाच-सहा दिवसांनी दूध देणे सुरू करते. एक वेत म्हणजे चांगल्या दूध देणाऱ्या गायींमध्ये ३०५ ते ३१०  दिवस तसेच म्हशींमध्ये २७० ते २८० दिवस. एकदा गाय / म्हैस व्यायली की ती पुन्हा गाभण राहून ज्या दिवशी परत वासरू/ रेडकू देते, तो कालावधी म्हणजे दोन वेतांतील अंतर. हा काळ गायीमध्ये १२-१३ महिने तर म्हशीत १३-१४ महिने असावयास पाहिजे. या कालावधीतील १०० दिवस म्हणजे विण्याच्या अगोदरचे ४५ दिवस व व्यायल्यानंतरचे ५५ दिवस.
विण्याच्या अगोदर गायीच्या कासेला ४५ दिवस विश्रांती मिळाली पाहिजे. त्यासाठी तिला संपूर्णपणे आटवली पाहिजे. आटवताना पाणी, खुराक, हिरवा चारा हळूहळू कमी करावा. तिच्या कासेत सडाच्या टय़ुबा भराव्यात. त्यामुळे कास एकदम आकुंचित होते. मग तिचा आहार पुन्हा पहिल्यासारखा सुरू करावा.
या ४५ दिवसांचे साधारणपणे तीन भाग पडतात. पहिल्या १० दिवसांत कासेची काळजी घ्यावी. तिला आतून-बाहेरून कोणत्याही प्रकारची इजा होऊ देऊ नये.  
त्यानंतरच्या ३० दिवसांत तिला पचनीय आहार व व्यायाम मिळेल, हे पाहावे. म्हणजे गर्भाशयातील वासरा / रेडकाचे वजन वाढते. २० दिवसांच्या अंतराने कृमी / जंतुनाशक औषधाचे दोन डोस तिला द्यावेत. गायीच्या / म्हशीच्या नख्या चांगल्या घासून वा कापून सरळ / काटकोनात कराव्यात. व्यायच्या अगोदरच्या काळात त्यांना  संतुलित आहार द्यावा.
विण्याअगोदरच्या पाच दिवसांत त्यांना जास्तीतजास्त स्वच्छ ठेवावे. त्यांना निसरडय़ा, घसरडय़ा, जास्त उताराच्या, खड्डे असलेल्या जागी बांधणे,  डोंगर, टेकडय़ा अशा जागी पाठवणे योग्य नाही. त्यांच्या बसण्या-उठण्याच्या जागेवर गवताची, उसाच्या चिपाडाची, गव्हाच्या काडाची, पेंढय़ाची किंवा अन्य सामग्री वापरून गादी करावी, तसेच त्यांना अत्यंत हलका आहार द्यायचा प्रयत्न करावा.
व्यायल्यानंतर ५५ दिवसांत गाय / म्हशीला पौष्टिक, संतुलित आहार मिळाला पाहिजे. या दिवसांत तिचे गर्भाशय पूर्वस्थितीत येऊन परत माजचक्र सुरू करण्याच्या तयारीत आणणे महत्त्वाचे असते. तिच्या गर्भाशयातून १०-१२ दिवस येणाऱ्या स्रावामुळे तिच्या शेपटीचा भाग धुऊन, र्निजतुक रसायने वापरून दररोज स्वच्छ ठेवावा. त्यामुळे गर्भाशयाला इजा होत नाही.

जे देखे रवी..   –  लढा : अंक दुसरा- भाग ७  कर्मचक्र
मी तरी या बागेबद्दल किती लेखांमधून लांबण लावली आहे असे विचार आता मनामध्ये उमटू लागले आहेत. तेव्हा हा लेख शेवटचा.
ही बाग काही उत्तरेतली मुघल गार्डन किंवा दक्षिणेतली वृंदावन नव्हती. पण देशातली पर्यावरणाची पहिली लढाई होती. एका बलाढय़ शत्रूला लोळवत लोकांनी यशस्वी केलेला या लढय़ाचा इतिहास मी तीस-चाळीस वर्षे जवळून पाहिला आणि त्यात मी सहभागी होतो. पण ज्या बागेत मी झाडू मारत असे, माळी कमी होते तेव्हा तासन्तास पाणी घालत असे त्या उद्यानाची देखभाल मीच स्थापन केलेल्या संस्थेने एका कंत्राटदाराला द्यावी आणि त्याने बक्कळ पैसे घेऊन त्या बागेची दुर्दशा करावी यामुळे दुखावलो. बागेत गेलो तर झाडांशी बोलत असे. ज्या उपआयुक्ताने एका साहेबांच्या आज्ञेवरून हा करार केला त्याचे नाव सुधीर नाईक. हा माणूस मोठा सहृदय निघाला. दुखावलो असलो तरी मी दमलो नव्हतो. माहिती अधिकाराखाली वरचेवर फोन करून, पत्र पाठवून मी पाठपुरावा चालूच ठेवला. पण अशी बातमी सर्वत्र प्रसृत करण्यात आली की, माझा अहंकार दुखावल्यामुळे मी हे चालू केले आहे.
त्यांचे तरी काय चुकले? ही एक लबाडीच होती. तशा मीही केल्या होत्या. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना तेच हवे असते. मख्खासारखे बसून राहणे त्यांच्या जातकुळीला साजेसेच होते, पण या सुधीर नाईक नावाच्या उपआयुक्ताने नव्हे तर एक सरळ माणसाने मला मनापासून मदत केली. बाग त्याच्या अखत्यारीत नसूनही तो धावून येत असे. करार करताना त्याच्या हाताचा धनी निराळा होता. व्यक्ती म्हणून त्याने स्वत:हून हात हलवले. ‘लोकसत्ता’चे केतकर आणि संदीप आचार्य, पुढे गिरीश कुबेर आणि प्रशांत दीक्षित यांनी ‘लोकसत्ता’मधून अप्रत्यक्ष लढे दिले. त्या कंत्राटदाराला उडवण्यात आले. जे किमान  बदल मला हवे होते ते झाले. खरे तर बागेत मी अशी धट्टीकट्टी झाडे आणि वनस्पती  लावली होती की देखभाल सोपी होती. ज्या समुद्रकिनाऱ्यावर ही बाग वसली आहे त्या समुद्रावरून पावसाळ्यात येणारे वारे इतके क्षारयुक्त असतात आणि मिठी नदीने समुद्रात ओकलेल्या विषारी गोष्टींचे त्यात इतके भयानक मिश्रण असते की इथे सौंदर्य जोपासणे अवघड आहे हे मी केव्हाच ओळखले होते. पण त्याच सौंदर्यीकरणावर अनाठायी पैसे खर्च झाले.
माझ्या घराच्या गच्चीवरून ही बाग दिसते. शहाजानला कैद केल्यावर तो आपल्या मुमताजच्या ताजमहलकडे बघत रडत असे आणि रडून रडून तो आंधळा झाला तसे माझे काही झाले नाही. मी निगरगट्ट आहे आणि वर आता माझ्या बायकोचीच इथे विश्वस्त म्हणून नेमणूक झाली आहे. एक चक्र पूर्ण झाले.
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com

Chaturgrahi Yog in meen rashi
Chaturgrahi Yog : १०० वर्षानंतर चतुर्ग्रही योग; ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा, होऊ शकतो मोठा धनलाभ
Gajlaxmi Rajyog
येत्या ७ दिवसांनी ‘या’ राशींचे येणार चांगले दिवस? ‘शुभ योग’ बनल्याने लक्ष्मी कृपेने बँक बँलेन्समध्ये झपाट्याने होऊ शकते वाढ
Rahu Shukra Yuti in meen rashi
विपरीत राजयोगामुळे दहा दिवसांमध्ये ‘या’ तीन राशींचे बदलणार नशीब , मिळणार गडगंज पैसा
Guru Gochar 2024
Guru Gochar 2024 : २० दिवसानंतर ‘या’ राशींचे नशीब पालटणार, वर्षभर मिळेल यांना बक्कळ धनलाभ

वॉर अँड पीस – क्षय : भाग २
लक्षणे – १) त्रिरूप राजयक्ष्मा : खांदे व बरगडय़ांच्या बाजू दुखणे, हातापायाची सतत आग, सर्व अंगात ताप असणे.
२) षड्रूप राजयक्ष्मा – अन्नावर वासना नसणे, ताप, खोकला धाप लागणे, थुंकीतून रक्त पडणे व आवाज बसणे.
३) एकादशरूप राजयक्ष्मा : आवाज बसणे, टोचल्यासारखी वाताची पीडा होणे, हात, बरगडय़ा यांचा संकोच, शुष्क होणे, ताप, अंगाची आग, पातळ जुलाब, पित्त वाढल्यामुळे थुंकीतून रक्त पडणे, शरीर जड होणे, अन्नाचा द्वेष वाटणे,  कफ वाढून घसा बसणे.
४) अनुलोम क्षय: क्रमाक्रमाने एकेक धातू क्षीण होत जाणे, कणाकणाने शरीर झिजणे, झीजत झीजत वजन घटत, विकार वाढत जाणे, असाध्य होणे.
५) प्रतिलोम क्षय – एकदम ओजक्षय होऊन, रोगी फार भित्रा, दुर्बल होतो. वरचेवर चिंतेत मग्न होतो. ज्ञानेंद्रिये, कर्मेद्रिये व मन दु:खी होते. त्वचा विवर्ण होते, अनुत्साह येतो. शरीर रूक्ष, कृश होते. सर्व प्रकारच्या क्षय विकारात ज्वर हे अव्यभिचारी लक्षण असते.
शरीर व परीक्षण – केसांपासून पायाच्या नखापर्यंत रुग्ण-परीक्षणाची सवय ठेवली, तर क्षयाची सुरुवात लगेच लक्षात येते. तापाचे मान, वेळा, खोकल्याची रात्रीची वेळ, छातीतील कफाचे आवाज, थुंकी, वजन, बोलण्यातील जोर, एकूण थकवा,भूक ,  आतडय़ांचे कार्य, या सर्वाची माहिती घ्यावी व परीक्षण करावे. वजन घटणे, रुची नसणे, ताप, खोकला, सतत सर्दी ही दुचिन्हे होत.
कारणे – १) अनेक रोगांचा पूर्वेतिहास, पूर्वकर्म, अनुवंशिकता.
२) ताकदीच्या बाहेर व्यायाम, साहसी कृत्य सातत्याने.
३) शुक्र, ओज, स्नेह यांचा क्षय होईल असे वर्तन.
४) आहारविहार, निद्रा, मैथुन, व्यायाम व आवश्यक विश्रांती याबाबतचे साधे नियम न पाळणे. खराब, दूषित हवा, धूळ, वास, रसायने, ओल यांच्या संपर्कात राहणे. दीर्घकाळ सर्दी, ताप, खोकला जुलाब टिकून राहणे. चुकीची औषधे दीर्घकाळ घेणे.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत – १८ जुलै
१८९४ >  कायदय़ांचे भाषांतरकार आणि मुंबई हायकोर्टाचे पहिले नेटिव्ह न्यायाधीश जनार्दन वासुदेव आगासकर यांचे निधन. ‘दर्पण’ या वृत्तपत्रात ते काही काळ होते.
१९६९> ३५ कादंबऱ्या, त्यापैकी ७ कादंबऱ्यांवर लोकप्रिय चित्रपट,  बर्लिन- लेनिनग्राड आदी शहरांतील ताज्या संघर्षांसह १५ नावीन्यपूर्ण विषयांवर पोवाडे, १३ कथासंग्रह, ‘मुंबईची लावणी’,‘माझी मैना गावावर राहिली’ सारख्या सामाजिक भान आणि कलात्म शृंगार जपणाऱ्या लावण्या, ११ लोकनाटय़े यांतून प्रकटलेल्या सशक्त, लोकाभिमुख प्रतिभेचे ‘लोकशाहीर’ तुकाराम भाऊराव ऊर्फ अण्णा भाऊ साठे यांचे निधन. संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ात आणि कामगार व उपेक्षितांच्या चळवळींत ‘अण्णाभाऊं’नी महत्त्वाची भूमिका बजावली.
१९७४ > यंत्रशास्त्राच्या मूलतत्त्वांवरील पुस्तक, तसेच ‘वाहती वीज’ हे पुस्तक लिहून शास्त्रीय परिभाषेचा पाया रुंदावणारे सखाराम विनायक आपटे यांचे निधन.
१९८९> नाटककार/ नाटय़विषयक लेखक  गोविंद केशव भट यांचे निधन. ‘कालिदासदर्शन’, ‘भवभूती’, ‘संस्कृत नाटके आणि नाटककार’ आदी पुस्तके, ‘गृहदाह’ हे नाटक व २ कथासंग्रह, एक कादंबरी त्यांच्या नावावर आहे.
– संजय वझरेकर